एक्स्प्लोर

जेएनयूची माजी विद्यार्थिनी शेहला रशिद पुन्हा चर्चेत, देशविरोधी कारवायांत सहभाग असल्याचा वडिलांचा आरोप

जेएनयूची माजी विद्यार्थिनी शेहला रशिदच्या एनजीओला परदेशातून पैसे येतात, त्याचा वापर देशविरोधी कारवायांसाठी केला जात असल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे. या आरोपांना शेहला रशीदने फेटाळले आहेत.

जम्मू: जेएनयूची माजी विद्यार्थिनी शेहला रशीद पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. देशविरोधी कार्यात तिचा सहभाग असल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला असून यासंदर्भात त्यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचं सांगत पोलीस महासंचालकांना एक पत्र लिहिलं आहे.

शेहला रशीदचे वडील अब्दुल रशीद शोरा यांनी जम्मूच्या पोलीस महासंचालकांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, "त्यांच्या जीवाला धोका असल्याने ते काश्मीरहून जम्मूला आले आहेत." जीवे मारण्याची धमकी मिळाली असल्याचंही त्यांनी नमूद केलं आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलं की, "शेहलाने 2017 साली काश्मीरच्या राजकारणात भाग घेतला होता. ती सीपीआयएम पक्षाची सक्रिय सदस्यदेखील आहे. या आधी तिने सीपीआयएमच्या तिकीटावर मेरठमधून निवडणूक लढवण्याची तयारी केली होती. आता तिचा सहभाग जम्मूच्या राजकारणात आहे. तिच्या एनजीओला मिळणाऱ्या फण्डिंगचा  वापर देशविरोधी कारवायांसाठी केला जातोय."

शेहला रशीदच्या एनजीओला परदेशातून फण्डिंग होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. जेएनयूमध्ये देशविरोधी नारे दिले जातात ते चुकीचं असल्याचं सांगत त्यांनी सांगितलं की एका कट्टरवादी पक्षाची स्थापना करण्यासाठी शेहलाला तीन कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती. शेहला चालवत असलेल्या एनजीओची चौकशी करावी अशा प्रकारची मागणी देखील त्यांनी केली आहे.

गेल्या वर्षी शेहला रशीदवर एका ट्वीट प्रकरणी देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला होता. आता थेट शेहलांच्या वडिलांनीच तिच्यावर देशविरोधी कारवायात सहभागी असल्याचा आरोप केल्याने ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

शेहला रशीदने आरोप फेटाळले वडिलांनी केलेल्या या आरोपाला उत्तर देताना शेहला रशीदने ट्विटरवरुन आपली बाजू मांडली आहे. तिनं सांगितलं आहे की, "तिचे बायोलॉजिकल वडील तिच्या आईला मारहाण करत होते. त्यांच्याविरोधात कौटुंबिक छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे." आता त्यांच्याकडून आपल्याला बदनाम करण्याचे करण्यात येत असल्याचा आरोपही तिने केला आहे.

पहा व्हिडिओ: 'माझ्या मुलीचा देशविरोधी कृत्यांमध्ये सहभाग'; JNUची माजी विद्यार्थिनी शेहला रशिदच्या वडिलांचा आरोप

महत्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज पुन्हा सुनावणी
Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज पुन्हा सुनावणी
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Ranchi Protest : मोठी बातमी, JSSC CGL परीक्षा रद्द, हेमंत सोरेन सरकारचा निर्णय, देवेंद्र महतोंची उपोषण सोडण्याची घोषणा
JSSC CGL परीक्षा रद्द, हेमंत सोरेन सरकारचा मोठा निर्णय, देवेंद्र महतोंची उपोषण सोडण्याची घोषणा
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?

व्हिडीओ

Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC BEST Depot Redevelopment: मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
Embed widget