(Source: ECI/ABP News/ABP Majha)
SHE STEM | स्वीडन भारत नोबेल मेमोरियल सप्ताहात महिलांचा सन्मान
अटल इनोव्हेशन योजनेच्या भागिदारीत आयोजित केलेल्या या कार्यक्रमात भारत आणि स्वीडनमधील STEM क्षेत्रातील महिलांचा सन्मान करण्यात आला. तसेच या क्षेत्रातील महिलांच्या शिक्षणावर भर देण्यात आला.
कोलकाता: भारत आणि स्वीडन मधील संबंध अधिक वृध्दींगत होण्यासाठी मंगळवारी स्वीडन-भारत नोबेल मेमोरियल वीक 2020 या कार्यक्रमाचं भारतातील स्वीडनच्या दूतावासात व्हर्चुअल पध्दतीनं आयोजन करण्यात आलं होतं. अटल इनोव्हेशन मिशनच्या भागिदारीत SHE STEM: Women Leading The Way या थीमच्या माध्यमातून स्वीडन आणि भारतातील वैज्ञानिक आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील महिलांचा सन्मान करण्यात आला.
जागतिक स्तरावर स्थिरता स्थापित करण्यासाठी विज्ञान, तंत्रज्ञान, इंजिनीअरिंग आणि गणित (STEM) या क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्वीडन आणि भारतातील महिलांचा सन्मान करण्यात आला. या महिला त्यांच्या क्षेत्रात लक्षणिय कामगिरी करत आहेत आणि जगातील इतर महिलांसाठी रोल मॉडेल ठरत आहेत. आपल्या कार्याने ज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विकासाला योग्य दिशेने घेऊन जात आहेत.
या कार्यक्रमात जवळपास पाच हजार लोकांनी भाग घेतला होता. यात विद्यार्थी, शिक्षक, माध्यमं आणि इतर क्षेत्रातील लोकांचा सहभाग आहे. विद्यार्थीनी आणि महिलांचा या कार्यक्रमात लक्षणिय सहभाग असल्याचं दिसून आलं.
या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी स्वीडिश राजदूत आणि महिला विदेश नीतीचे समन्वयक एन. बन्नस यांनी सांगितलं की, गेल्या काही काळापासून, खासकरुन 2014 साली महिला विदेश नीती अवलंब करण्याच्या वेळेपासून आम्ही लिंग समानताच्या मुद्द्यावरुन बदल घडवण्यावर भर दिला आहे. स्वीडनमध्ये जगातील पहिले स्त्रीवादी सरकार आहे याचा आम्हाला गर्व आहे. अशा प्रकारच्या बदलाच्या मार्गावर वाटचाल करण्यासाठी आपल्याला रुढीवादी परंपरा, भेदभाव आणि लैंगिक असमानता या गोष्टींशी लढा द्यावा लागेल. आजही या गोष्टी जगातील अगणित मुलींच्या आणि महिलांच्या आयुष्याचा भाग आहेत. स्वीडनचे स्त्रीवादी सरकार महिला विदेश नीतीमध्ये मोठा बदल करण्याचा प्रयत्न करणार आहे. यात जे काही बदल होतील ते STEM क्षेत्रात महिलांना एक वेगळी ओळख मिळवून देतील.
भारतीय बायोटेक्नॉलॉजी विभागाच्या सचिव डॉ. रेणू स्वरुप यांनी सांगितले की, या कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्या काही नव्या सूचना येतील त्यांची अंमलबजावणी केली जाईल. SHE STEM या कार्यक्रमाच्या माध्यमातून या क्षेत्रातील महिलांच्या योगदानाची दखल घेण्यात आली आहे.
या कार्यक्रमात अनेक महिलांनी पर्यावरण आणि इतर सामाजिक क्षेत्रात बदल करण्यासाठी नव्या सूचना केल्या.
महत्वाच्या बातम्या: