एक्स्प्लोर
शेअर बाजारात मोठी घसरण, सेन्सेक्स 1000 अंकांनी गडगडला
मुंबई: 500 आणि 1000च्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णयानंतर आज सकाळी शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. शेअर बाजाराचा प्री ट्रेडिंग कल हाती आला तेव्हा सेन्सेक्स तब्बल 1500 अकांनी गडगडला होता. तर निफ्टीमध्ये 468 अकांची घसरण झाली होती. दरम्यान, बाजार सुरु होताच किंचित सुधारणा होऊन सेन्सेक्समध्ये 1000 अकांची घसरण पाहायला मिळाली.
दुसरीकडे अमेरिकेतील निवडणुकीमुळे भारतीय शेअर बाजारात ही घसरण झाल्याचं बोललं जात आहे. अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणूक हिलरी क्लिंटन या सुरुवातीच्या काळात मागे पडल्या असून ट्रम्प यांनी चांगलीच आघाडी घेतली आहे. त्यामुळे ही घसरण झाल्याचं म्हटलं जात आहे. एकीकडे शेअर बाजारात घसरण सुरु असताना दुसरीकडे भारतीय बाजारात सोन्याच्या दरात तब्बल 4000 हजारानं वाढ झाली आहे. त्यामुळे सोन्याच्या दर तब्बल 34000 वर जाऊन पोहचला आहे.
भारतात 500 आणि 1000च्या नोटा रद्द केल्याच्या निर्णयानं गुंतवणूकदारांमध्ये घबराटीचं वातावरण असलं तरी शेअर बाजार घसरण्यामागे अमेरिकेतील निवडणूक देखील कारणीभूत आहे. असं तज्ज्ञांचं मत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement