एक्स्प्लोर

शरद पवार राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत नाहीत : राष्ट्रवादी

नवी दिल्ली : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे राष्ट्रपतीपदाच्या स्पर्धेत नाहीत, असं पक्षातर्फे पहिल्यांदाच अधिकृतपणे सांगण्यात आलं आहे. राष्ट्रवादीचे सरचिटणीस डीपी त्रिपाठी यांनी दिल्लीतल्या पत्रकार परिषदेत हे वक्तव्य केलं. शरद पवार हे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार असणार का, या प्रश्नावर उत्तर देताना त्रिपाठींना हे जाहीर केलं. 'पवार हे आमच्या पक्षाचे नेते आहेत. त्यांनी या पदांसाठी रेसमध्ये असण्याचा प्रश्नच नाही. काही इतर नेते हे निवडणूक लढवणारे असतील. मात्र पवार बिल्कुल नाही, असं उत्तर त्रिपाठी यांनी दिलं.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतांची आकडेवारी कशी?

काहीच दिवसांपूर्वी शरद पवारांना 'पद्मविभूषण' प्रदान करण्यात आलं. यावेळी पवारांचं नाव राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत असल्याच्या चर्चा होत्या. जुलैमधे राष्ट्रपतीपदाची निवडणूक होणार आहे. दुसरीकडे, सरसंघचालक मोहन भागवत यांना राष्ट्रपतीपदाचा उमेदवार घोषित करावं, अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली होती. त्यानंतर भागवतांनी ही मागणी गांभीर्याने न घेण्याचं आवाहन केलं. त्यानंतर एनडीएच्या बैठकीपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची पंतप्रधान मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्याशी राष्ट्रपतीपदाबाबत चर्चा झाल्याचं म्हटलं जातं. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतांची आकडेवारी कशी? लोकसभेतले 543 राज्यसभेतले 233 असे एकूण 776 खासदार मतदान करतात प्रत्येक खासदाराच्या एका मताची किंमत ही 708 आहे (देशातल्या सर्व आमदारांच्या मतांची एकत्र किंमत भागिले 776 असे करुन हा आकडा काढला जातो) देशातल्या एकूण आमदारांची संख्या 4120 म्हणजे 776 खासदार अधिक 4120 आमदार  = 4896 जणांचं निर्वाचक मंडळ ( electoral college) ................ आमदारांच्या एका मताची किंमत ही प्रत्येक राज्यात वेगवेगळी असते उदा. महाराष्ट्र महाराष्ट्राची 1971 मधली लोकसंख्या : 5,04,12,235 5,04,12,235 (पाच कोटी 4 लाख) भागिले 288 याचं उत्तर येतं 1,75,042 ( 288 नं भागण्याचं कारण विधानपरिषदेचे आमदार या निवडणुकीत मत देऊ शकत नाहीत) एका आमदाराच्या मताची किंमत काढण्यासाठी या संख्येला एक हजारने भागा, उत्तर 175.042 त्याची पूर्णांक संख्या म्हणून 175  ही महाराष्ट्रातल्या एका आमदाराच्या मताची किंमत यात 1971 हे लोकसंख्येसाठी आधारभूत वर्ष आहे ................ यूपीत एका आमदाराच्या मताची किंमत 208, तर गोव्यासारख्या छोट्या राज्यात ती 20 आहे ................ राष्ट्रपतींच्या निवडीसाठी एकूण मतांची किंमत 10,98,882 ( यात 776 गुणिले 708 अधिक देशातल्या एकूण आमदारांच्या मताची किंमत 5,49,474) ................ बहुमतासाठी आकडा : 5,49,442 ................ पाच राज्यांच्या निवडणुका होण्याआधी एनडीएकडे 4,74,336 मते होती पाच राज्यातल्या यशानंतर हा आकडा 5,29,398 झाला असला, तरी अजूनही 20,044 ने कमीच आहे शिवाय हा आकडा शिवसेनेला ग्राह्य धरूनचा आहे शिवसेनेकडे 21 खासदार गुणिले 708 म्हणजे 14,868 अधिक 63 आमदार गुणिले 175 म्हणजे 11,025 अशी एकूण साधारण 25 हजार मतं आहेत शिवसेना सोबत आली नाही तर एनडीएला कमी पडणाऱ्या मतांमध्ये 25 हजारांनी वाढ होऊन ती 45 हजारांवर पोहचतात ................ ही तूट भरून काढण्यासाठी एनडीएला बीजेडी किंवा एआयडीएमके यांची मदत घ्यावी लागेल. शिवाय काही अपक्ष आमदार, खासदारही कामी येतील ............ बीजेडी सोबत आल्यास काय बीजेडी कडे 20 लोकसभा अधिक सात राज्यसभा असे एकूण 27 खासदार 27 गुणिले 708 म्हणजे 19,116 इतकी खासदारांची मतं तर 117 आमदार आहेत एका आमदाराच्या मताची किंमत ओडिशात 149 आहे 117 गुणिले 149 म्हणजे 17,433 इतकी आमदारांची मतं आहेत. दोन्हींची बेरीज केली, तर बीजेडी सोबत आल्यास 36 हजार मतांची वाढ एनडीएला मिळू शकते ............... एआयडीएमके सोबत आल्यास काय? एआयडीएमकेकडे लोकसभेत 37 तर राज्यसभेत 13 असे एकूण 50 खासदार आहेत म्हणजे 50 गुणिले 708 म्हणजे 35 हजार 400 इतकी खासदारांची मतं आहेत तर एआयडीएमकेकडे 134 आमदार आहेत तामिळनाडूत एका आमदाराच्या मताची किंमत 176 आहे 134 गुणिले 176 म्हणजे 23,584 इतकी आमदारांची मतं आहेत दोन्हींची बेरीज केली तर एआयडीएमके सोबत आल्यास साधारण 58 हजार मतांची वाढ एनडीएला मिळू शकेल. एनडीएला अजूनही मतं कमी असल्यानं शिवसेनेचा भाव टिकून आहे
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

काळीज चिरणारे फोटो; नराधमांनी संतोष देशमुखांना अंतर्वस्त्रावर बसवलं, रॉडने मारलं, हसत-हसत मोबाईल शूट
काळीज चिरणारे फोटो; नराधमांनी संतोष देशमुखांना अंतर्वस्त्रावर बसवलं, रॉडने मारलं, हसत-हसत मोबाईल शूट
Accident News: ट्रक व दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक; दुचाकीवरील दोन मुलांचा दुर्दैवी अंत, सांगोला महामार्गावरील भीषण दुर्घटना 
ट्रक व दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक; दुचाकीवरील दोन मुलांचा दुर्दैवी अंत, सांगोला महामार्गावरील भीषण दुर्घटना 
दत्ता गाडेच्या विचित्र आरोपामुळे पीडिता तणावात, वसंत मोरेंची भेट घेऊन सगळं सांगितलं; स्वागरेटमध्ये पहाटे नेमकं काय घडलं?
दत्ता गाडेच्या विचित्र आरोपामुळे पीडिता तणावात, वसंत मोरेंची भेट घेऊन सगळं सांगितलं; स्वागरेटमध्ये पहाटे नेमकं काय घडलं?
धक्कादायक! तब्बल 69 ATM कार्डसह पकडला चोरटा; चिकट पदार्थ टाकून पैसे काढण्याचं टेक्निक
धक्कादायक! तब्बल 69 ATM कार्डसह पकडला चोरटा; चिकट पदार्थ टाकून पैसे काढण्याचं टेक्निक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sunandan Lele on Rohit Sharma Fitness|फिटनेसवरून रोहित शर्मावर राजकीय टीका, सुनंदन लेले म्हणाले...Dinesh Lad EXCLUSIVE : फिटनेस ते रनिंग बिटविन द विकेट, Rohit Sharma Fitness ची अनटोल्ड स्टोरी!Santosh Deshmukh हत्येचे फोटो; Dhananjay Deshmukh यांची काळीज हेलावून टाकणारी प्रतिक्रियाSantosh Deshmukh Case Evidence : देशमुख हत्याप्रकरणातील EXCLUSIVE पुरावा;हत्येचे धक्कादायक फोटो समोर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काळीज चिरणारे फोटो; नराधमांनी संतोष देशमुखांना अंतर्वस्त्रावर बसवलं, रॉडने मारलं, हसत-हसत मोबाईल शूट
काळीज चिरणारे फोटो; नराधमांनी संतोष देशमुखांना अंतर्वस्त्रावर बसवलं, रॉडने मारलं, हसत-हसत मोबाईल शूट
Accident News: ट्रक व दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक; दुचाकीवरील दोन मुलांचा दुर्दैवी अंत, सांगोला महामार्गावरील भीषण दुर्घटना 
ट्रक व दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक; दुचाकीवरील दोन मुलांचा दुर्दैवी अंत, सांगोला महामार्गावरील भीषण दुर्घटना 
दत्ता गाडेच्या विचित्र आरोपामुळे पीडिता तणावात, वसंत मोरेंची भेट घेऊन सगळं सांगितलं; स्वागरेटमध्ये पहाटे नेमकं काय घडलं?
दत्ता गाडेच्या विचित्र आरोपामुळे पीडिता तणावात, वसंत मोरेंची भेट घेऊन सगळं सांगितलं; स्वागरेटमध्ये पहाटे नेमकं काय घडलं?
धक्कादायक! तब्बल 69 ATM कार्डसह पकडला चोरटा; चिकट पदार्थ टाकून पैसे काढण्याचं टेक्निक
धक्कादायक! तब्बल 69 ATM कार्डसह पकडला चोरटा; चिकट पदार्थ टाकून पैसे काढण्याचं टेक्निक
Mahadev Munde : मुंबईत अधिवेशन सुरू अन् बीडमध्ये महादेव मुंडेंच्या पत्नीचं आमरण उपोषण स्थगित; पोलिसांना एक महिन्याचा अल्टीमेटम
मुंबईत अधिवेशन सुरू अन् बीडमध्ये महादेव मुंडेंच्या पत्नीचं आमरण उपोषण स्थगित; पोलिसांना एक महिन्याचा अल्टीमेटम
Video: रोहित पवार लवकरच सत्तेत सहभागी होतील; अजित पवारांच्या आमदाराचा मोठा दावा, अधिवेशनात चर्चा
Video: रोहित पवार लवकरच सत्तेत सहभागी होतील; अजित पवारांच्या आमदाराचा मोठा दावा, अधिवेशनात चर्चा
Sunandan Lele on Rohit Sharma Fitness|फिटनेसवरून रोहित शर्मावर राजकीय टीका, सुनंदन लेले म्हणाले...
Sunandan Lele on Rohit Sharma Fitness|फिटनेसवरून रोहित शर्मावर राजकीय टीका, सुनंदन लेले म्हणाले...
Raksha Khadse : रक्षा खडसेंच्या मुलीची छेडछाड, आरोपी शिंदेसेनेचे कार्यकर्ते, सोशल मीडियावर PHOTOS व्हायरल
रक्षा खडसेंच्या मुलीची छेडछाड, आरोपी शिंदेसेनेचे कार्यकर्ते, सोशल मीडियावर PHOTOS व्हायरल
Embed widget