(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shantisree Dhulipudi : पुणे विद्यापीठाच्या प्राध्यापिका आता JNU च्या कुलगुरू! जाणून घ्या
जगातील अनेक नामांकित संस्थांमध्ये त्यांची फेलोशिप आहे. त्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक सन्मानांनी गौरविण्यात आले आहे.
नवी दिल्ली : प्रतिष्ठित जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) कुलगुरूपदी प्रथमच एका महिलेची नियुक्ती झाली आहे. पुणे विद्यापीठाच्या (pune university) प्राध्यापिका शांतीश्री धुलीपुडी पंडित (Santishree Dhulipudi Pandit) यांची JNU च्या नवीन कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्या JNU च्या पहिल्या महिला VC म्हणजेच व्हाईस चांसलर आहेत. माजी कुलगुरू जगदीश कुमार (jagadish kumar) यांनी सोमवारीच प्राध्यापक पंडित यांच्याकडे पदभार सोपवणार असल्याचे सांगितले.
34 वर्षांपेक्षा जास्त अनुभव
पुणे विद्यापीठात राजकारण आणि लोकप्रशासन हे विषय शिकवणाऱ्या प्राध्यापक शांतीश्री पंडित यांचा जन्म रशियातील सेंट पीटर्सबर्ग येथे झाला आहे. 1996 मध्ये त्यांनी स्वीडनच्या उप्पसाला विद्यापीठातून डॉक्टरेट डिप्लोमा प्राप्त केला. हिंदी, इंग्रजी, मराठी, तामिळ अशा सहा भाषांमध्ये निपुण आहेत. प्राध्यापक पंडित यांचे कन्नड, मल्याळम आणि कोकणी भाषेवरही प्रभुत्व आहे. प्राध्यापक पंडित यांचे वडील नागरी सेवेत होते. आई लेनिनग्राड (आताचे सेंट पीटर्सबर्ग) ओरिएंटल फॅकल्टी विभागात तमिळ आणि तेलुगूच्या प्राध्यापक होत्या. 34 वर्षांपेक्षा जास्त अनुभव असलेल्या प्राध्यापक शांतीश्री धुलीपुडी पंडित यांनी पुणे विद्यापीठाव्यतिरिक्त गोवा विद्यापीठ, उस्मानिया विद्यापीठ, रक्षाशक्ती विद्यापीठ, मद्रास विद्यापीठात देखील आपले योगदान दिले आहे. याशिवाय केंद्र सरकारच्या अनेक महत्त्वाच्या समित्यांमध्येही त्यांचा सहभाग आहे.
अनेक संशोधन प्रकल्पांमध्ये महत्त्वाची भूमिका
आंतरराष्ट्रीय विषयांवर उत्तम पकड असलेल्या प्राध्यापकांनी अनेक संशोधन प्रकल्पांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. जगातील अनेक नामांकित संस्थांमध्ये त्यांची फेलोशिप आहे. त्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक सन्मानांनी गौरविण्यात आले आहे.
पाच वर्षांच्या कालावधीसाठी नियुक्ती
शिक्षण मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “राष्ट्रपती राम नाथ कोविंद, जे विद्यापीठाचे विजीटर आहेत. त्यांनी जेएनयूच्या कुलगुरूपदी शांतीश्री धुलीपुडी पंडित यांच्या नियुक्तीला त्यांनी मान्यता दिली आहे. त्यांची नियुक्ती पाच वर्षांच्या कालावधीसाठी आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Delhi Riots | दिल्ली दंगली प्रकरणी जेएनयूचा माजी विद्यार्थी नेता उमर खालिदला अटक
- दीपिकाची जेएनयूची उपस्थिती होती 'मौल्यवान'?