एक्स्प्लोर
'नवविवाहीत दाम्पत्यांच्या हनिमूनमुळेच केदारनाथमध्ये पूर', शंकराचार्यांचं अजब तर्कट
नवी दिल्ली: नेहमी चमत्कारिक आणि वादग्रस्त विधाने करून चर्चेत राहणाऱ्या द्वारकापीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद यांनी पुन्हा एकदा तारे तोडले आहेत.
नवविवाहित जोडप्यांनी केदारनाथमध्ये हनिमून साजरा केल्यानंच महाप्रलय आल्याचं बाष्कळ विधान स्वरुपानंद यांनी केलं आहे. ते हरिद्वार दौऱ्यावर असताना बोलत होते. केदारनाथासारख्या पवित्र भूमीमध्ये हनिमून साजरा केल्यानं अपवित्रता पसरली आणि त्यामुळेच अशा प्रलयांना निमंत्रण दिल्याचं अजब तर्कट स्वरुपानंद यांनी मांडलं.
स्वरुपानंद यांनी याआधीही महाराष्ट्रातला दुष्काळ हा साईबाबांची भक्ती केल्यामुळे उत्पन्न झाल्याचा दावा केला होता. इतकंच नाही, तर शनी शिंगणापूरसारख्या मंदिरांमध्ये महिलांनी प्रवेश केल्यास त्यांच्यावरचे अत्याचार वाढतील असा दावाही स्वरुपानंद यांनी केला होता.
संबंधित बातम्या:
शिर्डीच्या साईबाबांच्या पुजेमुळे महाराष्ट्रात दुष्काळ: शंकराचार्य स्वरुपानंद
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
करमणूक
कोल्हापूर
Advertisement