(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सिख फॉर जस्टिस म्हणतेय, 26 जानेवारीला मोदींना ब्लॉक करा, तिरंग्याऐवजी खलिस्थानी झेंडा फडकावा, एक मिलियन मिळवा
SFJ Provokes Again : 26 जानेवारी 2022 म्हणजेच प्रजासत्ताक दिवस आणि पंजाब विधानसभा निवडणुकीआधी खलिस्तानी आतंकवादी संघटना 'सिख फॉर जस्टिस'ने धमकी दिली आहे.
SFJ Provokes Again : 26 जानेवारी 2022 म्हणजेच प्रजासत्ताक दिवस आणि पंजाब विधानसभा निवडणुकीआधी खलिस्तानी आतंकवादी संघटना 'सिख फॉर जस्टिस'ने धमकी दिली आहे. 26 जानेवारी रोजी तिरंग्याऐवजी खलिस्थानी झेंडा फडकावला जाईल, अशी धमकी देण्यात आली आहे. याबाबतचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 26 जानेवारी रोजी राजधानी नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ब्लॉक करा अन् तिरंग्याऐवजी खलिस्थानी झेंडा फडकवा. असे करणाऱ्यास एक मिलियन डॉलरचे बक्षीस मिळेल, अशी सिख फॉर जस्टिस यांच्याकडून घोषणा केली आहे. हा व्हिडीओ एसएफजे प्रमुख गुरुपतवंत सिंह पन्नू यांनी फेसबूकवर पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ Ajay Sehrawat यांनी ट्वीटरवर पोस्ट केला आहे.
Ajay Sehrawat यांनी पोस्ट केलेला व्हिडीओ पाहा ...
ये है खालिस्तानी कार्टून पन्नू। 😡 pic.twitter.com/jYbVsapLLY
— Ajay Sehrawat (@IamAjaySehrawat) January 12, 2022
भारतातील शिख बांधवांना धमकावण्याचा प्रयत्न अनेक वर्षांपासून सुरु आहे. 'सिख फॉर जस्टिस'ने भारतातील लोकांना भडकावण्यासाठी 2,50,000 अमेरिकन डॉलरचे बक्षीस घोषीत केलं होतं. तसेच शेतकरी आंदोलनातही त्यांचा सहभाग दिसून आला होता. पाच जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यात झालेल्या सुरक्षेची त्रृटी यांच्यामुळेच झाली होती. तीन जानेवारी रोजी सिख फॉर जस्टिस यांनी एक व्हिडीओ जारी करत पंजाबमधील शेतकऱ्यांना भडकावले होते. पंतप्रधान पंजाबमध्ये एका राजकीय कार्यक्रमाला जाणार होते, त्याआधी सिख फ़ॉर जस्टिस समुहाने लोकांना भडकावले. त्याचे काही व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा बुधवारी फिरोजपूरमध्ये आंदोलकांनी नाकेबंदी केल्यामुळं उड्डाणपुलावर अडकून पडला होता. त्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव पंतप्रधान मोदींची यांचा दौरा रद्द करण्यात आला होता. त्यावरुन संपूर्ण देशभरातून अनेक प्रतिक्रिया समोर आल्या होत्या. तसेच, 2021 मध्ये प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमावेळी शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण मिळाले होते. शेतकरी आणि पोलिसांत चकमक झाली होती.
मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live