एक्स्प्लोर
श्रीनगरमध्ये फुटीरतावाद्यांचं CRPF जवानांशी गैरवर्तन, व्हिडीओ व्हायरल
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील सीआरपीएफ जवानांचा धीरोदात्तपणाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
काश्मीरचे फुटीरतवादी सीआरपीएफच्या जवानांशी करत असलेलं गैरवर्तन पाहून प्रत्येक भारतीयाच्या तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहणार नाही. 9 एप्रिलचा काश्मीरच्या पुलवामा भागातील हा व्हिडिओ असल्याचं समोर आलं आहे.
पोटनिवडणुकीच्या बंदोबस्तावरुन परतणाऱ्या सीआरपीएफ जवानांना काही टवाळखोर फुटीरतावाद्यांनी चक्क लाथा-बुक्यांनी मारल्याचं व्हिडीओत स्पष्ट दिसतं आहे.
विशेष म्हणजे एवढा अपमान सहन करुनही हातात एके-47 असलेले देशाचे रक्षणकर्ते शांत आहेत. ते कुठल्याही प्रकारचं प्रत्युत्तर देत नाहीत. कारण दुश्मानाच्या नरडीचा घोट घेणाऱ्या जवानांना देशातील नागरिकांना हात न लावण्याची शिकवण दिली जाते. फुटीरतवाद्यांसाठी हेच खरं चोख प्रत्युत्तर आहे.
बातमीचा व्हिडीओ -
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
विश्व
Advertisement