एक्स्प्लोर
भारतीय जवानांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी नाना थेट सीमेवर!

जम्मू काश्मीर : सीमेवर लढणाऱ्या जवानांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर आज जम्मूमध्ये पोहचले. कठुआ सेक्टरमध्ये तैनात असलेल्या बीएसएफ जवानांची नाना यांनी भेट घेतली. PHOTO : भारतीय सैन्याचं मनोधैर्य वाढवण्यासाठी नाना थेट सीमेवर! “सीमेवरील आपले सैनिक पाकिस्तानला योग्य भाषेत उत्तर देत आहेत. त्यामुळे मी पाकिस्तानला अजून वेगळं काही बोलायलं हवं, असं वाटतं नाही.”, असं नाना यावेळी म्हणाले. नाना पाटेकरांनी यावेळी बीएसएफकडून तयार करण्यात येणारे शस्त्रही पाहिले. नोटाबंदीच्या निर्णयाचं स्वागत यावेळी नाना पाटेकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या 500 आणि एक हजाराच्या नोटबंदीच्या निर्णयाचं स्वागत केलं. तसेच या नोट बंदीच्या मुद्यावरुन राजकारण करणाऱ्या विरोधकांवर निशाणा साधला. PHOTO : भारतीय सैन्याचं मनोधैर्य वाढवण्यासाठी नाना थेट सीमेवर! नोटाबंदीच्या निर्णयामुळं भाजपच्या मतपेटीवर फरक पडू शकतो. मात्र पंतप्रधानांनी आधी देशाचा विचार केला असं म्हणत मोदींचं तोंडभरुन कौतुक नानाने केलं.
आणखी वाचा























