(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Anil Ambani : अनिल अंबानी यांना मोठा झटका, सेबीने घातले कठोर निर्बंध
Anil Ambani : सेबीने (Sebi) शुक्रवारी उद्योगपती अनिल अंबानी (Anil Ambani) आणि रिलायन्स होम फायनान्सवर (Reliance) मोठी कारवाई केली.
Anil Ambani : बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेचसेबीने (Sebi) शुक्रवारी उद्योगपती अनिल अंबानी (Anil Ambani) आणि रिलायन्स होम फायनान्सवर (Reliance Home Finance) मोठी कारवाई केली. अनिल अंबानी, रिलायन्स होम फायनान्स यांना कंपनीतील कथित गैरव्यवहार प्रकरणी सिक्युरिटीज मार्केटमध्ये व्यवहार करण्यास निर्बंध घातले आहेत. याशिवाय अमित बापना, रवींद्र सुधाकर आणि पिंकेश शाह यांच्यावरही सेबीनं अशीच कारवाई केलीय. ही कारवाई करताना सेबीकडे नोंदणीकृत असलेल्या कोणतीही कंपनी, मध्यस्थ किंवा अशा कंपनीच्या संचालक-प्रवर्तकांशी व्यवहार करण्यास निर्बंध घालण्यात आलेत. निधी जमा करण्याच्या उद्देशानं असे व्यवहार करता येणार नाहीत, असे सेबीच्या 100 पानांच्या अंतरिम आदेशात म्हटलं आहे.
सेबीने (Sebi) आपल्या अंतरिम आदेशात म्हटले आहे की, 'सेबीमध्ये नोंदणीकृत कोणत्याही मध्यस्थांशी, कोणत्याही सूचीबद्ध सार्वजनिक कंपनीशी किंवा कोणत्याही सार्वजनिक कंपनीचे कार्यवाहक संचालक किंवा प्रवर्तक, जे भांडवल उभारण्याचा प्रयत्न करीत आहेत, त्यांच्याशी संबंधित घटकांशी स्वतःला जोडण्यास मनाई आहे." हे निर्बंध पुढील आदेशापर्यंत कायम राहणार आहेत.
रिलायन्स होम फायनान्सची स्थिती
सेबीने अनिल अंबानी (Anil Ambani) आणि त्यांची कंपनी रिलायन्स होम फायनान्स (Reliance Home Finance) लिमिटेडवर कथित फसवणूक केल्याप्रकरणी सिक्युरिटीज मार्केटमध्ये व्यवहार करण्यास बंदी घातली आहे. अनिल अंबानी यांच्या बंदी घातलेल्या कंपनी रिलायन्स होम फायनान्सच्या शेअर्सवर खूप दबाव आहे. आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी, शेअरची किंमत 1.40 टक्क्यांनी घसरून 4.93 रुपयांवर होती. कंपनीचे बाजार भांडवल 238.89 कोटी रुपये आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
- Covid19 Vaccine : फायझर लसीच्या पाच वर्षाखालील मुलांवरील वापरासाठी प्रतिक्षा, मंजुरीसाठी अधिक माहिती गरजेची : FDA
- Health Tips : अनोशेपोटी खा मनुका, होतील 'हे' फायदे
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha