एक्स्प्लोर
एसबीआयकडून गृहकर्जाच्या व्याजदरात कपात
मुंबई: देशातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या एसीबीआयनं आपल्या ग्राहकांना खास भेट दिली आहे. एसबीआयनं 75 लाखांच्यावर असलेल्या गृहकर्जच्या व्याजदरात 0.10 टक्के कपात केली आहे. नवे दर 15 जूनपासून लागू होणार आहे. गृहकर्जाच्या बाबतीत एसबीआयचा व्याजदर सर्वात कमी आहे.
एसबीआयच्या या नव्या निर्णयानं कर्मचारी महिलांना फायदा मिळणार आहे. 8.55 टक्के गृहकर्जावर त्यांना व्याजदर असणार आहे. तर इतर महिलांसाठी गृहकर्जावर 8.60 टक्के व्याजदर असणार आहे.
दरम्यान, मागील महिन्यातच म्हणजेच मे 2017 मध्ये 30 लाखांपर्यंतच्या गृहकर्जाच्या व्याजदरात 0.25 टक्के कपात करुन व्याजदर 8.35 टक्के केलं होतं. तसंच 30 लाखाहून अधिक गृहकर्जाच्या व्याजदरातही 0.10 टक्के कपात केली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement