एक्स्प्लोर
एसबीआयच्या बेस रेटमध्ये कपात, कर्ज स्वस्त होणार
![एसबीआयच्या बेस रेटमध्ये कपात, कर्ज स्वस्त होणार Sbi Cuts Lending Rates Latest Updates एसबीआयच्या बेस रेटमध्ये कपात, कर्ज स्वस्त होणार](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/04/03202751/SBI.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली : स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. एसबीआयने बेस रेटमध्ये 0.15 टक्क्यांनी कपात केली आहे. त्यामुळे एसबीआयच्या कर्जाचं बेस रेट आता 9.25 वरुन 9.10 टक्के झालं आहे.
बेस रेट कमी केल्याने कर्जदारांच्या व्याजात कपात होऊन, कर्ज स्वस्त होईल. एसबीआयचे नवे व्याजदर एक एप्रिलपासून लागू होणार आहेत.
कुणाला थेट फायदा?
एसबीआयच्या बेस रेटमध्ये घट करण्याचा फायदा बँकांच्या जुन्या ग्राहकांना मिळेल आणि त्यांच्या होम लोनचे व्याज दर 9.25 टक्क्यांहून 9.10 टक्के होईल. बेस रेट स्वस्त झाल्याने ग्राहकांचे होम लोन, कार लोन, पर्सनल लोन, बिझनेस लोन इत्यादींवरील व्याज दर कमी होतील. एसबीआयच्या बेस रेटमधील कपातीमुळे कर्जाच्या ईएमआयमध्ये वर्षाकाठी किमान 2 हजार रुपये बचत होतील.
नव्या ग्राहकांसाठी काय?
एसबीआयने MCLR मध्ये कपात केली नाही. त्यामुळे नव्या ग्राहकांना स्वस्त कर्जाचा फायदा मिळणार नाही. कारण नव्या ग्राहकांच्या कर्जावरील व्याज MCLR च्या मार्फत निश्चित होतं. सध्या एसबीआयचं 1 वर्षांसाठीचं MCLR 8 टक्के आणि 2 वर्षांसाठीचं MCLR 8.1 टक्के आहे.
बेस रेट म्हणजे काय?
बँकांमध्ये एक किमान दर असतात, ज्यांवर आधारित बँका आपल्या ग्राहकांना सर्व प्रकारचे कर्ज देतात, त्या दरांना बेस रेट म्हणतात. कोणतीही बँक बेस रेटपेक्षा कमी दरात ग्राहकांना कर्ज देऊ शकत नाहीत. याची खबरदारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून घेतली जाते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)