एक्स्प्लोर

RBI Governor Salary : 450 कोटींची बंगला अन् लाखोंचा पगार, RBI गव्हर्नरची कमाई किती? कोणत्या सुविधा मिळतात? 

RBI Governor Sanjay Malhotra : आरबीआयचे नवे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांना तीन वर्षांचा कार्यकाळ मिळणार आहे. त्यानंतर केंद्र सरकार त्यांचा कार्यकाल वाढवू शकते. 

RBI Governor : शक्तिकांत दास आरबीआयच्या गव्हर्नरपदावरून निवृत्त होत असून आता त्या जागी आता संजय मल्होत्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते 11 डिसेंबर रोजी आरबीआय गव्हर्नरपदाचा पदभार स्वीकारणार आहेत. संजय मल्होत्रा हे 1990 च्या बॅचचे आयएएस अधिकारी असून सध्या ते महसूल विभागाचे सचिव म्हणून काम पाहतात. देशातील बँकिंग व्यवस्थेतील सर्वोच्च पद समजल्या आरबीआयच्या गव्हर्नरला सरकारकडून मोठ्या सुविधा देण्यात येतात. तसेच त्यांना लाखोंचा पगारही देण्यात येतो. 

आरबीआय गव्हर्नरला कोणत्या सुविधा? 

आरबीआय गव्हर्नरला मुंबईतील मलबार हिल या उच्चभ्रू परिसरात राहण्यासाठी बंगला दिला जातो. तो बंगला प्रशस्त आणि आलिशान आहे. हा बंगला सर्वसुविधांनी युक्त असा आहे.आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी एका यूट्यूब चॅनेलला मुलाखत देताना सांगितलं होतं की, गव्हर्नरला जो बंगला दिला जातो तो विकला तर त्याची किंमत 450 कोटींहून अधिक होते. 

आरबीआय गव्हर्नरचा पगार किती?

निवृत्त होत असलेले गव्हर्नर शक्तिकांत दास यांना 2.5 लाख रुपये वेतन असल्याची माहिती एका माहितीच्या अधिकारातून समोर आली होती. त्या आधीचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनाही तितकेच वेतन होतं. आरबीआयच्या डेप्युटी गव्हर्नरला 2.25 लाख इतकं वेतन तर एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरला 2.16 लाख रुपये इतकं वेतन मिळतं.  

RBI चे नवे गव्हर्नर संजय मल्होत्रा ​​कोण आहेत?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे नवे गव्हर्नर संजय मल्होत्रा ​​यांनी आयआयटी-कानपूरमधून शिक्षण पूर्ण केले आहे. याशिवाय त्यांनी अमेरिकेच्या प्रिन्स्टन विद्यापीठातून पब्लिक पॉलिसी या विषयात पदव्युत्तर पदवीही मिळवली आहे. संजय मल्होत्रा ​​हे राजस्थान केडरचे 1990 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. आपल्या 33 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी ऊर्जा, वित्त आणि कर, माहिती तंत्रज्ञान, खाणकाम अशा विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट काम केलं आहे. सध्या ते अर्थ मंत्रालयात महसूल सचिव म्हणून कार्यरत आहेत. याआधी ते वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत वित्तीय सेवा विभागाचे सचिव पदावर होते.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kerala : केरळमध्ये यूडीएफ सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांसह 21जणांचा शपथविधी, राज्यपालांकडे यादी सोपवली
केरळमध्ये यूडीएफ सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांसह 21जणांचा शपथविधी, राज्यपालांकडे यादी सोपवली
सीबीआयचे ट्युशन संचालकाच्या कार्यालयात छापे, NEET पेपरफुटीप्रकरणात लातूरमध्ये पुन्हा झाडाझडती; कागदपत्रे जप्त
सीबीआयचे ट्युशन संचालकाच्या कार्यालयात छापे, NEET पेपरफुटीप्रकरणात लातूरमध्ये पुन्हा झाडाझडती; कागदपत्रे जप्त
22 लाख विद्यार्थ्यांची फसवणूक, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांना पदावरुन हटवा, राहुल गांधी आक्रमक, पंतप्रधान मोदींना विचारले 3 प्रश्न 
22 लाख विद्यार्थ्यांची फसवणूक, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांना पदावरुन हटवा, राहुल गांधी आक्रमक, पंतप्रधान मोदींना विचारले 3 प्रश्न 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 मे 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 मे 2026 | रविवार

व्हिडीओ

Special Report Petrol Issue : इंधन टंचाईचा फटका, पेट्रोल पंपावर रांगा, पेट्रोलसाठी हाणामारी
Special Report Parth Pawar Meet Fadnavis : वर्षावर पार्थ भेटीमागचा अर्थ? देवेंद्र फडणवीस म्हणाले...
Amit Thackeray on NEET Paper Leak : अजून किती खालची पातळी गाठणार हे सरकार? अमित ठाकरेंची टीका
Bachchu Kadu on Eknath Shinde : अवघ्या महाराष्ट्राला शिंदे मुख्यमंत्री व्हावेत असं वाटतं, बच्चू कडूंच्या विधानानंतर भाजपचा पहिला पलटवार
Sambhajinagar : संभाजीनगरमध्ये गेल्या ८ वर्षापासून अभिनव उपक्रम; उद्योजक, विद्यार्थी करतात स्वच्छता

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kerala : केरळमध्ये यूडीएफ सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांसह 21जणांचा शपथविधी, राज्यपालांकडे यादी सोपवली
केरळमध्ये यूडीएफ सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांसह 21जणांचा शपथविधी, राज्यपालांकडे यादी सोपवली
अभिनेत्री उषा चव्हाण यांना एकनाथ शिंदेंचा फोन; पुण्यातील जमीन प्रकरणात दिलासा, तात्पुरती स्थगिती देण्याचे निर्देश
अभिनेत्री उषा चव्हाण यांना एकनाथ शिंदेंचा फोन; पुण्यातील जमीन प्रकरणात दिलासा, तात्पुरती स्थगिती देण्याचे निर्देश
सीबीआयचे ट्युशन संचालकाच्या कार्यालयात छापे, NEET पेपरफुटीप्रकरणात लातूरमध्ये पुन्हा झाडाझडती; कागदपत्रे जप्त
सीबीआयचे ट्युशन संचालकाच्या कार्यालयात छापे, NEET पेपरफुटीप्रकरणात लातूरमध्ये पुन्हा झाडाझडती; कागदपत्रे जप्त
Gopichand Padalkar : नरेंद्र मोदींचं आवाहन, चारचाकी वाहन सोडून गोपीचंद पडळकर-सदाभाऊ खोत यांचा सांगलीच्या फेमस टांग्यातून पाच किलोमीटर प्रवास
मोदींची साद, भाजप नेत्यांचा प्रतिसाद, अलिशान वाहनांच्या ताफ्याला फाटा, गोपीचंद पडळकर-सदाभाऊ खोत यांचा टांग्यातून प्रवास
Donald Trump Threat to Iran : घड्याळाची टिक टिक सुरु, हालचाल सुरु करा अन्यथा काहीच राहणार नाही, ट्रम्प यांची इराणला धमकी
घड्याळाची टिक टिक सुरु, हालचाल सुरु करा अन्यथा काहीच राहणार नाही, ट्रम्प यांची इराणला धमकी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 मे 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 मे 2026 | रविवार
भिवंडी-अहिल्यानगर बसचा भीषण अपघात, एसटीचा भुगाच; चालकासह एका प्रवाशाचा मृत्यू, 20 जण जखमी
भिवंडी-अहिल्यानगर बसचा भीषण अपघात, एसटीचा भुगाच; चालकासह एका प्रवाशाचा मृत्यू, 20 जण जखमी
Petrol Diesel : रशियन तेल खरेदीची सूट अमेरिकेकडून रद्द, भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर पुन्हा वाढण्याचं संकट
रशियन तेल खरेदीची सूट अमेरिकेकडून रद्द, भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर पुन्हा वाढण्याचं संकट
Embed widget