Veerappan Daughter Vidya Rani : चंदनतस्कर वीरप्पनची मुलगी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात, 'या' जागेवरून निवडणूक लढवणार!
वीरप्पन याची मुलगी विद्या राणी लोकसभा निवडणूक लढवणार आहेत.
तमिळनाडू : कुख्यात चंदन तस्कर वीरप्पन (Veerappan) याची मुलगी विद्या राणी (Vidya Rani) यांनी लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) उडी घेतली आहे. त्या तमिळनाडूतील कृष्णगिरी (Krishnagiri) या जागेवरून निवडणूक लढवणार आहेत. त्यांना नाम तमिझार काची (एनटसी) या पक्षाने तिकीट दिले आहे.
भाजपला रामराम, एनटीसीमध्ये प्रवेश
विद्या राणी यांनी 2020 मध्ये भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला होता. त्यांना तमिळनाडू भाजपच्या युवा शाखेचे अध्यक्षपद देण्यात आले होते. मात्र काही दिवसांपूर्वी त्यांनी भाजपला रामराम ठोकत एनटीसी पक्षात प्रेवश केला होता. याच पक्षाकडून आता त्या लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत.
एनटीसीने 40 उमेदवारांची घोषणा केली.
एनटीसी पक्षाने तमिळनाडूत एकूण 40 उमेदवारांची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे या 40 उमेदवारांत अर्धे उमेदवार महिला आहेत. यात विद्या राणी यांचाही समावेश आहे. गेल्या अनेक वर्षांपासून विद्या राणी या राजकारणात सक्रिय आहेत.
विद्या राणी-वीरप्पन यांची आयुष्यात एकदाच भेट
कृष्णागिरी या भागात त्या एक शाळा चालवतात. बंगळुरू शहरात त्यांनी पाच वर्षे वकिलीचे शिक्षण घेतलेले आहे. विद्या राणी त्यांचे वडील वीरप्पन यांच्याशी आयुष्यात फक्त एकदाच भेटल्याचे म्हटले जाते. विद्या राणी यांचे वडील वीरप्पन हा चंदन तस्कर होता. दोन दशकांपूर्वी स्पेशल टास्क फोर्सने केलेल्या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला होता.
हेही वाचा :
अरुण गोविलच नाही तर रामायण-महाभारत मालिकेतील हे कलाकारही होते निवडणुकीच्या रणांगणात
भर लोकसभा निवडणुकीत ईडी, सीबीआय, आयटीकडून विरोधी आघाडीतील नेत्यांसह नातेवाईकांच्या घरावर छापेमारी!