एक्स्प्लोर
आम्ही मुख्यमंत्री अखिलेश यादवांच्या सोबत: अबू आझमी
मुंबई: उत्तरप्रदेशमधील अभूतपूर्व यादवीनं तिथं चांगलीच उलथापालथ झाली आहे. मुख्यमंत्री अखिलेश यादव यांची पक्षातून करण्यात आलेल्या हकालपट्टीनंतर आता त्याचे पडसाद पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्रातील समाजवादी पक्षाचे नेते आणि आमदार अबू आझमी यांनी आपण आणि महाराष्ट्र सपा अखिलेश यादव यांच्यासोबत असल्याचं 'एबीपी माझा'शी बोलताना स्पष्ट केलं.
'मी देशात सांप्रदायिक शक्तींना वाढू देणार असं म्हणणारे मुलायम सिंह यांच्या या निर्णयानं मला फार दु:ख झालं आहे. नेताजींनी एवढा कठोर निर्णय घेतल्यानं पक्षाचा कमकुवतापणा समोर आता आला आहे. तसंच यामुळे सांप्रदायिक शक्तींना याचा फायदा होणार आहे.' असं म्हणत अबू आझमी यांनी अखिलेश यादव यांना साथ दिली आहे.
'सध्या नेताजी जास्त अॅक्टिव्ह नसतात. ते जास्त निर्णयही घेत नाही. त्यामुळे आम्ही रामगोपाल यादव यांच्याशी चर्चा करुन पुढील निर्णय घेऊ. दरम्यान, अखिलेश यांच्यासोबत मीच काय तर संपूर्ण देश आहे.' असंही अबू आझमी म्हणाले.
'अखिलेश यादव नेताजींचाच मुलगा आहे. त्यामुळे जे काही भांडण होतं ते चार भिंतींमध्ये सोडवणं गरजेचं होतं. पण दुर्दैवानं तसं काहीच झालं नाही. त्यामुळे ही दुर्देवी गोष्ट पाहावी लागते आहे.' असं मत अबू आझमी यांनी व्यक्त केलं आहे.
संबंधित बातम्या:
मुख्यमंत्री अखिलेश यादवांची समाजवादी पक्षातून 6 वर्षांसाठी हकालपट्टी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
बातम्या
Advertisement