Russia Ukraine War: भारतामुळे रशिया-युक्रेन युद्ध सहा तास थांबलं; सुरक्षा विश्लेषक नितीन गोखलेंचा दावा
Russia Ukraine War: खारकिव्हमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुरक्षितपणे बाहेर पडण्यासाठी रशियाने सहा तास युद्ध थांबवल्याचं जाहीर केलं.
Russia Ukraine Crisis: रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी अमेरिका, युरोपियन युनियन तसेच अनेक देशांचे प्रयत्न सुरू आहेत. पण जे या बलाढ्य देशांना जमलं नाही ते भारताने करून दाखवलं. खारकिव्हमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुरक्षितपणे बाहेर जाण्यासाठी रशियाने तब्बल सहा तास युद्धबंदीची घोषणा केली आहे असा दावा राष्ट्रीय सुरक्षा विश्लेषक आणि आंतरराष्ट्रीय अभ्यासाचे जाणकार असलेले नितीन गोखले यांनी केला आहे. त्यामुळे या ठिकाणी अडकलेले भारतीय विद्यार्थी आजूबाजूच्या देशांच्या सीमेपर्यंत पोहोचू शकतील.
पंतप्रधान मोदींची पुतिन यांच्याशी चर्चा
बुधवारी रात्री पंतप्रधान मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतिन यांच्याशी फोनवरून चर्चा केली. यावेळी मोदींनी युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेविषयी चिंता व्यक्त केली होती. खारकिव्हमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांचा युक्रेनच्या सैन्याकडून सुरक्षा ढालीसारखा वापर केला जात आहे असं पुतिन म्हणाले. पुतिन यांनी या विद्यार्थ्यांना सर्व प्रकारची मदत करण्याचं आश्वासन दिलं.
भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी रशियाने सहा तास युद्धबंदीची घोषणा केली आहे. या दरम्यान, भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी रशिया सैन्याकडून एक कॉरिडॉर करण्यात येणार असल्याचंही पुतिन यांनी सांगितलं.
The Russians apparently agreed to a six hour window for allowing safe passage to all Indians in Kharkiv before an all-out assault begins tonight . The deadline is 2130 IST, about 3 hours from now. #UkraineWar
— Nitin A. Gokhale (@nitingokhale) March 2, 2022
युक्रेनच्या खारकिव्हमध्ये अजूनही हजारो विद्यार्थी अडकल्याची माहिती समोर येत आहे. काही भारतीयांनी सांगितलं की, युक्रेनच्या सैन्याकडून भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर पडू दिलं जात नाही.
दरम्यान, भारतीय विद्यार्थ्यांनी बाहेर जाणाऱ्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न केला तर गोळ्या घातल्या जातील, अशी धमकी देत भारतीय महिलांना युक्रेनमध्ये मारहाण करण्यात आल्याचा दावा एका विद्यार्थीनीने केला आहे.
संबंधित बातम्या:
- Russia Ukraine War : ट्रेनमध्ये चढलात तर गोळ्या घातल्या जातील, युक्रेन नागरिकांकडून धमकावल्याचा भारतीय विद्यार्थिनीचा दावा
- Russia-Ukraine Crisis : पंतप्रधान मोदी युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी 'आशेचा पूल', पियुष गोयल यांच्याकडून OperationGanga चे कौतुक
- पुतिन यांना युद्ध थांबवण्याचा आदेश देऊ शकत नाही, केंद्रानेच युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना मदत करावी; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश