एक्स्प्लोर

'इन्फोसिसच्या माध्यमातून देशविरोधी शक्ती काम करत नाहीत ना?' RSSच्या मुखपत्रातून टीका, नंतर यू टर्न

इन्फोसिसच्या (Infosys) माध्यमातून देशविरोधी शक्ती काम करत नाहीत ना? असा सवाल संघाचं मुखपत्र असलेल्या 'पांचजन्य' (RSS magazine Panchjanya)या साप्ताहिकातून विचारण्यात आला आहे.

मुंबई : इन्फोसिसच्या माध्यमातून देशविरोधी शक्ती काम करत नाहीत ना? असा सवाल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुखपत्र असलेल्या 'पांचजन्य' या साप्ताहिकातून विचारण्यात आला आहे. जीएसटी पोर्टलमधल्या तांत्रिक त्रुटींवर बोट ठेवत पांचजन्यनं इन्फोसिसवर ही शंका उपस्थित केली आहे. इन्फोसिसवर नक्षली, तुकडे-तुकडे टोळीला मदत केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. मात्र आमच्याकडे पुरावे नाहीत, असंही पांचजन्यमध्ये सांगितलं आहे. तर पांचजन्य या मुखपत्रातील या लेखामध्ये मांडण्यात आलेले विचार हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित नाहीत, असं म्हणत RSSनं यू टर्न घेतला आहे. 

जीएसटी आणि प्राप्ती कर पोर्टलमध्ये येणाऱ्या तांत्रिक अडचणींच्या अनुषंगाने इन्फोसिसवर या लेखात टीका करण्यात आली आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेला मुद्दामहून अस्थिर करण्याचा हा प्रयत्न असू शकतो, असा आरोप  पांचजन्यच्या लेखात आहे. 'साख और आघात' या मुखपृष्ठ लेखात ही टीका करण्यात आली असून मुखपृष्ठावर इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांचे छायाचित्रही प्रसिद्ध केले आहे.  

लेखात म्हटलं आहे की,‘इन्फोसिस’ने तयार केलेल्या या दोन पोर्टलमध्ये नेहमी तांत्रिक अडचणी येतात. त्यामुळे करदाते व गुंतवणूकदार यांची गैरसोय होते. अशा बाबींमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवरचा करदात्यांचा विश्वास कमी होतो.सरकारी संस्था महत्त्वाची संकेतस्थळे आणि पोर्टलची कंत्राटे इन्फोसिसला देताना मागेपुढे पाहत नाहीत, कारण ती एक नामवंत सॉफ्टवेअर कंपनी आहे. जीएसटी आणि प्राप्तिकर विवरण पत्रे यांची पोर्टल्स इन्फोसिसने विकसित केली आहेत. करदात्यांचा भारतीय अर्थव्यवस्थेवरचा विश्वास कमी होण्यास यामुळे मदतच होत आहे. भारतीय आर्थिक हिताविरोधात इन्फोसिसच्या माध्यमातून कुणी देशविरोधी शक्ती तर काम करीत नाहीत ना अशी शंका लेखात व्यक्त केली आहे. इन्फोसिसने अनेकदा नक्षलवादी, डावे, टुकडे-टुकडे टोळी यांना मदत केली असल्याचे आरोप आहेत, पण त्याचे पुरावे आमच्याकडे नाहीत. इन्फोसिस ही कंपनी परदेशी ग्राहकांना अशीच वाईट सेवा देते का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.  

आरएसएसचा यू टर्न
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनिल आंबेकर यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, एक भारतीय कंपनी म्हणून इन्फोसिसचं भारताच्या विकासात महत्वाचं योगदान आहे. या कंपनीकडून ऑपरेट होणाऱ्या इन्कम टॅक्सच्या पोर्टलमध्ये काही अडचणी निर्माण झाल्या. त्यावरुन पांचजन्य या आमच्या मुखपत्रातून प्रसिद्ध झालेल्या लेखामध्ये मांडण्यात आलेले विचार हे लेखकाचे वैयक्तिक विचार आहेत, ते पांचजन्यचे विचार नाहीत. त्यामुळे या लेखामध्ये मांडण्यात आलेले विचार हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित नाही, असं आंबेकर यांनी म्हटलं आहे. 

>

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Gas Shortage: गॅस टंचाईवर मोदी सरकारचे महत्वाचे आदेश, महाराष्ट्रासह देशभरात सध्या परिस्थिती काय, कुठे कुठे गॅसची कपात?, A टू Z माहिती
गॅस टंचाईवर मोदी सरकारचे महत्वाचे आदेश, महाराष्ट्रासह देशभरात सध्या परिस्थिती काय, कुठे कुठे गॅसची कपात?, A टू Z माहिती
LPG Gas Shortage: हॉटेल-दुकानं बंद, कुठे लाकडी भट्टी सुरु; धाराशिव, सोलापूर, सातारामध्ये महत्वाचे निर्णय, गॅस टंचाईमुळे महाराष्ट्रात चिंताजनक स्थिती, A टू Z माहिती
LPG Gas Shortage: हॉटेल-दुकानं बंद, कुठे लाकडी भट्टी सुरु; धाराशिव, सोलापूर, सातारामध्ये महत्वाचे निर्णय, गॅस टंचाईमुळे महाराष्ट्रात चिंताजनक स्थिती, A टू Z माहिती
चांदीच्या दरानं गाठला उच्चांक, एकाच दिवसात दरात 10 हजार 400 रुपयांची वाढ, सोन्याच्या दरालाही झळाळी
चांदीच्या दरानं गाठला उच्चांक, एकाच दिवसात दरात 10 हजार 400 रुपयांची वाढ, सोन्याच्या दरालाही झळाळी
इराण इस्त्रायल युद्धाचा हॉटेल व्यवसायिकांना फटका, जाणीपूर्वक गॅसचा तुटवडा निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करा, बावनकुळेंचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश 
इराण इस्त्रायल युद्धाचा हॉटेल व्यवसायिकांना फटका, जाणीपूर्वक गॅसचा तुटवडा निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करा, बावनकुळेंचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश 

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar Politics : फोडाफोडीचा मॅटर, फकडली कॉलर Special Report
Iran Israel Effect On Industry : गॅस रखडला, उद्योगांचा श्वास कोंडला Special Report
LPG Gas Shortage In Hotels : व्यावसायिक गॅस मिळेना, हॉटेलमध्ये काही शिजेना Special Report
Nagpur Buffalo Attack : अगं अगं म्हशी; वळूनंतर आता मारकुट्या म्हशीचा धुमाकूळ Special Report
Sunetra Pawar On Womens : लाडकी वहिनी, लाभार्थी सरकारी बहिणी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Badlapur Uterine Eggs Selling Racket: नाशिकमधील आयव्हीएफ सेंटरमधून 96 महिलांचं बीज खरेदी, एकाच महिलेची बीजांडं जास्तवेळा काढल्याचा संशय, डॉ. अमोल पाटील पोलिसांच्या ताब्यात
नाशिकमधील आयव्हीएफ सेंटरमधून 96 महिलांचं बीज खरेदी, एकाच महिलेची बीजांडं जास्तवेळा काढल्याचा संशय, डॉ. अमोल पाटील पोलिसांच्या ताब्यात
Pimpri-Chinchwad News: मोठी बातमी: युद्धामुळे केटरर्सकडे गॅसचा प्रचंड तुटवडा, राज्यातील 10 हजार लग्नं पुढे ढकलावी लागणार, जेवणाचा दरही महागणार?
युद्धामुळे केटरर्सकडे गॅसचा प्रचंड तुटवडा, राज्यातील 10 हजार लग्नं पुढे ढकलावी लागणार, जेवणाचा दरही महागणार?
Mumbai Crime: फजल म्हणाला, तू एक दिवस फ्रिजमध्ये सापडशील, मुंबईच्या डॉ. स्तुती सोनावणेचा छळाला कंटाळून टोकाचा निर्णय
फजल म्हणाला, तू एक दिवस फ्रिजमध्ये सापडशील, मुंबईच्या डॉ. स्तुती सोनावणेचा छळाला कंटाळून टोकाचा निर्णय
Maharashtra Weather Update: मुंबईत उष्णतेच्या लाटा, विदर्भ मराठवाड्यात वादळी पावसाचे इशारे, हवामान विभागाचा अंदाज काय?
मुंबईत उष्णतेच्या लाटा, विदर्भ मराठवाड्यात वादळी पावसाचे इशारे, हवामान विभागाचा अंदाज काय?
Sunetra Pawar: अजितदादांचं नाव येताच सुनेत्रा पवार भावुक, शेजारी बसलेल्या आदिती तटकरेंच्या डोळ्यातही पाणी  
अजितदादांचं नाव येताच सुनेत्रा पवार भावुक, शेजारी बसलेल्या आदिती तटकरेंच्या डोळ्यातही पाणी  
JNPA निर्णयामुळे निर्यातदारांना दिलासा; अडकलेल्या फळे-भाजीपाला कंटेनरवरील साठवण शुल्क माफ
JNPA निर्णयामुळे निर्यातदारांना दिलासा; अडकलेल्या फळे-भाजीपाला कंटेनरवरील साठवण शुल्क माफ
Gas Shortage : गॅस टंचाईवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; घरगुती गॅसला प्राधान्य, नंतर खते, उद्योग आणि व्यावसायिक पुरवठा
गॅस टंचाईवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; घरगुती गॅसला प्राधान्य, नंतर खते, उद्योग आणि व्यावसायिक पुरवठा
'तन्वी स्मोक करून जवळ यायची...' रुचिता जामदारचा खळबळजनक खुलासा, तन्वीची पोलखोल करत म्हणाली..
'तन्वी स्मोक करून जवळ यायची...' रुचिता जामदारचा खळबळजनक खुलासा, तन्वीची पोलखोल करत म्हणाली..
Embed widget