एक्स्प्लोर
नागपुरात संघाच्या पथसंचलनाला सुरुवात, नव्या गणवेशात पहिल्यांदाच संचलन
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दसऱ्याच्या पथसंचलनाला नागपुरात सुरुवात झाली आहे. यावेळी प्रथमच नव्या गणवेशात स्वयंसेवकांच पथसंचलन होत आहे. यात स्वयंसेवकांचं व्यावसायिक गट आणि महाविद्यालयीन गटात पथसंचलन होणार आहे.
संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना स्वयंसेवकांनी सलामी दिली आहे. रेशीमबागेत होणाऱ्या या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. तसंच भारतीय आर्थिक सेवेतून निवृत्त झालेले सत्यप्रकाश राय हे प्रमुख पाहुणे म्हणून या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यावर्षी संघाच्या पथसंचलनात दुप्पट स्वयंसेवक सहभागी होणार आहेत. आतापर्यंत संघाच्या स्वयंसेवकांचे जवळपास 10 हजार गणवेश विकले गेले आहेत. संघाच्या पथसंचलनानंतर व्यायाम, योग, दंड, घोष, सांघिक गीत हे कार्यक्रम सादर करण्यात येणार आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement