एक्स्प्लोर

सर्जिकल स्ट्राईकच्या रात्रीचा थरार, जसाच्या तसा...

सर्जिकल स्ट्राईक आटोपून जेव्हा भारतीय लष्कराचे जवान माघारी परतत होते त्यावेळी अचानक पाकिस्तानी लष्कराकडून गोळीबार सुरु झाला. यात काही गोळ्या जवानांच्या अगदी कानाच्या बाजूनं गेल्या होत्या.

नवी दिल्ली : भारतीय लष्करानं मागील वर्षी 28-29 सप्टेंबरला सीमेपार जाऊन पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे तळ उद्धवस्त करुन सर्जिकल स्ट्राईक केलं होतं. यात जवळजवळ 50हून अधिक अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला होता. पण सर्जिकल स्ट्राईक करणं आणि पुन्हा सुरक्षित माघारी परतणं हे लष्कराच्या जवानांसाठी वाटतं तेवढं सोपं नव्हतं. कारण सर्जिकल स्ट्राईक आटोपून जेव्हा भारतीय लष्कराचे जवान माघारी परतत होते त्यावेळी अचानक पाकिस्तानी लष्कराकडून गोळीबार सुरु झाला. यात काही गोळ्या जवानांच्या अगदी कानाच्या बाजूनं गेल्या होत्या. पण सुदैवानं कोणतीही जीवितहानी तेव्हा झाली नव्हती. सर्जिकल स्ट्राईक टीमचं नेतृत्व करणाऱ्या मेजर माइक टँगो (बदलेलं नाव) यांनी ‘इंडियाज मोस्ट फीयरलेस : ट्रू स्टोरीज ऑफ मॉडर्न मिलिट्री हीरोज’ या पुस्तकात सर्जिकल स्ट्राईकच्या त्या रात्रीचा थरार मांडला आहे. हे पुस्तक शिव अरुर आणि राहुल सिंह यांनी लिहलं आहे. यामध्ये सर्जिकल स्ट्राईकबाबतच्या 14 गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे. ‘उरी हल्ल्यात आपले जवान ज्या तुकडीनं गमावले होते. त्याच दोन तुकडीतील जवानांची सर्जिकल स्ट्राईकसाठी निवड करण्यात आली. कारण की, त्यांना सीमेपलिकडील भाग बऱ्यापैकी माहिती होता.’ असा उल्लेख या पुस्तकात करण्यात आला आहे. ‘या सर्जिकल स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या लाँचिंग पॅड्सवर हल्ला करण्याचं ठरलं होतं. पण या लाँचिंग पॅडसला पाकिस्तानी लष्कराचंही संरक्षण होतं. दहशतवाद्यांवर हल्ला करुन भारतीय जवान माघारी येत असताना पाकिस्तानी लष्कराला याची कुणकूण लागली आणि त्यांनी थेट गोळीबार सुरु केला. या हल्ल्यानं भारतीय जवान अजिबात घाबरले नाही. पण एलओसीजवळील रस्ता चढणीचा होता. त्यामुळे ज्या दिशेनं गोळीबार सुरु होता त्या दिशेकडे जवानांची पाठ होती. त्यामुळे भारतीय जवान थेट त्यांच्या टार्गेटवर होते.’ असं मेजर टँगो यांनी या पुस्तकात म्हटलं आहे. 'ज्या मार्गानं आम्ही पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसलो होतो त्याच मार्गानं परत न जाण्याचं ठरलं होतं. त्याऐवजी आम्ही दुसरा मार्ग निवडला होता. पण हा मार्ग बराच दूरवरचा आणि थोडा गुंतागुंतीचाही होता. पण तुलनेनं बऱ्यापैकी सुरक्षित होता. म्हणून आम्ही त्याची निवड केली होती. पण पाकिस्तानी लष्करानं त्याच दिशेनं गोळीबार सुरु केला. अनेकदा माझ्या कानाच्या बाजूनं काही गोळ्या गेल्या.' असा थरारक अनुभव मेजर टँगो यांनी सांगितला आहे. टीम लीडर म्हणून मेजर टँगो यांनीच जवानांची निवड केली होती. त्यामुळे 19 जवान सुखरुपपणे लष्कराच्या तळावर पोहचतील की नाही याची त्यांना भीती वाटत होती. आपण आपले जवान गमावू अशी भीती टँगो यांना वाटत होती. पण सुदैवानं भारतीय जवान पुन्हा सुखरुपणे आपल्या तळावर परतल्यानं टँगो यांनी सुटकेचा निश्वास सोडला. दहशतवाद्यांना पाकिस्तानी लष्कराकडून मदत मिळते ही गोष्ट आता जगजाहीर झाली आहे. सर्जिकल स्ट्राईकच्या वेळीही ही गोष्ट समोर आली आहे. सुत्रांच्या मते, दहशतवाद्यांना अशी अजिबात अपेक्षा नव्हती की, भारतीय लष्कर थेट आत घुसून मारा करतील. त्यामुळेच ते या हल्ल्यानं अवाक् झाले. संबंधित बातम्या :

सर्जिकल स्ट्राईक: भारतीय जवान नेमके कसे घुसले?

पाण्याचा थेंबही न पिता रात्रभर सर्जिकल ऑपरेशनवर मोदींचं वॉच

होय, आम्ही LOC पार करुन अतिरेक्यांचा खात्मा केला : इंडियन आर्मी सर्जिकल स्ट्राईक म्हणजे काय? ही कारवाई उरी हल्ल्यातील जवानांना श्रद्धांजली, कुटुंबीयांची भावना काश्मीर मांगो गे तो चीर देंगे, भाजप कार्यालयाबाहेर जल्लोष शांततेला आमचा दुबळेपणा समजू नका, पाकिस्तानच्या उलट्याबोंबा अभिनंदन मोदीजी… उद्धव ठाकरेंचा पंतप्रधानांना फोन सर्जिकल स्ट्राईक: वेळ आणि ठिकाण आठ दिवसांपूर्वीच ठरलं होतं!

महत्त्वाच्या बातम्या

Kolkata Tragedy : आईला मरताना पाहिलं, कोलकाता दुर्घटनेत सोनू पाल यानं जे भयावह दृश्य पाहिलं ते सांगितलं, मृतांची संख्या 19 वर 
आईला मरताना पाहिलं, कोलकाता दुर्घटनेत सोनू पाल यानं जे भयावह दृश्य पाहिलं ते सांगितलं, मृतांची संख्या 19 वर 
Gwalior Accident News: ग्वालियरमध्ये मृत्यूचा हाहाकार! काळ बनून आलेल्या अनियंत्रित ट्रकने भाविकांना चिरडले;15 जणांचा दुर्दैवी अंत, 39 जण गंभीर जखमी
ग्वालियरमध्ये मृत्यूचा हाहाकार! काळ बनून आलेल्या अनियंत्रित ट्रकने भाविकांना चिरडले;15 जणांचा दुर्दैवी अंत, 39 जण गंभीर जखमी
बाहेर पाऊस पडत होता, ऐकमेकांना ढकलाढकली सुरु होती, कोलकातामध्ये चेंगराचेंगरीचा घटना नेमकी कशी घडली?  
बाहेर पाऊस पडत होता, ऐकमेकांना ढकलाढकली सुरु होती, कोलकातामध्ये चेंगराचेंगरीचा घटना नेमकी कशी घडली?  
कोलकातामध्ये मोठी दुर्घटना, गर्दीमुळं दुर्गा पूजा मंडपात चेंगराचेंगरी, तब्बल 18 जणांचा मृत्यू, तर अनेकजण जखमी
कोलकातामध्ये मोठी दुर्घटना, गर्दीमुळं दुर्गा पूजा मंडपात चेंगराचेंगरी, तब्बल 18 जणांचा मृत्यू, तर अनेकजण जखमी

व्हिडीओ

Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha
SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
JIO IPO : जिओ आयपीओ : 5G नेटवर्क, ब्रॉडबँड आणि AI आधारित भारताच्या आगामी डिजीटल दशकात पाऊल टाकण्याचं तिकीट
जिओ आयपीओ : 5G नेटवर्क, ब्रॉडबँड आणि AI आधारित भारताच्या आगामी डिजीटल दशकात पाऊल टाकण्याचं तिकीट
Beed Accident: पालखी महामार्गावर भीषण अपघात; तुळजापूरला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, 5 जण जागीच ठार
पालखी महामार्गावर भीषण अपघात; तुळजापूरला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, 5 जण जागीच ठार
Chandrakant Patil : पुणे शिक्षकच्या निवडणुकीला पाच दिवस; राज्याचे त्रिमूर्ती नेते तोडगा काढतील, एकनाथ शिंदेंचा विषय सेटल होईल, भाजपला पाठिंबा मिळेल, चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य चर्चेत
पुणे शिक्षकच्या निवडणुकीला पाच दिवस; राज्याचे त्रिमूर्ती नेते तोडगा काढतील, एकनाथ शिंदेंचा विषय सेटल होईल, भाजपला पाठिंबा मिळेल, चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य चर्चेत
Shambhuraj Desai : पुणे पदवीधरच्या महायुतीच्या उमेदवार स्मिता जाधव शंभूराज देसाईंच्या भेटीला; भेटीनंतरही महायुतीतील धुसफूस कायम, देसाई म्हणाले...
पुणे पदवीधरच्या महायुतीच्या उमेदवार स्मिता जाधव शंभूराज देसाईंच्या भेटीला; भेटीनंतरही महायुतीतील धुसफूस कायम, देसाई म्हणाले...
पुण्यात ड्रेनेजच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून एकाचा मृत्यू; सुरक्षेच्या उपाययोजना नसल्याने दुर्घटना
पुण्यात ड्रेनेजच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून एकाचा मृत्यू; सुरक्षेच्या उपाययोजना नसल्याने दुर्घटना
Kolkata Tragedy : आईला मरताना पाहिलं, कोलकाता दुर्घटनेत सोनू पाल यानं जे भयावह दृश्य पाहिलं ते सांगितलं, मृतांची संख्या 19 वर 
आईला मरताना पाहिलं, कोलकाता दुर्घटनेत सोनू पाल यानं जे भयावह दृश्य पाहिलं ते सांगितलं, मृतांची संख्या 19 वर 
Ratnagiri Crime News: जवळच्या मित्राला अन् मैत्रिणीला मेसेज पाठवला; मध्यरात्री दोघं घरी आले, शोध घेतला पण..., घराजवळच बांधकामाच्या ठिकाणी आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं?
जवळच्या मित्राला अन् मैत्रिणीला मेसेज पाठवला; मध्यरात्री दोघं घरी आले, शोध घेतला पण..., घराजवळच बांधकामाच्या ठिकाणी आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं?
Gwalior Accident News: ग्वालियरमध्ये मृत्यूचा हाहाकार! काळ बनून आलेल्या अनियंत्रित ट्रकने भाविकांना चिरडले;15 जणांचा दुर्दैवी अंत, 39 जण गंभीर जखमी
ग्वालियरमध्ये मृत्यूचा हाहाकार! काळ बनून आलेल्या अनियंत्रित ट्रकने भाविकांना चिरडले;15 जणांचा दुर्दैवी अंत, 39 जण गंभीर जखमी
Embed widget