एक्स्प्लोर
Advertisement
नवी मुंबई स्वच्छ, तर भुसावळ अस्वच्छ शहरांच्या यादीत!
नवी दिल्ली: एकीकडे पुण्याचा उकीरडा झाला असताना, दुसरीकडे नवी मुंबई शहराचा मात्र देशातील स्वच्छ शहरांच्या यादीत टॉप टेनमध्ये समावेश झाला आहे.
स्वच्छ शहरांच्या यादीत नवी मुंबई देशात आठव्या स्थानावर आहे. या यादीत पहिला क्रमांक मध्य प्रदेशातील इंदूर शहराने मिळवला आहे.
दुसरीकडे अस्वच्छ शहरांच्या यादीत जळगाव जिल्ह्यातील भुसावळ हे दुसऱ्या क्रमांकावर आहे. यूपीतलं गोंडा हे सर्वात तळाला आहे.
यंदा स्वच्छ सर्वेक्षणात 434 शहरांचा सहभाग होता. स्वच्छ शहरांमध्ये पहिल्या 50 पैकी 12 शहरं ही गुजरातमधली आहेत .
तर उत्तर प्रदेश हे स्वच्छतेच्या बाबतीत सर्वात तळाला आहे. सर्वात अस्वच्छ शहरांमधे 20 शहरं एकट्या यूपीमधली आहेत
अर्थात वाराणसीचा क्रमांक मात्र मागच्यावेळी 400 च्या घरात होता, तो यावेळी 32 वर सुधारला आहे.
टॉप टेन स्वच्छ शहरं
- इंदूर- मध्य प्रदेश
- भोपाळ - मध्य प्रदेश
- विशाखापट्टणम - आंध्र प्रदेश
- सुरत- गुजरात
- म्हैसूर- कर्नाटक
- तिरुचिरापल्ली- तामिळनाडू
- नवी दिल्ली -
- नवी मुंबई - महाराष्ट्र
- तिरूपती - आंध्र प्रदेश
- बडोदा- गुजरात
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
सोलापूर
भविष्य
Advertisement