एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

क्षयरोगावरच्या BCG लसीच्या वापराने कोरोना रुग्णाचा श्वसनाचा त्रास कमी, संशोधन गटाचा दावा

हाफकिन रिसर्च इन्स्टिट्यूट आणि पुण्याच्या बीजे मेडिकल कॉलेजच्या संशोधकांच्या एका गटाने बीसीजी लसीचा वापर कोरोनाच्या रुग्णाला होऊ शकतो असा दावा केला आहे.याआधीही ICMR च्या एका संशोधनात असे सांगण्यात आले होते की BCG चा वापर रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी होऊ शकतो.

नवी दिल्ली: कोविडच्या रुग्णाला श्वसनाला अडचण येत असेल तर त्यावर बीसीजीच्या (BCG) लसीचा वापर करता येऊ शकेल असे एका संशोधनातून समोर आले आहे. परेलच्या हाफकिन रिसर्च इन्स्टिट्यूट आणि पुण्याच्या बीजे मेडिकल कॉलेजच्या संशोधकांच्या एका गटाने या संदर्भात एक संशोधन केले आहे. त्यात असे सांगण्यात आलंय की क्षयरोगावर वापरण्यात येणाऱ्या BCG लसीचा डोस कोरोनाच्या रुग्णाला दिला असता त्याची श्वसनाची अडचण दूर होते.

बीसीजीची ही लस अनेक दशकांपासून क्षयरोग प्रतिबंधक म्हणून लहान मुलांना देण्यात येते. या लसीचा कोरोनाच्या रुग्णांवर काही परिणाम होतो का हे तपासण्यासाठी या दोन संस्थांच्या संयुक्त संशोधन गटाने अभ्यास केला आहे.

या संशोधनासाठी 60 अशा कोरोना रुग्णांना बीसीजी लस देण्यात आली ज्यांना न्युमोनिया आणि श्वसनाचा त्रास होत होता. त्यापैकी अर्ध्या रुग्णांची श्वसनाची समस्या तीन ते चार दिवसांत कमी झाली. या रुग्णांपैकी कुणाच्याही मृत्यूची नोंद झाली नाही. परंतु ज्यांना या लसीचा डोस देण्यात आला नाही अशा दोन रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली.

या संशोधनाची अजून इतर तज्ञांकडून खातरजमा व्हायची आहे पण ज्यांना बीसीजीची ही लस देण्यात आली आहे त्यांच्या शरीरात प्रतिकारक शक्तीची वाढ झाल्याचे या संशोधकांनी नोंदवले आहे.

या संशोधनात असेही सांगितले आहे की कोरोना रुग्णाला बीसीजी लस देणे हे अत्यंत सुरक्षित आहे. कोरोना रुग्णाला देण्यात येणाऱ्या स्टॅन्डर्ड औषधांच्या सोबत याचा वापर केल्यास फायदा होईल. "आमचा अभ्यास असा सांगतोय की ज्या रुग्णाला आधी श्वसनाचा त्रास होत होता त्याचा त्रास तीन ते चार दिवसांत कमी झाला आणि न्युमोनियाही जलदगतीने बरा झाला. सोबतच रुग्णाच्या रोगप्रतिकारक शक्तीमध्ये वाढ झाल्याचेही दिसून आले आहे" असे हाफकिन रिसर्च इन्स्टिट्यूटच्या डॉ उषा पद्मनाभन यांनी सांगितले. "ही लस नेमकी कशी काम करते हा पुढील संशोधनाचा भाग आहे. यातून क्षय रोगाव्यतिरिक्त बीसीजीचा अविशिष्ट परिणाम इतर रोगांच्याही निदानासाठी होऊ शकतो" असेही त्या म्हणाल्या.

ज्या रुग्णांच्या शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण 94 टक्क्यांपेक्षा कमी झाले होते आणि त्यांना न्युमोनियाचा त्रास सुरु झाला अशाच रुग्णांवरती बीसीजी लसीचा वापर करण्यात आला.

बीजे मेडिकलचे डॉ. समिर जोशी म्हणाले, "ज्या रुग्णांना या लसीचा डोस देण्यात आला होता त्यांना साधारण 7 दिवसांपर्यंत हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले होते. परंतु ज्या रुग्णांना ही लस देण्यात आली नव्हती त्यांना सात दिवसांहून अधिक काळ हॉस्पिटलमध्ये रहावे लागले. विशेष म्हणजे बीसीजी लसीचा कोणताही दुष्परिणाम समोर आला नाही."

काही डॉक्टरांच्या मते या संशोधनातून जे निष्कर्ष काढण्यात आले आहेत ते पुरेसे नाहीत. याची खातरजमा करण्यासाठी बीसीजी लसीचा वापर मोठ्या लोकसंख्येवर करायला हवा. तसेच तज्ञांनी यावर अजून संशोधन करायला हवे.

BCG चा वापर रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी होऊ शकतो ICMR आणि चेन्नईच्या राष्ट्रीय क्षयरोग संशोधन संस्थेच्या एका संशोधकांच्या गटाने असा निष्कर्ष काढला आहे की क्षयरोगावर उपयुक्त असलेल्या बीसीजी (BCG) लसीचा वापराने वयोवृद्ध लोकांत रोगप्रतिकारक शक्ती वाढते. याचा वापर कोरोनाविरुध्द लढण्यास होऊ शकतो. BCG लसीचा परिणाम म्हणज शरीरात अनुकूल रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या नव्या सेल्स निर्माण होतात आणि त्या अँटीबॉडीची निर्मितीही करतात असे एका संशोधकांनी त्यांच्या अहवालात नमुद केले आहे.

महत्वाच्या बातम्या:

BCG लसीचा वापर वयोवृद्धांना कोरोनाविरोधात लढण्यासाठी प्रभावी, ICMR चे नवे संशोधन

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सरकारी नोकरीची संधी, 'असिस्टंट ऑफिसर' पदासाठी 50 जागांवर भरती, एनटीपीसीमध्ये आजच करा अर्ज
सरकारी नोकरीची संधी, 'असिस्टंट ऑफिसर' पदासाठी 50 जागांवर भरती, एनटीपीसीमध्ये आजच करा अर्ज
अहमदनगरमध्ये चेष्टा मस्करी जीवावर बेतली, मित्राकडून मित्राचा अनावधानाने खून; गुन्हा दाखल
अहमदनगरमध्ये चेष्टा मस्करी जीवावर बेतली, मित्राकडून मित्राचा अनावधानाने खून; गुन्हा दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स एका क्लिकवर, शनिवार 30 नोव्हेंबर 2024
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स एका क्लिकवर, शनिवार 30 नोव्हेंबर 2024
Shardul Thakur : कोण होतास, काय झालात तू, आयपीएलमध्ये कोणीच भाव देईना; शार्दूल ठाकूर सुद्धा 'पृथ्वी शॉ' होण्याच्या मार्गावर?
कोण होतास, काय झालात तू, आयपीएलमध्ये कोणीच भाव देईना; शार्दूल ठाकूर सुद्धा 'पृथ्वी शॉ' होण्याच्या मार्गावर?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit pawar On EVM : विरोधकांकडून नुसता रडीचा डाव सुरु आहे, अजितदादांचा हल्लाबोल #abpमाझाMahayuti Oath Ceremony :  5 डिसेंबरला संध्याकाळी 5 वाजता नव्या सरकारचा शपथविधीUddhav Thackeray On Mahayuti :विधानसभेची मुदत संपल्यानंतरही राष्ट्रपती राजवट का लागू केली नाही-ठाकरेMahadev Jankar Vs Raosaheb Danve : EVM हॅक करता येतं मी स्वत: इंजिनिअर : महादेव जानकर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सरकारी नोकरीची संधी, 'असिस्टंट ऑफिसर' पदासाठी 50 जागांवर भरती, एनटीपीसीमध्ये आजच करा अर्ज
सरकारी नोकरीची संधी, 'असिस्टंट ऑफिसर' पदासाठी 50 जागांवर भरती, एनटीपीसीमध्ये आजच करा अर्ज
अहमदनगरमध्ये चेष्टा मस्करी जीवावर बेतली, मित्राकडून मित्राचा अनावधानाने खून; गुन्हा दाखल
अहमदनगरमध्ये चेष्टा मस्करी जीवावर बेतली, मित्राकडून मित्राचा अनावधानाने खून; गुन्हा दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स एका क्लिकवर, शनिवार 30 नोव्हेंबर 2024
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स एका क्लिकवर, शनिवार 30 नोव्हेंबर 2024
Shardul Thakur : कोण होतास, काय झालात तू, आयपीएलमध्ये कोणीच भाव देईना; शार्दूल ठाकूर सुद्धा 'पृथ्वी शॉ' होण्याच्या मार्गावर?
कोण होतास, काय झालात तू, आयपीएलमध्ये कोणीच भाव देईना; शार्दूल ठाकूर सुद्धा 'पृथ्वी शॉ' होण्याच्या मार्गावर?
भुजबळांविरोधात निवडणूक लढलेल्या उमेदवाराच्या मनात शंकेची पाल चुकचुकली; माणिकराव शिंदेंनी घेतला मोठा निर्णय
भुजबळांविरोधात निवडणूक लढलेल्या उमेदवाराच्या मनात शंकेची पाल चुकचुकली; माणिकराव शिंदेंनी घेतला मोठा निर्णय
Amshya Padvi : आमश्या पाडवी यांच्यावर महिलेचा विनयभंगाचा आरोप, अक्कलकुव्यात भाजप अन् शिंदे  गटात राडा
आमश्या पाडवी यांच्यावर महिलेचा विनयभंगाचा आरोप, अक्कलकुव्यात भाजप अन् शिंदे गटात राडा
Australia Social Media Ban : तर 275 कोटींचा दंड! जगाला जमलं नाही ते ऑस्ट्रेलियानं करून दाखवलं; 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर नो एन्ट्री
तर 275 कोटींचा दंड! जगाला जमलं नाही ते ऑस्ट्रेलियानं करून दाखवलं; 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर नो एन्ट्री
राजभवनाऐवजी अमावस्येला पूजा-अर्चा करण्यासाठी शेतात गेले; पुण्यातून ठाकरेंचा टोला, आढाव यांचं उपोषण सुटलं
राजभवनाऐवजी अमावस्येला पूजा-अर्चा करण्यासाठी शेतात गेले; पुण्यातून ठाकरेंचा टोला, आढाव यांचं उपोषण सुटलं
Embed widget