प्रजासत्ताक दिनाचा नेमका इतिहास काय? कधीपासून साजरा केला जातो 'हा' दिवस?
Republic Day in India : दरवर्षी मोठ्या उत्साहात 26 जानेवाला प्रजासत्ताक दिन देशभर साजरा केला जातो. उद्या आपल्या देशाचा 76 वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जाणार आहे. या
Republic Day in India : दरवर्षी मोठ्या उत्साहात 26 जानेवाला प्रजासत्ताक दिन देशभर साजरा केला जातो. उद्या आपल्या देशाचा 76 वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर देशभर उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. दरम्यान, देशभरात हा दिन का साजरा केला जातो? हा दिन कधी पासून साजरा केला जातो? प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व काय? प्रजासत्ताक दिनाचा इतिहास काय? याबाबतची सविस्तर माहिती पाहुयात.
प्रजासत्ताक दिनाचा इतिहास काय?
आपल्या भारत देशाला 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजांच्या राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाले होते. दीडशे वर्षांच्या संघर्षानंतर भारतातील इंग्रजांच्या राजवटीचा अंत झाला होता. ज्यावेळी देशाला स्वातंत्र्य मिळाले तेंव्हा देशभरात इंग्रजांनी स्थापन केलेली राज्यव्यवस्था आणि प्रशासन व्यवस्था होती. स्वातंत्र्यानंतर भारतीयांनी स्वतःची राज्यव्यवस्था स्थापन करण्यासाठी 'संविधान सभे'ची स्थापना केली. देशासाठी संविधान तयार करण्याचे काम या संविधान सभेचे होते संविधान सभेने तयार केलेले संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीयांनी स्वीकारले. त्यावेळी संविधानातील काही कलमे लागू झाली होती पण पूर्ण सविंधान लागू झाले नव्हते. नंतर 26 जानेवारी 1950 रोजी 'भारतीय संविधान' देशभरात पूर्णपणे अंमलात आले. त्यामुळे 26 जानेवारी 1950 पासून भारतात कायद्याचे राज्य सुरू झाले. भारत 26 जानेवारी 1949 ला प्रजासत्ताक झाला. त्यामुळे दरवर्षी देशभरात 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो.
प्रजासत्ताक दिनाचे महत्व
उद्या देशभर 76 वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जाणार आहे. देशातील लोकशाहीचा विजयाचा दिवस म्हणून याकडे पाहिले जाते. लोकशाही म्हणजे लोकांचे,लोकांनी, लोकांसाठी चालविलेले राज्य. 26 जानेवारी या दिवसापासून भारतीय जनतेला राज्य चालविण्याचा अधिकार मिळाला.जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश अशी भारताची ओळख आहे. विविध भाषा, विविध धर्म, वेगवेगळ्या संस्कृती तसेच वेगवेगळ्या प्रथा भारतात आहेत. तरीही भारतातील लोक गुण्यागोविंदाने नांदत आहेत. राष्ट्रीय एकता देशात टिकून आहे. प्रजासत्ताक दिन हा सर्व भारतीयांसाठी एकत्र येण्याचा आणि राष्ट्राचा अभिमान बाळगण्याचा दिवस आहे.
प्रजासत्ताक दिनाला देशभर मोठा उत्साह
प्रजासत्ताक दिनाला देशभर मोठा उत्साह असतो. राष्ट्रीय ध्वज उभारण्यापासून ते शाळा आणि समुदायांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांपर्यंत, भारतीय हा दिवस साजरा करण्यासाठी एकत्र येतात. लोक स्थानिक उद्यानांमध्ये जमतात, देशभक्तीपर कार्यक्रम आयोजित करतात आणि परेडचे थेट प्रक्षेपण पाहतात. सर्वत्र देशभक्तीपवर गीते लावली जातात.
महत्वाच्या बातम्या: