एक्स्प्लोर

RBI: तुमच्या कर्जाचा हप्ता वाढणार का? व्याजदर वाढीसंदर्भात RBI आज निर्णय घेणार

RBI Hike Repo Rate: आरबीआयच्या पतधोरण समितीची बैठक सुरू असून रेपो दरात वाढ होणार की नाही याचा निर्णय आज होणार आहे. 

मुंबई: तुमच्या कर्जाचा हप्ता वाढणार की तितकाच कायम राहणार याचा निर्णय आज होणाऱ्या आरबीआयच्या (RBI) पतधोरण समितीच्या (MPC) बैठकीत होणार आहे. आरबीआयच्या पतधोरण समितीची बैठक सोमवारपासून सुरू झाली आहे. बुधवारी म्हणजे आज रेपो दरात (Repo Rate) वाढ होणार की तितकाच राहणार, सर्वसामान्यांच्या कर्जाचा हफ्ता वाढणार की तितकाच राहणार याचा फैसला होणार आहे. त्यामुळे आरबीआयच्या निर्णयाकडे उद्योग जगतासोबतच सर्वसामान्यांचंही लक्ष लागून राहिलं आहे. 

रिझर्व्ह बँकेच्या (Reserve Bank of India) मागील तीन बैठकांमध्ये प्रत्येक वेळी व्याजदरात 0.50 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. आताही त्यामध्ये 0.35 टक्क्यांनी वाढ होणार असल्याची शक्यता अनेक अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

देशातील ऑक्टोबरमध्ये महागाई दर 6.77 टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे, तरीही तो RBIच्या वर्षभरातील 2 ते 6 टक्के या निर्धारित दरापेक्षा तो जास्त आहे. यंदाच्या आर्थिक वर्षासाठी महागाईचा दर सरासरी 6.7 टक्के असेल आणि 2023-24 या आर्थिक वर्षात 5.2 टक्क्यांपर्यंत घसरेल अशी अपेक्षा अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे महागाई दर अद्याप पूर्ण नियंत्रणात आला नसल्याने आज आरबीआय पुन्हा एकदा व्याजदरात वाढ करण्याची जास्त शक्यता आहे असं अर्थतज्ज्ञांचं मत आहे. 

रिझर्व्ह बँकेने या वर्षी मे महिन्यापासून आतापर्यंत रेपो दरात 1.90 टक्क्यांनी वाढ केली आहे. मात्र असे असतानाही जानेवारीपासून महागाई 6 टक्क्यांच्या वरती राहिली आहे. त्यामुळे आताही महागाई दर नियंत्रित ठेवण्यासाठी यावेळीही व्याजदरात वाढ होण्याची शक्यता आहे. 

रेपो रेट म्हणजे काय?

ज्या दराने बँका रिझर्व्ह बँकेकडून पैसे घेते त्या दराला रेपो दर (Repo Rate) म्हणतात. रेपो दर वाढणं म्हणजे बँकांना रिझर्व्ह बँकेकडून मिळणाऱ्या कर्जदरात वाढ होणे. तर, रेपो रेट कमी होणं म्हणजे बँकेला स्वस्तात पैसे मिळणं. याचाच अर्थ आरबीआयने रेपो दरात वाढ केली तर सामान्यांच्या कर्जात वाढ होते. 

रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय? 

रिव्हर्स रेपो रेट (Reverse Repo Rate)म्हणजे रेपो रेटच्या अगदी उलट संकल्पना आहे. बँका रिझर्व्ह बँकेकडे पैसा जमा करतात. त्यावर त्यांना मिळणाऱ्या व्याजाला रिर्व्हस रेपो दर म्हणतात. रेपो दर आणि रिव्हर्स व्याज दरात अर्धा ते एक टक्क्यांचा फरक असतो. 

ही बातमी वाचा :

 

महत्त्वाच्या बातम्या

Video : सुप्रीम कोर्टात वकिलाचा अभूतपूर्व राडा; सरन्यायाधीशांना उद्देशून अपशब्द, फाईली सुद्धा भिरकावल्या
Video : सुप्रीम कोर्टात वकिलाचा अभूतपूर्व राडा; सरन्यायाधीशांना उद्देशून अपशब्द, फाईली सुद्धा भिरकावल्या
Rupali Chakankar and Ashok Kharat: सोशल मीडियावर माझ्या 'त्या' AI व्हिडीओंना 43 मिलियन्स व्ह्यूज, प्रतिमा मलीन झाली; रुपाली चाकणकरांनी कोर्टात काय-काय सांगितलं?
सोशल मीडियावर माझ्या 'त्या' AI व्हिडीओंना 43 मिलियन्स व्ह्यूज, प्रतिमा मलीन झाली; रुपाली चाकणकरांनी कोर्टात काय-काय सांगितलं?
Maharashtra ATS : पाकिस्तानातील गँगस्टर शहजाद भट्टीशी कथित संपर्क प्रकरणी महाराष्ट्र ATSची मोठी कारवाई; राज्यभरात एकाच वेळी 150 हून अधिक ठिकाणी छापे
पाकिस्तानातील गँगस्टर शहजाद भट्टीशी कथित संपर्क प्रकरणी महाराष्ट्र ATSची मोठी कारवाई; राज्यभरात एकाच वेळी 150 हून अधिक ठिकाणी छापे
PM Narendra Modi Australia : मेलबर्नमधील भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून 'ऑपरेशन सिंदूर'चा उल्लेख; म्हणाले, 'दहशतवादी तळांवरील स्फोटांचे जगभर पडसाद'
मेलबर्नमधील भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून 'ऑपरेशन सिंदूर'चा उल्लेख; म्हणाले, 'दहशतवादी तळांवरील स्फोटांचे जगभर पडसाद'

व्हिडीओ

Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj
Bajrang Sonawane Vs Prithviraj Chavan : राष्ट्रवादीत अस्वस्थता? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
England vs India T20I: विश्वविजेते सपशेल गार होताच टी-20 मधील सिंहासन सुद्धा डळमळीत! इंग्लंडला सुवर्णसंधी चालून आली
विश्वविजेते सपशेल गार होताच टी-20 मधील सिंहासन सुद्धा डळमळीत! इंग्लंडला सुवर्णसंधी चालून आली
जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त
जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त
अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी; महापौर रितू तावडेंकडून नियुक्तीपत्र प्रदान
अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी; महापौर रितू तावडेंकडून नियुक्तीपत्र प्रदान
मुंबई–पुणे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा; उद्यापासून धावणार 200 अतिरिक्त बसफेऱ्या, 30 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने निर्णय
मुंबई–पुणे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा; उद्यापासून धावणार 200 अतिरिक्त बसफेऱ्या, 30 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने निर्णय
Kailas Patil : राज्यासमोर अनेक प्रश्न, महायुतीच्या 237 आमदारांना न्याय द्या, कैलास पाटील यांची ऑपरेशन टायगर 3.0 च्या चर्चांवर रोखठोक प्रतिक्रिया
राज्यासमोर अनेक प्रश्न, महायुतीच्या 237 आमदारांना न्याय द्या, कैलास पाटील यांची ऑपरेशन टायगरवर प्रतिक्रिया
पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या नेटवर्कवर महाराष्ट्र एटीएसची छापेमारी; 102 ठिकाणांवर छापेमारी, मराठवाड्यातील तीन जिल्ह्यातील 15 संशयित ताब्यात, सोशल मीडियातून संपर्क साधण्याचा प्रयत्न
पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या नेटवर्कवर महाराष्ट्र एटीएसची छापेमारी; 102 ठिकाणांवर छापेमारी, मराठवाड्यातील तीन जिल्ह्यातील 15 संशयित ताब्यात, सोशल मीडियातून संपर्क साधण्याचा प्रयत्न
Harshvardhan Sapkal: दलिंदर सरकार म्हणजे महाराष्ट्र नाही, मंत्र्यांवर टीका म्हणजे महाराष्ट्राचा अपमान नाही, उधळपट्टी करणं हाच खरा महाराष्ट्र द्रोह; हर्षवर्धन सपकाळांचा एकनाथ शिंदेंवर प्रहार
सरकार म्हणजे महाराष्ट्र नाही, मंत्र्यांवर टीका म्हणजे महाराष्ट्राचा अपमान नाही, उधळपट्टी करणं हाच खरा महाराष्ट्र द्रोह; हर्षवर्धन सपकाळांचा एकनाथ शिंदेंवर प्रहार
जयंत पाटलांचा भाजपला टोला; विरोधी पक्षनेता नाही, पक्ष विरोधी नेता मिळाला, भास्कर जाधवही सत्ताधाऱ्यांवर संतापले
जयंत पाटलांचा भाजपला टोला; विरोधी पक्षनेता नाही, पक्ष विरोधी नेता मिळाला, भास्कर जाधवही सत्ताधाऱ्यांवर संतापले
Embed widget