एक्स्प्लोर

रेपो रेट कायम, तुमच्यावर परिणाम काय?

मुंबई: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अर्थात आरबीआयने रेपो दरात कोणतेही बदल केलेले नाहीत. त्यामुळे व्याजदर कपातीकडे डोळे लावून बसलेल्या कर्जदारांची निराशा झाली आहे. दुसरीकडे  13 मार्चपासून सेव्हिंग अकाऊंटमधून पैसे काढण्याची मर्यादा हटवण्यात येईल, अशी घोषणा करत, आरबीआयने काहीसा दिलासा दिला आहे. आरबीआयने 2017 मधील पहिलं पतधोरण आणि आर्थिक वर्ष 2016 -17 मधील शेवटचं पतधोरण जाहीर केलं. व्याजदरात कोणतेही बदल न केल्यामुळे रेपो दर 6.25 टक्के तर रिव्हर्स रेपो रेट 5.75 टक्के कायम राहिला आहे.  तर सीआरआर म्हणजे कॅश रिझर्व्ह रेशोही 4 टक्के कायम असेल. आरबीआयच्या या निर्णयामुळे व्याजदर कपातीची अपेक्षा करणाऱ्यांची मात्र निराशा झाली. व्याजदरात कपात का नाही? जागतिक अनिश्चितता आणि देशांतर्गत महागाईचा दर पाहाता रिझर्व्ह बँकेने सावध पावलं टाकणं पसंत केलं. त्यामुळे रेपो रेट कायम ठेवल्याचं मत जानकारांनी व्यक्त केलं आहे. नोटाबंदीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्याचा अंदाज अनेकांनी वर्तवला आहे. त्यामुळेच गव्हर्नर उर्जित पटेल यांनीही अर्थव्यवस्थेवरील परिणामाची शक्यता लक्षात घेऊन, व्याजदर कायम ठेवले. सध्या जानेवारी ते मार्च या तिमाहीत महागाई दर 5 टक्के आहे, तो 4 टक्क्यांवर आणण्याचं लक्ष्य आहे. रेपो दराचा तुमच्यावर काय परिणाम? बँका रिझर्व्ह बँकेकडून कर्ज घेते, त्यावर रिझर्व्ह बँक जो व्याजदर आकारते, त्याला रेपो रेट म्हणतात. जर रेपो रेट कमी झाला, तर बँकांना रिझर्व्ह बँकेला कमी व्याज द्यावं लागेल. त्यामुळे जर बँकांना फायदा झाला, तर बँका ग्राहकांनाही व्याजदर कपात करुन फायदा मिळवून देते. रिव्हर्स रेपो रिव्हर्स रेपो म्हणजे बँका आपला पैसा रिझर्व्ह बँकेत ठेवतात, त्यावर आरबीआय जो व्याजदर देते त्याला रिव्हर्स रेपो दर म्हणतात. जर आरबीआयने दर कपात केली, तर बँकाही व्याजदरात कपात करतात. त्याचा परिणाम बँकेत पैसे सेव्हिंग करणाऱ्यांवर होतो. रेपो रेट म्हणजे काय? रेपो रेट म्हणजे ज्या दराने बँका रिझर्व बँकेकडून पैसे घेते तो दर.  रेपो रेट वाढणं म्हणजे बँकांना रिझर्व बँकेकडून मिळणाऱ्या कर्जदरात वाढ होणं, तर रेपो रेट कमी होणं म्हणजे बँकेला स्वस्तात पैसे मिळणं.म्हणजेच आरबीआयने रेपो रेट वाढवला तर पर्यायाने सर्व बँकांना ग्रहकांना द्यावयाची कर्जाचे दरही वाढवावे लागतात.  तर कमी झाल्याने व्याज दर कमी होतो. रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय? रिव्हर्स रेपो रेट म्हणजे रेपो रेटच्या अगदी उलट संकल्पना आहे. बँका रिझर्व बँकेकडून कर्जरूपी पैसा घेतात, तसाच रिझर्व बँकही या वेगवेगळ्या बँकाकडून कर्जरूपाने पैसे घेत असते. तेव्हा त्यासाठी जो दर आकारला जातो, त्याला रिव्हर्स रेपो रेट म्हणतात.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Donald Trump : निवडणुकीत दोनवेळा जीव वाचला, एलाॅन मस्कची अभेद साथ, 'कॅसिनो ऑपरेटर' डोनाल्ड ट्रम्प राष्ट्रपतीपदापर्यंत कसे पोहोचले?
निवडणुकीत दोनवेळा जीव वाचला, एलाॅन मस्कची अभेद साथ, 'कॅसिनो ऑपरेटर' डोनाल्ड ट्रम्प राष्ट्रपतीपदापर्यंत कसे पोहोचले?
सदाभाऊंची शरद पवारांवर जहरी टीका, जितेंद्र आव्हाड चांगलेच संपातले; थेट वडिलांचाच दिला दाखला
सदाभाऊंची शरद पवारांवर जहरी टीका, जितेंद्र आव्हाड चांगलेच संपातले; थेट वडिलांचाच दिला दाखला
अख्ख्या मुंबईत 20 नोव्हेंबरला कामगारांना पगारी सुट्टी द्या, नाहीतर कारवाई; आयुक्तांचे निर्देश, पत्रक जारी
अख्ख्या मुंबईत 20 नोव्हेंबरला कामगारांना पगारी सुट्टी द्या, नाहीतर कारवाई; आयुक्तांचे निर्देश, पत्रक जारी
Donald Trump : अमेरिकेत फिर एक बार ट्रम्प सरकार, रिपब्लिकन पक्षाला अमेरिकन संसदेत सुद्धा बहुमत
अमेरिकेत फिर एक बार ट्रम्प सरकार, रिपब्लिकन पक्षाला अमेरिकन संसदेत सुद्धा बहुमत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sadabhau Khot  On Sharad Pawar : पवार तुमच्या चेहऱ्यासाखा महाराष्ट्र हवा का? जतमध्ये खोत बरळलेBKC MVA Sabha : बीकेसीतील सभेत महाविकास आघाडीचा जाहीरनामा प्रकाशित होणारABP Majha Headlines | 4 PM TOP Headlines | 4 PM 06 November 2024 | Headlines Marathi NewsMaharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्या : Vidhan Sabha Election : 06 NOV 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump : निवडणुकीत दोनवेळा जीव वाचला, एलाॅन मस्कची अभेद साथ, 'कॅसिनो ऑपरेटर' डोनाल्ड ट्रम्प राष्ट्रपतीपदापर्यंत कसे पोहोचले?
निवडणुकीत दोनवेळा जीव वाचला, एलाॅन मस्कची अभेद साथ, 'कॅसिनो ऑपरेटर' डोनाल्ड ट्रम्प राष्ट्रपतीपदापर्यंत कसे पोहोचले?
सदाभाऊंची शरद पवारांवर जहरी टीका, जितेंद्र आव्हाड चांगलेच संपातले; थेट वडिलांचाच दिला दाखला
सदाभाऊंची शरद पवारांवर जहरी टीका, जितेंद्र आव्हाड चांगलेच संपातले; थेट वडिलांचाच दिला दाखला
अख्ख्या मुंबईत 20 नोव्हेंबरला कामगारांना पगारी सुट्टी द्या, नाहीतर कारवाई; आयुक्तांचे निर्देश, पत्रक जारी
अख्ख्या मुंबईत 20 नोव्हेंबरला कामगारांना पगारी सुट्टी द्या, नाहीतर कारवाई; आयुक्तांचे निर्देश, पत्रक जारी
Donald Trump : अमेरिकेत फिर एक बार ट्रम्प सरकार, रिपब्लिकन पक्षाला अमेरिकन संसदेत सुद्धा बहुमत
अमेरिकेत फिर एक बार ट्रम्प सरकार, रिपब्लिकन पक्षाला अमेरिकन संसदेत सुद्धा बहुमत
पुरुष गरोदर राहणे आणि बाहेर आलेली टूथपेस्ट परत ट्यूबमध्ये घालणे या दोन गोष्टी सोडल्या तर जगात काहीच अशक्य नाही : राज ठाकरे
पुरुष गरोदर राहणे आणि बाहेर आलेली टूथपेस्ट परत ट्यूबमध्ये घालणे या दोन गोष्टी सोडल्या तर जगात काहीच अशक्य नाही : राज ठाकरे
Ajit Pawar Manifesto : राष्ट्रवादी काँग्रेसकडून 50 मतदारंसघासाठी 50 जाहीरनामे; बारामतीच्या बालेकिल्ल्याठी दादांकडून बड्या घोषणा...
राष्ट्रवादी काँग्रेसकडून 50 मतदारंसघासाठी 50 जाहीरनामे; बारामतीच्या बालेकिल्ल्याठी दादांकडून बड्या घोषणा...
Devendra Fadnavis : गोपीचंदला निवडून द्या, जतच्या विकासाची गॅरंटी हा देवाभाऊ घेतोय; उपमुख्यमंत्री फडणवीसांचे जतकरांना आवाहन
गोपीचंदला निवडून द्या, जतच्या विकासाची गॅरंटी हा देवाभाऊ घेतोय; उपमुख्यमंत्री फडणवीसांचे जतकरांना आवाहन
Shrikant Shinde on Uddhav Thackeray : शिवाजी महाराजांचं मंदिर बांधणार हे त्यांच्या तोंडून येणं खूप हास्यास्पद; श्रीकांत शिंदेंची खोचक टीका
शिवाजी महाराजांचं मंदिर बांधणार हे त्यांच्या तोंडून येणं खूप हास्यास्पद; श्रीकांत शिंदेंची खोचक टीका
Embed widget