एक्स्प्लोर
नोटाबंदीनंतर बँकेत 2 लाख रुपये भरणाऱ्यांवर RBI ची नजर
नवी दिल्ली : नोटाबंदीनंतर बँक खात्यात दोन लाखांपेक्षा जास्त रक्कम जमा करणाऱ्यांभोवती आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया फास आवळण्याच्या तयारीत आहे. 9 नोव्हेंबरपासून खात्यात दोन लाख किंवा त्याहून जास्त रक्कम असणाऱ्या खात्यांवर काही बंधनं येणार आहेत.
9 नोव्हेंबरनंतर खात्यात दोन लाखांपेक्षा जास्त रक्कम भरणाऱ्या ज्या बँक खात्यात 5 लाखाच्या वर बॅलन्स असेल अशा खात्यांमधली रक्कम काढण्यावर बंधनं येणार आहेत. पॅन कार्ड दाखवून किंवा फॉर्म 60 भरुनच या खातेधारकांना पैसे काढता येणार आहेत. अन्यथा या खात्यांमधून पैसे ट्रान्सफरही करता येणार नाहीत.
काळा पैसा पांढरा करण्यासाठी दुसऱ्याच्या खात्याचा आधार घेणाऱ्यांना या निर्णयानं चाप बसणार आहे. छोटी खाती अर्थात जनधन खात्यांमध्ये वर्षाकाठी फक्त 50 हजार रुपये जमा करण्याची मुभा आहे. तर महिन्याला 10 हजार (केआयसी नसल्यास फक्त पाच हजार) रुपयांची रक्कम काढता येईल.
जनधन खाती आणि इतर खात्यांचा दुरुपयोग काळा पैसा पांढरा करण्यासाठी होत असल्यानं रिझर्व्ह बँकेनं हा नियम केला आहे.
संबंधित बातम्या :
पाचशे रुपयांची जुनी नोट आता कायमची चलनातून हद्दपार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement