एक्स्प्लोर

काळजी करण्याचं कोणतंही कारण नाही; 2000च्या नोटबंदीनंतर RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांची पहिली प्रतिक्रिया

RBI Governor Reaction on 2000 Rupees Notes: दोन हजारांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

RBI Governor Reaction on 2000 Rupees Notes: आरबीआयकडून (RBI) दोन हजारांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय घेतल्यानंतर भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास (Governor Shaktikant Das) यांनी पहिल्यांदाच माध्यमांशी संवाद साधला. यावेळी दोन हजारांच्या नोटा बंद झाल्यानंतर भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सर्वात पहिली प्रतिक्रिया दिली. दोन हजारांच्या नोटा चलनात आणण्याचे उद्दिष्ट आता पूर्ण झाले आहे, असं शक्तिकांत दास यांनी म्हटले आहे. 

आरबीआयचे गव्हर्नर दास यांची पहिली प्रतिक्रिया 

भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले की, "नोटा बदलण्यासाठी चार महिन्यांचा अवधी दिला आहे. त्यामुळे हा चार महिन्यांचा कालावधी लोकांनी गांभीर्याने घ्यावा. नागरिकांनी दोन हजारांच्या नोटांवर घातलेली बंदी ही कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण करणारी आहे, असा अजिबात समज करु नये." 

शक्तिकांत दास यांचे स्पष्टीकरण 

शक्तिकांत दास यांनी म्हटलं की,  "दोन हजारांच्या नोटा चलनात आणण्याची अनेक कारणं होती. त्यामुळे आता घेतलेला निर्णय हा काही निकषांमुळे घेण्यात आला आहे. त्यामुळे दोन हजारांच्या नोटांवर घालण्यात आलेली बंदी ही नागरिकांनी गांभीर्याने घेतली तर चांगले होईल." तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, "बँकांना दोन हजारांच्या नोटा बदलण्याचा डेटा तयार करावा लागेल आणि नोटांचा सर्व तपशील बँका तयार करतील." तसेच दोन हजारांच्या नोटा बदलण्याची सुविधा ही सामान्यच असेल, असं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे.  दोन हजारांच्या नोटा बदलण्यासाठी चार महिन्यांचा अवधी देण्यात आला आहे आणि बँकांमध्ये देखील पूर्ण तयारी करण्यात आली असल्याचं शक्तिकांत दास यांनी म्हटलं आहे. त्यामुळे नागरिकांनी गोंधळून न जाण्याचं आवाहन देखील त्यांनी केलं आहे. 

दोन हजारांच्या नोटा बंद करण्याचा आरबीआयचा निर्णय 

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शुक्रवारी (19 मे) संध्याकाळी दोन हजारांच्या नोटा चलनातून बाहेर काढण्यात येणार असल्याची धक्कादायक घोषणा केली. याबरोबरच नागरिकांना 2000 रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी आहे. 30 सप्टेंबरपर्यंत नागरिक या नोटा बदलून घेण्यासाठी बँकांमध्ये जाऊ शकतात. 8 नोव्हेंबर 2016 रोजी रात्री आठ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदीची घोषणा केली. त्यावेळी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. खरंतर, त्याच वर्षी RBI कायदा, 1934 च्या कलम 24 (1) अंतर्गत 2000 रुपयांच्या नवीन नोटा जारी करण्यात आल्या. इतर मूल्यांच्या नोटा बँकांमध्ये पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाल्यानंतर हे उद्दिष्ट साध्य करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे 2018-19 मध्ये 2000 रुपयांच्या नोटांची छपाई थांबवण्यात आली होती.

महत्त्वाच्या बातम्या

Bihar Boat Accident : भयंकर दुर्घटना! अंत्यसंस्काराच्या जेवणाला जात होते अन्... गंगेत नाव उलटून 13 जणांचा मृत्यू; अनेक बालकांचा समावेश
भयंकर दुर्घटना! अंत्यसंस्काराच्या जेवणाला जात होते अन्... गंगेत नाव उलटून 13 जणांचा मृत्यू; अनेक बालकांचा समावेश
Mamata Banerjee : मोठी बातमी! ममता बॅनर्जी यांच्यावर चाकू हल्ल्याचा प्रयत्न; दारुच्या नशेत आलेल्या महिलेने शिव्या दिल्या, साडी ओढली अन्... 
मोठी बातमी! ममता बॅनर्जी यांच्यावर चाकू हल्ल्याचा प्रयत्न; दारुच्या नशेत आलेल्या महिलेने शिव्या दिल्या, साडी ओढली अन्... 
राहुल गांधींनी 2029 च्या पराभवासाठी तयार राहावं, SIR च्या नावाखाली ते घुसखोरांना संरक्षण देतायेत, अमित शाहांचा हल्लाबोल 
राहुल गांधींनी 2029 च्या पराभवासाठी तयार राहावं, SIR च्या नावाखाली ते घुसखोरांना संरक्षण देतायेत, अमित शाहांचा हल्लाबोल 
JDU BJP Merger Controversy : नितीश कुमार यांचा JDU पक्ष भाजपमध्ये विलीन होणार? तारीख निश्चित झाल्याचा दावा, बिहारच्या राजकारणात मोठी खळबळ
नितीश कुमार यांचा JDU पक्ष भाजपमध्ये विलीन होणार? तारीख निश्चित झाल्याचा दावा, बिहारच्या राजकारणात मोठी खळबळ

व्हिडीओ

Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PHOTO : MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
L Murugan Resignation : मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
Cyberattack on Refrigeration: फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका
फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका, अनेक दुकानांमध्येही आगीचा भडका
Embed widget