Coronavirus : चीनसह जगभरात कोरोनाचा उद्रेक! भारतात पुन्हा कोरोनाची लाट? डॉ. रवी गोडसे म्हणतात...
Dr. Ravi Godse on Corona Outbreak : जगभरात कोरोनाचा वाढता कहर सुरु आहे. वाढत्या कोरोना संसर्गाचा भारताला किती धोका आहे याबाबत डॉ. रवी गोडसे यांनी महत्वाची माहिती दिली आहे.
Ravi Godse on Corona Outbreak : जग (World) पुन्हा एकदा कोरोनाच्या (Coronavirus) विळख्यात सापडलं आहे. चीनमध्ये (China) कोरोनाचा विस्फोट झाला आहे. याशिवाय जपान (Japan), अमेरिका (America), ब्राझील (Brazil) आणि दक्षिण कोरियामध्येही (South Korea) कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. या वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगासह भारतातही नागरिकांवर भीतीचं सावट आहे. मात्र कोरोनाच्या जगभरातील वाढत्या उद्रेकामुळे भारतीयांना घाबरण्याचं काही कारण नाही, असं डॉ. रवी गोडसे यांनी म्हटलं आहे. भारतात चीनप्रमाणे कोरोनाचा उद्रेक होणार नाही, असं मत रवी गोडसे यांनी व्यक्त केलं आहे.
'चीनमध्ये जे झालं ते भारतात होणार नाही'
डॉ. रवी गोडसे यांनी म्हटलं आहे की, चीनमध्ये जे झालं ते भारतात होणार नाही. भारतात कोरोनाची नवीन लाट येणार नाही. तुम्ही निश्चिंत राहा. चीनमध्ये तीन वर्षानंतर कोरोना लॉकॉाऊन उठवण्यात आला, त्यामुळे चीनमध्ये अचानक कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाली, तशी परिस्थिती भारतामध्ये उद्धभवणार नाही असंही गोडसे यांनी सांगितलं आहे. चीनमध्ये सध्या असलेली परिस्थिती आगामी काळात न्यूझीलंड, दक्षिण कोरिया, सिंगापूर या देशांमध्ये निर्माण होऊ शकते. ऑस्ट्रेलिया आणि कॅनडामध्ये होऊ अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. पण त्याची शक्यता कमी आहे.
'जगात सध्या ओमायक्रॉनचा संसर्ग सुरु'
चीनमध्ये सध्या कोरोनाचा संसर्ग सुरु आहे, तो कोरोनाचा ओमायक्रॉन प्रकार आहे, असं डॉ. रवी गोडसे यांनी म्हटलं आहे. त्यांनी पुढे सांगितलं की, चीनमध्ये सध्या ओमायक्रॉन कोरोना व्हेरियंटचा प्रसार सुरु आहे. ओमायक्रॉन विषाणूवर भारताने आधीच मात केली आहे. ओमायक्रॉन विषाणूमुळे भारतीयांची रोगप्रतिकारक शक्ती वाढली आहे. जगभरात कोरोनाचा सुरु असलेला उद्रेक हा कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचा आहे. भारताने ओमायक्रॉनला आधीच परतवून लावला आहे. त्यामुळे भारतीयांना घाबरण्याचं काही कारण नाही असंही त्यांनी म्हटलं आहे.
देशातील कोरोनाचा आलेख घरसता
जगभरात कोरोनाचा कहर पाहायल मिळत असला, तर सध्या भारतामध्ये मात्र कोरोनाची परिस्थिती सामान्य आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या नव्या आकडेवारीनुसार, देशात मागील 24 तासांमध्ये 131 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. भारतातील कोरोनाबाधितांचा आलेख दिवसेंदिवस घसरलेला पाहायला मिळत आहे. पण, अशावेळी नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे, असं मत आरोग्य तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.