एक्स्प्लोर

Ratan Tata Passed Away: हिमालयाएवढ्या टाटांचे 'हे' प्रेरणादायी विचार वाचा; नैराश्य, नेगेटिव्हिटी कुठल्या कुठे पळून जाईल!

Ratan Tata Passed Away: जगभरातील असंख्य श्रीमंत कुटुंबांपासून वेगळं असलेलं... आणि आपल्या श्रीमंतीचा कधी बडेजाव न करणारं कुटुंब म्हणजे, टाटा.

Ratan Tata Passed Away: टाटा (TATA Group) म्हणजे, विश्वास... हे प्रत्येक भारतीयाच्या मनात जणू कोरलं गेलंय. आपल्या आज्ज्या-पणज्यांपासून ते अगदी आजच्या तरुणपिढीपर्यंत प्रत्येकजण टाटांचा ऋणी आहे. स्वयंपाक घरातील मिठापासून ते अगदी एअरलाईन्सपर्यंत प्रत्येक ठिकाणी टाटा आहेतच. टाटांशिवाय आपला दैनंदिन दिवस अपूर्णच. टाटांविषयी बोलू तितकं कमीच. पण याच टाटांबाबत आणखी काही सांगायचं तर, टाटा म्हणजे, साधेपणा. आपल्या याच स्वभावामुळे या अख्ख्या कुटुंबानं भारतीयांच्या मनात आणि त्यांच्या आयुष्यात अढळ स्थान निर्माण केलंय. 

जगभरातील असंख्य श्रीमंत कुटुंबांपासून वेगळं असलेलं... आणि आपल्या श्रीमंतीचा कधी बडेजाव न करणारं कुटुंब म्हणजे, टाटा. स्वातंत्र्य काळापासूनच टाटांनी भारतासाठी खूप काही केलं. गरजूंसाठी टाटा नेहमीच खंबीरपणे उभे राहिले. याच टाटा घराण्यातील एक माणसातला देव म्हणजे, रतन टाटा. भारतीय उद्योगविश्वाचे महर्षि रतन टाटा यांचं निधन झालं. वयाच्या 86 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. ब्रीच कॅण्डी रुग्णालयात रतन टाटांनी जगाचा निरोप घेतला. संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. रतन टाटा आता आपल्यात नसले, तरीसुद्धा त्यांचे विचार मात्र कायम आपल्यासोबत राहतील...  

हिमालयाएवढ्या टाटांचे हे प्रेरणादायी विचार... 

>>

" अध्यक्षपद हे मला कधी काम वाटलंच नाही. मी त्याकडे आव्हान आणि ध्यास म्हणून पाहिलं "
-रतन टाटा

>>

" मी टाटा समूहाच्या अध्यक्षपदाची प्रतिष्ठा जपली असं लोक म्हणतील, अशी मला आशा आहे. "
-रतन टाटा

>>

" भूतकाळातील कार्यपद्धती सहज स्वीकारू नका. त्यावर प्रश्न उपस्थित करा. "
-रतन टाटा

>>

" माझ्या सहकाऱ्यांची निष्ठा, त्याग आणि वैयक्तिक शौर्य माझ्या सदैव लक्षात राहील "
-रतन टाटा

>>

" एखाद्या व्यवसायात आपण अव्वल नसू तर त्यातून बाहेर पडण्याबद्दल विचार केला पाहिजे "
-रतन टाटा

>>

" ग्राहकांनी आपल्याला जसं वागवलेलं आवडेल, तसंच आपण त्यांना वागवलं पाहिजे "
-रतन टाटा

>>

" उद्योगात नवनवी संशोधनं करत राहणं अत्यंत गरजेचं आहे, जे आपल्याकडे फारसं होत नाही. "
-रतन टाटा

>>

" कंपनी यशस्वी करण्यासाठी उत्तम कामगिरी करणाऱ्यांना मोबदला, आणि काम न करणाऱ्यांना दंड हा दिलाच पाहिजे. "
-रतन टाटा

>>

" कायदा मोडणाऱ्यांचं आपण काय करतो, त्यावरून आपलं चारित्र्य कसं आहे ते कळतं "
-रतन टाटा

>>

" नंबर वन होणं सोपं असतं, मात्र पहिला नंबर टिकवणं कठीण असतं. "
-रतन टाटा

>>

" मनात आणलं तर काहीच अशक्य नाही हे 'नॅनो' प्रकल्पानं दाखवून दिलं "
-रतन टाटा

>>

" टाटा समूहाच्या यशाचं प्रतीक केवळ मला मानलं गेलं, तर ते मी माझं अपयश समजेन. "
-रतन टाटा

>>

" मी प्रचंड यशस्वी झालो नाही आणि खूप अपयशीही ठरलो नाही. मी बऱ्यापैकी यश मिळवलं असं मला वाटतं. "
-रतन टाटा

>> 

" माझ्या व्यक्तिमत्वाची सावली भूतासारखी टाटा समूहाच्या मानगुटीवर बसू नये अशी माझी इच्छा आहे. "
-रतन टाटा

>>

" आजचं जग प्रचंड स्पर्धात्मक आहे. त्यात टिकून राहण्यासाठी भारतीयांना संघर्ष करावा लागणार आहे. "
-रतन टाटा

>>

" बहुराष्ट्रीय कंपन्यांचा सामना करायचा असेल तर भारतीय कंपन्यांमध्ये एकी हवी. "
-रतन टाटा

>>

" स्पर्धेला घाबरून चालत नाही. स्पर्धा असेल तरच भारतीय कंपन्या मोठं यश मिळवू शकतील. "
-रतन टाटा

>>

" अध्यक्ष म्हणून मी जोखीम पत्करली नाही असं अजिबात नाही. मात्र जोखीम आणि जुगार यात फरक असतो. "
-रतन टाटा

>>

" काहीतरी नवीन करण्यात सर्वात मोठे अडथळे आपल्या मनात असतात. "
-रतन टाटा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अंत्ययात्रा ते अखेरचा निरोप; रतन टाटांच्या अंत्यसंस्काराला दिग्गज, स्मशानभूमीत कोण कोण पोहोचलं?
अंत्ययात्रा ते अखेरचा निरोप; रतन टाटांच्या अंत्यसंस्काराला दिग्गज, स्मशानभूमीत कोण कोण पोहोचलं?
पाटलांचा नाद खुळा... 900 एकरचं मैदान, 100 रुग्णवाहिका, दहा ICU कक्ष; जरांगेंच्या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी
पाटलांचा नाद खुळा... 900 एकरचं मैदान, 100 रुग्णवाहिका, दहा ICU कक्ष; जरांगेंच्या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी
मुंबईसह ठाण्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, चाकरमान्यांची तारांबळ, पुढील 2 तास सावधानतेचा इशारा
मुंबईसह ठाण्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, चाकरमान्यांची तारांबळ, पुढील 2 तास सावधानतेचा इशारा
Ratan Tata: राज ठाकरेंकडून रतन टाटांचे चरण स्पर्श; विमानतळावरील 'या' प्रेमळ फोटोमागची गोष्ट
राज ठाकरेंकडून रतन टाटांचे चरण स्पर्श; विमानतळावरील 'या' प्रेमळ फोटोमागची गोष्ट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 9 PM : 10 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRatan Tata Last Rites : रतन टाटा नावाच्या झंझावाताचा अंत, मुंबईत अंत्यसंस्कार | FULL VIDEOManoj Jarange on Chhagan Bhujbal  : ओबीसीमध्ये समावेश होणाऱ्या 15 जातींना भुजबळांचा विरोध नाही का?Ratan Tata Successor : रतन टाटांच्या निधनानंतर रतन टाटांचे उत्तराधिकारी कोण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अंत्ययात्रा ते अखेरचा निरोप; रतन टाटांच्या अंत्यसंस्काराला दिग्गज, स्मशानभूमीत कोण कोण पोहोचलं?
अंत्ययात्रा ते अखेरचा निरोप; रतन टाटांच्या अंत्यसंस्काराला दिग्गज, स्मशानभूमीत कोण कोण पोहोचलं?
पाटलांचा नाद खुळा... 900 एकरचं मैदान, 100 रुग्णवाहिका, दहा ICU कक्ष; जरांगेंच्या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी
पाटलांचा नाद खुळा... 900 एकरचं मैदान, 100 रुग्णवाहिका, दहा ICU कक्ष; जरांगेंच्या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी
मुंबईसह ठाण्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, चाकरमान्यांची तारांबळ, पुढील 2 तास सावधानतेचा इशारा
मुंबईसह ठाण्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, चाकरमान्यांची तारांबळ, पुढील 2 तास सावधानतेचा इशारा
Ratan Tata: राज ठाकरेंकडून रतन टाटांचे चरण स्पर्श; विमानतळावरील 'या' प्रेमळ फोटोमागची गोष्ट
राज ठाकरेंकडून रतन टाटांचे चरण स्पर्श; विमानतळावरील 'या' प्रेमळ फोटोमागची गोष्ट
एका रात्रीतच शुद्धीपत्रकात बदल करण्याची सरकारवर नामुष्की, दोषींवर कारवाई करण्याची पडळकरांची मागणी
एका रात्रीतच शुद्धीपत्रकात बदल करण्याची सरकारवर नामुष्की, दोषींवर कारवाई करण्याची पडळकरांची मागणी
पुण्यात स्वप्नातलं घरं, 6294 घरांसाठी म्हाडाची लॉटरी; कसा करायचा अर्ज, सोडत कधी; जाणून घ्या सर्वकाही
पुण्यात स्वप्नातलं घरं, 6294 घरांसाठी म्हाडाची लॉटरी; कसा करायचा अर्ज, सोडत कधी; जाणून घ्या सर्वकाही
Ratan Tata : रतन टाटांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारासाठी 'टाॅवर ऑफ सायलेन्स' सोडून विद्युत दाहिनीचाच पर्याय का निवडण्यात आला?
रतन टाटांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारासाठी 'टाॅवर ऑफ सायलेन्स' सोडून विद्युत दाहिनीचाच पर्याय का निवडण्यात आला?
Omar Abdullah : ओमर अब्दुल्ला होणार जम्मू-काश्मीरचे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री, विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड; 13 किंवा 14 ऑक्टोबरला शपथ घेणार
ओमर अब्दुल्ला होणार जम्मू-काश्मीरचे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री, विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड; 13 किंवा 14 ऑक्टोबरला शपथ घेणार
Embed widget