खासदार रामस्वरूप शर्मांचा संशयास्पद मृत्यू, आत्महत्या केल्याचा संशय, दिल्लीत खळबळ
राजधानी दिल्लीमध्ये भाजपचे मंडी, हिमाचल प्रदेशचे खासदार रामस्वरुप शर्मा (Ram Swaroop Sharma)यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. गोमती या खासदार निवासस्थानी पहाटे त्यांचा मृतदेह आढळून आला.

नवी दिल्ली: राजधानी दिल्लीमध्ये भाजपचे मंडी, हिमाचल प्रदेशचे खासदार रामस्वरुप शर्मा (Ram Swaroop Sharma)यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. गोमती या खासदार निवासस्थानी पहाटे त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यांनी आत्महत्या केली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यांच्या मृत्यूचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खासदार रामस्वरूप शर्मा यांचं घर आतून बंद होतं. त्यांनी गळफास घेतलेला होता. पोलिसांनी सांगितलं की त्यांना दवाखान्यात नेण्यात आलं मात्र दवाखान्यात पोहोचण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात अद्याप तरी कुठलीही सुसाईड नोट सापडलेली नाही. पोलिस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.
दरम्यान माहिती मिळताच केंद्रीय वित्त राज्य मंत्री अनुराग ठाकूर रामस्वरूप शर्मा यांच्या घरी पोहोचले आहेत. तसेच शर्मा यांच्या मृत्यूनंतर आज संसदीय पक्षाची बैठक रद्द करण्यात आली आहे.
BJP MP from Mandi, Ram Swaroop Sharma died allegedly by suicide in Delhi. Police received a call from a staffer. He was found hanging and the door was closed from inside: Delhi Police
Visuals from Gomti Apartments where he was found dead. pic.twitter.com/OVOs1NP5W2— ANI (@ANI) March 17, 2021
रामस्वरूप शर्मा यांचा जन्म 10 जून 1958 रोजी झाला होता. त्यांनी 1980 मध्ये चंपा शर्मा यांच्याशी विवाह केला होता. त्यांना तीन मुलं आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
