एक्स्प्लोर
'बाबा राम रहिम जेलमध्ये ढसाढसा रडतो'
'राम रहिमला जेव्हापासून जेलमध्ये आणलं आहे तेव्हापासून तो सतत रडतोय, त्याने आतापर्यंत जेलमधील चहा, पाणी आणि जेवण यापैकी काही घेतलेलं नाही.'
नवी दिल्ली : डेरा सच्चा सौदा डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बाबा राम रहीमला बलात्कारप्रकरणी 20 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आता त्याच्याविषयीच्या अनेक गोष्टी समोर येत आहेत.
दरम्यान, दलित नेते स्वदेश किराड गेल्या 9 महिन्यांपासून रोहतकमधील सुनारिया जेलमध्ये शिक्षा भोगत होते. नुकतीच म्हणजेच 29 ऑगस्टला त्यांची सुटका करण्यात आली आहे. याच स्वदेश किराड यांनी राम रहिमच्या जेलमधील बरीच माहिती दिली आहे.
स्वदेश किराड यांच्या समोरील बॅरेकमध्येच राम रहिमला ठेवण्यात आलं होतं. दोषी ठरवण्यात आल्यापासून राम रहिमला जेलमधील विशेष बॅरेकमध्ये ठेवण्यात आलं आहे. तेव्हापासून राम रहिम जमिनीवर बसून सतत रडत आहे. अशी माहिती किराड यांनी दिली.
'राम रहिम जमिनीवर बसून सतत रडतोय'
'राम रहिमला जेव्हापासून जेलमध्ये आणलं आहे तेव्हापासून तो सतत रडतोय, त्याने आतापर्यंत जेलमधील चहा, पाणी आणि जेवण यापैकी काही घेतलेलं नाही. त्यानं फक्त जेलमधील कॅन्टिनमधून फिल्टर पाणी आणि एकदा दूध, बिस्कीट विकत घेतलं. त्याचे पैसे देखील त्याच्या जेलमधील कमाईतून कापून घेतले जातील.' अशी माहिती किराड यांनी दिली.
'राम रहिमला आणल्यापासून जेलची सुरक्षाही वाढवण्यात आली आहे. तसेच राम रहिमला एकटंच ठेवण्यात आलं आहे. त्याच्या समोर कायम अधिकारी आणि कर्मचारी असतात.' असंही किराड यांनी सांगितलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement