एक्स्प्लोर

Ram Mandir Inauguration: 22 जानेवारीला सरकारी कार्यालयांत 'हाफ डे', केंद्र सरकारचा निर्णय

Ram Mandir Inauguration: केंद्रीय राज्य मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 जानेवारी रोजी सरकारी कार्यालयांना हाफ डे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबई : सध्या संपूर्ण देशात राम मंदिराच्या (Ram Mandir) उद्घाटनाचा उत्साह पाहायला मिळतोय. त्यातच आता केंद्र सरकारने (Central Government) गुरुवार 18 जानेवारी रोजी एक मोठा निर्णय घेतलाय. त्यानुसार केंद्रीय राज्य मंत्री जितेंद्र सिंह यांनी म्हटलं की, रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी म्हणजेच 22 जानेवारीला सरकारी कार्यालयांना हाफ डे देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तसेच जनभावनेचा आदर करत केंद्र सरकारकडून हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात आलं.

सरकारने त्यांच्या आदेशात म्हटलं आहे की, अयोध्येमधील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या दिवशी म्हणजे 22 जानेवारी 2024 रोजी संपूर्ण भारतात आनंद आणि उत्साह साजरा केला जाणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना या उत्सवात सहभागी होता यावे यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. त्यानुसार देशातील सर्व केंद्रीय सरकारी कार्यालये 22 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजून 30 मिनिटांपर्यंत बंद राहतील.  याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिर स्मारकाचे डाक तिकीट आणि देशभरात टपाल तिकीटांचे एक पुस्तक देखील जारी केले होते. 

कोणत्या राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर

याच पार्श्वभूमीवर काही राज्यांमध्ये सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आलीये. त्यानुसार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गोवा, हरियाणा आणि छत्तीगड या राज्यांमध्ये सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आलीये.  

राम मंदिराचे 22 जानेवारी रोजी उद्घाटन करण्यात येणार आहे. त्यानुसार अनुष्ठान देखील करण्यात येत आहे. बुधवार 17 जानेवारी रोजी कलश पुजनाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच रामलल्लाच्या मूर्तीला गुरुवारी गर्भगृहात आणण्यात आले. रामलल्लाची मूर्ती गर्भगृहात आणण्यापूर्वी विशेष पूजेचे देखील आयोजन करण्यात आले होते. दरम्यान हे अनुष्ठान 21 जानेवारीपर्यंत सुरु राहणार आहे. रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठापनेचा कार्यक्रम हा 22 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजल्यापासून सुरु होईल. तसेच हा कार्यक्रम दुपारी 1 वाजेपर्यंत समाप्त होणं अपेक्षित आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांच्यासह उत्तर प्रदेशातील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह हजारो लोक उपस्थित राहणार असल्याचं सांगण्यात आलंय. 

हेही वाचा : 

22 जानेवारीला राम मंदिर उद्घाटन सोहळा, बँकांना सुट्टी राहणार का? पुढच्या आठवड्यात बँकांचं कामकाज किती दिवस?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed Bank Scam: बीडच्या जिजाऊ माँसाहेब मल्टिस्टेटवर एमपीआयडीची कारवाई; ठेवीदारांच्या ठेवी परत करण्यासाठी पाऊल
बीडच्या जिजाऊ माँसाहेब मल्टिस्टेटवर एमपीआयडीची कारवाई; ठेवीदारांच्या ठेवी परत करण्यासाठी पाऊल
Ranji Trophy 2024-25 Live Streaming : रणजी ट्रॉफीत दशकानंतर स्टार्सचा तडका; जाणून घ्या टीव्ही अन् मोबाईलवर कुठं, कधी पाहायचा Live सामना
रणजी ट्रॉफीत दशकानंतर स्टार्सचा तडका; जाणून घ्या टीव्ही अन् मोबाईलवर कुठं, कधी पाहायचा Live सामना
Sangli Crime: मिरेजत Mephentermine ड्रग्जचा मोठा साठा जप्त, 14 लाखांची इंजेक्शन्स अन् झटक्यात हवेत नेणाऱ्या 176 गोळ्या सापडल्या
मिरेजत Mephentermine ड्रग्जचा मोठा साठा जप्त, 14 लाखांची इंजेक्शन्स अन् झटक्यात हवेत नेणाऱ्या 176 गोळ्या सापडल्या
Kulhad Pizza Couple : MMS लीक, सोशल मीडियावर ट्रोल, मग धमक्यांचे सत्र; पोलिस सुरक्षा दिलेल्या कुल्हड पिझ्झा जोडप्याचा भारताला कायमचा रामराम!
MMS लीक, सोशल मीडियावर ट्रोल, मग धमक्यांचे सत्र; पोलिस सुरक्षा दिलेल्या कुल्हड पिझ्झा जोडप्याचा भारताला कायमचा रामराम!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dream Mall Dead Body : मुंबईतील मॉलमध्ये धक्कादायक घटना,पाण्यात तरंगताना दिसला मृतदेहHasan Mushrif : आम्ही दादांच्या कानावर सगळं घातलं, हसन मुश्रीफ नेमकं काय म्हणाले...?MNS Mumbai Action : बाऊंसर्सकडून मराठी बोलण्यास नकार, मनसेनं तासाभरात माज उतरवलाDonald Trump on American Citizenship : ट्रम्प यांचा मोठा निर्णय; भारतीयांसाठी आणखी एक डोकेदुखी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed Bank Scam: बीडच्या जिजाऊ माँसाहेब मल्टिस्टेटवर एमपीआयडीची कारवाई; ठेवीदारांच्या ठेवी परत करण्यासाठी पाऊल
बीडच्या जिजाऊ माँसाहेब मल्टिस्टेटवर एमपीआयडीची कारवाई; ठेवीदारांच्या ठेवी परत करण्यासाठी पाऊल
Ranji Trophy 2024-25 Live Streaming : रणजी ट्रॉफीत दशकानंतर स्टार्सचा तडका; जाणून घ्या टीव्ही अन् मोबाईलवर कुठं, कधी पाहायचा Live सामना
रणजी ट्रॉफीत दशकानंतर स्टार्सचा तडका; जाणून घ्या टीव्ही अन् मोबाईलवर कुठं, कधी पाहायचा Live सामना
Sangli Crime: मिरेजत Mephentermine ड्रग्जचा मोठा साठा जप्त, 14 लाखांची इंजेक्शन्स अन् झटक्यात हवेत नेणाऱ्या 176 गोळ्या सापडल्या
मिरेजत Mephentermine ड्रग्जचा मोठा साठा जप्त, 14 लाखांची इंजेक्शन्स अन् झटक्यात हवेत नेणाऱ्या 176 गोळ्या सापडल्या
Kulhad Pizza Couple : MMS लीक, सोशल मीडियावर ट्रोल, मग धमक्यांचे सत्र; पोलिस सुरक्षा दिलेल्या कुल्हड पिझ्झा जोडप्याचा भारताला कायमचा रामराम!
MMS लीक, सोशल मीडियावर ट्रोल, मग धमक्यांचे सत्र; पोलिस सुरक्षा दिलेल्या कुल्हड पिझ्झा जोडप्याचा भारताला कायमचा रामराम!
शासनाकडे शेतकऱ्याचे सर्व डिटेल्स तरी बोगस अर्ज येतात कसे? रोहित पवारांचा सवाल, म्हणाले संगनमताशिवाय..
शासनाकडे शेतकऱ्याचे सर्व डिटेल्स तरी बोगस अर्ज येतात कसे? रोहित पवारांचा सवाल, म्हणाले संगनमताशिवाय..
Dharashiv Crime : रस्त्यात हाक मारल्याचा राग आला, तरुणावर मटणाच्या दुकानातील भल्यामोठ्या सुऱ्याने हल्ला, धाराशिव हादरलं
रस्त्यात हाक मारल्याचा राग आला, तरुणावर मटणाच्या दुकानातील भल्यामोठ्या सुऱ्याने हल्ला, धाराशिव हादरलं
Sharon Raj murder case : बाॅयफ्रेंडला आयुर्वेदिक टॉनिकमध्ये विष घालून ठार मारले, दोषी 24 वर्षीय गर्लफ्रेंडला फाशीची शिक्षा
बाॅयफ्रेंडला आयुर्वेदिक टॉनिकमध्ये विष घालून ठार मारले, दोषी 24 वर्षीय गर्लफ्रेंडला फाशीची शिक्षा
Donald Trump: मेलेनिया ट्रम्पमुळं पती डोनाल्ड ट्रम्प यांचं नुकसान, साडे सात अब्ज अमेरिकन डॉलर्स गमावले, वाचा काय घडलं?
डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षा मेलेनिया ट्रम्पला अधिक पसंती, गुंतवणूकदारांनी निर्णय फिरवला, ट्रम्प यांचं मोठं नुकसान
Embed widget