एक्स्प्लोर
ठरलं! असं असेल नवीन राम मंदिर, मंदिराची संरचना तयार
सुप्रीम कोर्टाने अयोध्येतील संपूर्ण वादग्रस्त (2.77 एकर) जागा रामलल्लाला देण्याचा निर्णय घेतला आहे. 2.77 एकर जागेवर नवं राम मंदिर बांधण्यांचा निर्णय घेण्यात आला आहे.
अयोध्या/मुंबई : गेल्या कित्येक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अयोध्येमधील बहुचर्चित वादग्रस्त जागेबाबत सुप्रीम कोर्टाने निकाल दिला आहे. सुप्रीम कोर्टाने या संदर्भात निर्णय देताना अयोध्येतील संपूर्ण वादग्रस्त (2.77 एकर) जागा रामलल्लाला देण्याचा निर्णय घेतला आहे. 2.77 एकर जागेवर नवं राम मंदिर बांधण्यांचा निर्णय घेण्यात आला आहे.
असं असेल नवं राम मंदिर
मंदिर एकूण दोन मजल्यांचं असेल. मंदिरातील पहिल्या मजल्यावर प्रभू श्रीरामाची मूर्ती असेल. मंदिराच्या दुसऱ्या मजल्यावर प्रभू श्रीरामाचा दरबार असेल. मंदिराच्या घुमटावर धर्मध्वजाची उभारणी केली जाणार आहे. एकूण 212 खांबावर मंदिराची उभारणी केली जाणार आहे. नव्या राम मंदिराची लांबी 275 फुट, उंची 135 फुट, रुंदी 125 फुट इतकी असेल. एकूण 36 हजार 450 चौरस फुट इतक्या क्षेत्रफळावर मंदिर उभारलं जाणार आहे.
राम मंदिर निर्मितीचा प्लॅन
येत्या 3 महिन्यांमध्ये ट्रस्ट निर्माण करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. या राम मंदिर ट्रस्टमध्ये सहापेक्षा अधिक सदस्य असू शकतात. मंदिरासाठी उत्तर प्रदेश सरकारचं 500 कोटींचं बजेट असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राम मंदिराच्या 8 किलोमीटरच्या परिघात धर्मशाळा, हॉटेल बांधण्यास परवानगी नसेल.
2020 मध्ये राम मंदिराच्या बांधकामास सुरुवात होईल. तर 2023 पर्यंत मंदिराचं बांधकाम पूर्ण करण्याचे सरकारचे लक्ष्य आहे. दरम्यान मंदिराचं बहुतांश स्ट्रक्चर हे दगडाचं असेल. त्यासाठी लागणारे दगड तासण्याचे काम सुरु आहे. आतापर्यंत 60 टक्के दगड तासण्याचे काम पूर्ण झालं आहे. दरम्यान मंदिरासोबतच अयोध्येच्या पुनर्विकासाची योजना आखण्यात येणार आहे.
रामलल्लाला कोर्टाने पक्षकार मानलं, रामलल्लाचं कायदेशीर अस्तित्व कोर्टाला मान्य
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement