ED तील मोठं पद सोडून राजकारणात एंट्री, 24 तासांत भाजपकडून तिकीट अन् विक्रमी मतांनी विजय!
UP Assembly Election 2022 : अंमलबजावणी संचालनालयात (ED) सहसंचालक असलेले एका अधिकाऱ्याने व्हीआरएस (VRS) घेऊन राजकारणात (Politics) एंट्री घेतली.
UP Assembly Election 2022 : अंमलबजावणी संचालनालयात (ED) सहसंचालक असलेले एका अधिकाऱ्याने व्हीआरएस (VRS) घेऊन राजकारणात (Politics) एंट्री घेतली. निवडणुकीच्या रिंगणात उतरताच भाजपने अनेक जुन्या नेत्यांना मागे टाकत त्यांना लखनौच्या सरोजिनी नगर मतदारसंघातून उमेदवारी दिली.
55000 हून अधिक मतांनी पराभव
गेल्या महिन्यात अंमलबजावणी संचालनालय (ED) मधून स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर भाजपमध्ये सामील झालेल्या राजेश्वर सिंह यांनी गुरुवारी लखनौच्या सरोजिनी नगर विधानसभा मतदारसंघात मोठ्या फरकाने विजय मिळवला. राजेश्वर सिंह यांनी समाजवादी पक्षाचे उमेदवार अभिषेक मिश्रा यांचा 55000 हून अधिक मतांनी पराभव केला. ईडीचे सहसंचालक म्हणून सिंग यांनी सपा प्रमुख अखिलेश यादव आणि बसपा प्रमुख मायावती यांच्यासह अनेक प्रमुख राजकारण्यांची चौकशी केली आहे. अंमलबजावणी संचालनालयात (ED) सहसंचालक असलेले राजेश्वर सिंह (Rajeshwar Singh) यांनी व्हीआरएस (VRS) घेऊन राजकारणात (Politics) एंट्री घेतली आहे. योगी सरकारमध्ये मंत्री असलेल्या स्वाती सिंह यांच्या जागी राजेश्वर सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सेवेतून स्वेच्छानिवृत्ती
उत्तर प्रदेश पोलिसांत सेवा बजावलेल्या राजेश्वर सिंह यांनी त्यांच्या कार्यकाळात राष्ट्रीय प्रभाव आणि सार्वजनिक महत्त्वाच्या अनेक घोटाळ्यांचा पर्दाफाश केला आणि तपास केला. 2008, 2G स्पेक्ट्रम वाटप प्रकरण, ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर करार, एअरसेल मॅक्सिस घोटाळा, आम्रपाली घोटाळा, नोकिया पॉन्झी घोटाळा, गोमती रिव्हरफ्रंट घोटाळा या प्रकरणांसाठी काम केले. राजेश्वर सिंह यांच्यावर आणि भाजपवर टीकाही झाली होती. अधिकारी पदावर असताना कुणाचा अजेंडा चालवला असेल, ते किती यंत्रणेसाठी घातक आहे अशा चर्चाही झाल्या आहेत. भाजपनं आजवर अशा काही पोलिस तसेच अन्य अधिकाऱ्यांना तिकीटं दिली आहेत. तत्कालीन मुंबई पोलिस आयुक्त सत्यपाल सिंह यांनी देखील राजीनामा दिल्यानंतर लगेच भाजपचं तिकीट मिळालं होतं.
ईडीतील एवढं मोठं पद सोडून त्यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय का घेतला?
एका टीव्ही मुलाखतीत हा प्रश्न विचारला असता तो म्हणाला, “मला खूप बरे वाटत आहे की मी देशाची सेवा करण्यासाठी नवीन इनिंग सुरू करणार आहे. यापूर्वीही पोलीस आणि ईडीमध्ये राहून देशाची सेवा केली आहे. त्यात अधिक संधी आहे. देशासाठी, गरीब आणि तरुणांसाठी काम करावे लागेल. पंतप्रधान मोदी हे स्वत:साठी प्रेरणास्थान असल्याचे वर्णन करताना राजेश्वर सिंह म्हणाले, "मोदीजींचे व्यक्तिमत्त्व, त्यांचे विचार, विकासाची विचारधारा माझ्यावर प्रभाव टाकते. देशासाठी त्यांनी जेवढे काम केले तेवढे काम आजवर कोणत्याही नेत्याने केले नव्हते. परदेशात त्यांनी देशाचा गौरव केला आहे. कोविडमध्ये गरिबांसाठी जेवढे काम झाले, तेवढेच 80 कोटी लोकांना मोफत रेशन देण्यात आले. मी पीएम मोदींपासून खूप प्रभावित आहे.
सरोजनी नगर की जनता की जीत हुई है। यह विजय क्षेत्र के कार्यकर्ताओं की मेहनत और जनता के भरोसे को समर्पित है।
— Rajeshwar Singh (@RajeshwarS73) March 10, 2022
आप सभी के आशीर्वाद एवं सहयोग से जीत का प्रमाण पत्र प्राप्त हुआ! pic.twitter.com/cCwngMnhD0
योगी सरकारचे कौतुक
यूपीमधील योगी सरकारचे कौतुक करताना राजेश्वर सिंह म्हणाले, "योगीजींनी उत्तर प्रदेशला माफियामुक्त केले आहे. अशा प्रकारे यूपीमध्ये शांतता आणि सलोखा राखला जावा यासाठी मला त्यांना पाठिंबा द्यायचा आहे.” सरोजिनीनगर जागेवरून विजयाचा विश्वास व्यक्त करून ते म्हणाले की, 2017 च्या तुलनेत यावेळी भाजप जास्त जागा जिंकून सरकार स्थापन करेल.राजेश्वर सिंह यांनी लखनौशी आपले नाते आणि इच्छा व्यक्त करताना सांगितले की, "मी जनतेसाठी एवढी मोठी नोकरी सोडली, लखनौ ही माझी जन्मभूमी आहे, मी येथेच शिक्षण घेतले. हे माझे कामाचे ठिकाण देखील आहे. लखनौमध्ये माझे वडील पोलिसात राहिले. मी देखील 10 वर्षे काम केले आहे. ईडीची निवृत्तीही लखनौमधून घेण्यात आली आहे. लखनौसाठी काम करण्याची खूप इच्छा आहे.
संबंधित बातम्या :
Mayawati on election : यावेळी मुस्लिमांनी 'ही' चूक केली, निवडणुकीत पराभवानंतर मायावतींचं मोठं वक्तव्य
UP Elections : उत्तर प्रदेशमध्ये भाजपचा दणदणीत विजय, Yogi Adityanath सलग दुसऱ्यांदा होणार CM
UP Elections : उत्तर प्रदेशच्या निकालानंतर देशातील राजकीय समीकरणं बदलणार : ABP Majha