एक्स्प्लोर

'भाजपमध्ये जाणार नाही, काही लोकांनी अफवा पसरवली' : सचिन पायलट

राजस्थानचे उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदावरुन हटवण्यात आल्यानंतर सचिन पायलट यांनी भाजपमध्ये जाणार नसल्याचं म्हटलं आहे.

नवी दिल्ली:  राजस्थानचे उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदावरुन हटवण्यात आल्यानंतर सचिन पायलट यांनी भाजपमध्ये जाणार नसल्याचं म्हटलं आहे. एबीपी न्यूजशी बोलताना सचिन पायलट म्हणाले की, मी भाजपमध्ये जाणार नाही, मी माझी रणनीति तयार करत आहे. काही लोकांनी मी भाजपमध्ये जाणार असल्याच्या अफवा पसरवल्या असल्याचं पायलट म्हणाले.  दरम्यान आज, सचिन पायलट पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करतील, अशी शक्यता आहे. दरम्यान राजस्थान विधानसभा अध्यक्षांकडून सचिन पायलट यांच्यासह 19 आमदारांना नोटिस पाठवण्यात आली आहे. त्यात 17 जुलैपर्यंत आपली भूमिका स्पष्ट करण्याचं सांगितलं आहे. सध्या सचिन पायलट आपल्या वकिलांशी चर्चा करत आहेत. दरम्यान त्यांच्यासह 19 आमदारांना विधानसभा सदस्यता रद्द करण्यासंदर्भात काँग्रेसकडून नोटिस पाठवली आहे. दोन दिवसात या नोटिशीला उत्तर देण्याबाबत सांगितलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार पायलट नवीन पक्षाची स्थापना देखील करु शकतात. सचिन पायलट यांना हटवल्यानंतर राजीनामास्त्र सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्री आणि राजस्थान प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष पदावरुन हटवल्यानंतर एनएसयूआय प्रदेश अध्यक्ष अभिमन्यु पूनिया यांनी राजीनामा दिला. तसेच टोंकमध्ये लक्ष्मण सिंह गाता यांच्यासह 59 पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. पाली जिल्हा काँग्रेस अध्यक्ष चुन्नीलाल चादवास यांनीही राजीनामा दिला आहे. सचिन पायलट यांच्यावर अखेर कारवाई, राजस्थानचं कुठल्या वळणावर जाणार राजकारण सचिन पायलट यांचं ट्वीट पायलट यांनी ट्वीट करत त्यांना पाठिंबा देणाऱ्यांचे आभार मानले आहेत. "मला ज्यांनी पाठिंबा दिला, त्यांचे मी आभार मानतो. राम राम सा. सत्य परेशान होऊ शकत मात्र पराजित नोही होऊ शकत, असं पायलट यांनी म्हटलं होतं. आपण पक्षासाठी इतकं काम केलेलं असतानाही फक्त अनुभवाच्या आधारे अशोक गेहलोत यांनी मुख्यमंत्रीपदावर दावा केला. नाराज असतानाही राहुल गांधी यांनी आग्रह केल्यानेच आपण उपमुख्यमंत्रीपद घेतलं, असंही पायलट यांनी म्हटलं होतं. 19 आमदारांना सोबत घेऊन सरकार पाडण्याचं षडयंत्र केल्याच्या आरोपावरुन सचिन पायलट यांची सर्व महत्वाची पदं काढून घेण्यात आली आहेत. सचिन पायलट यांच्या बंडानंतरही राजस्थान सरकारला तूर्तास धोका नाही. कारण या 19 आमदारांवर निलंबनाची कारवाई झाली की संख्याबळ 180 च्या आसपास येतं. बहुमताचा आकडा होतो 91 आणि गहलोतांकडे तूर्तास तरी 100 च्या पुढे आमदार आहेत. प्रश्न असा आहे की सचिन पायलट जर भाजपमधे जाणार नाहीयत, तर मग ते नवा पक्ष काढणार का? गेल्या दोन दिवसांपासून सचिन पायलट यांनी या सगळ्या प्रकरणावर चुप्पी साधली होती. गेल्या तीन महिन्यांत काँग्रेसला बसलेला हा दुसरा धक्का आहे. ज्योतिरादित्य शिंदे भाजपमध्ये गेले. मध्य प्रदेशातलं काँग्रेसचं सरकारही गेलं आणि आता सचिन पायलट. पण मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या आकड्यांमध्ये फरक आहे. त्यामुळेच तूर्तास इथे काँग्रेसला सरकार जाण्याचा धोका नाही.

महत्त्वाच्या बातम्या

Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर

अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद

कपिल सिब्बलांचा सर्वात मोठा डाव, निवडणूक आयोगाचं पितळ उघडं पाडलं, दस्तऐवजावरील सही शिक्काच दाखवला!

मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
पेपरफूट, परीक्षा गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परिक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
पेपरफूट, परीक्षा गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परिक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; ्
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
Manoj Jarange Patil Defender Car: दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
कपिल सिब्बलांचा सर्वात मोठा डाव, निवडणूक आयोगाचं पितळ उघडं पाडलं, दस्तऐवजावरील सही शिक्काच दाखवला!
कपिल सिब्बलांचा सर्वात मोठा डाव, निवडणूक आयोगाचं पितळ उघडं पाडलं, दस्तऐवजावरील सही शिक्काच दाखवला!
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर

Embed widget