एक्स्प्लोर

भाजपला लोकशाही निराश करते, राहुल गांधींची टीका

गोव्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी गांधीगिरीचे प्रदर्शन, धाडस व साहसा याबद्दल मला अभिमान आहे. अशा घटनांमधून आम्ही कोण आहोत, ते अधोरेखित होते. देशात अहिंसक काँग्रेस कार्यकर्त्यांवर हल्ला करणाऱ्या यंत्रणेला व सरकारला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चांगला सल्ला देण्याची आवश्यकता आहे, असा टोला गांधी यांनी लगावला आहे.

पणजी : गोव्यात राफेल वरुन काँग्रेस आणि भाजपमध्ये सुरु असलेल्या आरोप-प्रत्यारोपाच्या युद्धात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील उडी घेतली आहे. लोकशाही भाजपला निराश करते. गोव्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांवर झालेला हल्ला हा नियोजन करून, मुद्दामहून व संघटीतपणे केलेला हल्ला होता. भाजपने दहशत निर्माण करण्याचा केलेला हा प्रयत्न आहे, असा आरोप असलेली पोस्ट  राहुल गांधी यांनी आपल्या फेसबुक पेजवर टाकून त्याला राष्ट्रीय वळण दिले आहे. आपल्या फेसबुक वॉलवर राहुल गांधी यांनी गोव्यातील घटनेचे दोन फोटो पोस्ट केले आहेत. सोबत भाजपने केलेल्या या हल्ल्याचा निषेध केला आहे. गोव्यात काँग्रेस कार्यकर्त्यांवर हल्ला करणारे भ्याड व त्यांच्या दिल्लीत बसलेल्या बॉसना काँग्रेस घाबरत नाही, असेही गांधी यांनी स्पष्ट केले. गोव्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी गांधीगिरीचे प्रदर्शन, धाडस व साहसा याबद्दल मला अभिमान आहे. अशा घटनांमधून आम्ही कोण आहोत, ते अधोरेखित होते. देशात अहिंसक काँग्रेस कार्यकर्त्यांवर हल्ला करणाऱ्या यंत्रणेला व सरकारला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चांगला सल्ला देण्याची आवश्यकता आहे, असा टोला गांधी यांनी लगावला आहे. शुक्रवारी राफेल प्रकरणी काँग्रेसचा निषेध करण्यासाठी प्रदेश भाजपने काँग्रेस भवनसमोर मोर्चा आणला होता. त्यावेळी भाजप व काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तणाव निर्माण झाला होता. या प्रकारानंतर भाजप व काँग्रेसने परस्परविरोधी तक्रारी पणजी पोलीस स्थानकात नोंदवण्यात आल्या आहेत. भाजपकडून राज्यात गुंडाराज सुरू असल्याचा आरोप महिला काँग्रेसच्या अध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो यांनी केला तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी काँग्रेसने भाजप कार्यकर्त्यांना भडकवण्याचा प्रयत्न केल्याचा दावा केला.

महत्त्वाच्या बातम्या

महिलांसाठी गुड न्यूज! आता तिसऱ्या अपत्याच्या जन्मासाठीही मिळणार 365 दिवसांची रजा, 'या' सरकारनं घेतला मोठा निर्णय 
महिलांसाठी गुड न्यूज! आता तिसऱ्या अपत्याच्या जन्मासाठीही मिळणार 365 दिवसांची रजा, 'या' सरकारनं घेतला मोठा निर्णय 
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Bangladesh : भारतावर जळणारा बांगलादेश अंधारात, मदतीसाठी भारताकडे याचना; परराष्ट्र मंत्रालय म्हणाले, आमच्या गरजा लक्षात घेऊन...
भारतावर जळणारा बांगलादेश अंधारात, मदतीसाठी भारताकडे याचना; परराष्ट्र मंत्रालय म्हणाले, आमच्या गरजा लक्षात घेऊन...
तुम्हाला UPSC तयारी करायचीय? मुख्य परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी किती लागतात गुण? गेल्या तीन वर्षातील कट ऑफ किती? 
तुम्हाला UPSC तयारी करायचीय? मुख्य परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी किती लागतात गुण? गेल्या तीन वर्षातील कट ऑफ किती? 

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget