Sheen Mubarak : राहुल गांधींनी पहिल्या बर्फवृष्टीच्या दिल्या शुभेच्छा; जाणून घ्या 'शीन मुबारक' म्हणजे काय?
Rahul Gandhi : कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी 'शीन मुबारक' म्हणत काश्मीरमधील पहिल्या बर्फवृष्टीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
Rahul Gandhi On Sheen Mubarak : कॉंग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या कन्याकुमारीहून निघालेल्या 'भारत जोडो यात्रे'चा (Bharat Jodo Yatra) आज शेवटचा दिवस होता. आज काश्मिरमधील श्रीनगरात ही यात्रा समाप्त झाली. दरम्यान राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांना बर्फात खेळण्याचा मोह आवरता आला नाही. त्यांनी काश्मीरमधील (Kashmir) बर्फवृष्टीचा आनंद लुटला. राहुल गांधी यांनी प्रियाकां गांधी यांच्यासोबत बर्फात खेळतानाचा व्हिडीओ शेअर करत पहिल्या बर्फवृष्टीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
राहुल गांधींनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ते प्रियांका गांधी यांच्यासोबत बर्फवृष्टीचा आनंद घेताना दिसत आहेत. भाऊ-बहिण एकमेकांवर बर्फाचे गोळे फेकत आहेत. व्हिडीओ शेअर करत त्यांनी लिहिलं आहे,"शीन मुबारक! 'भारत जोडो यात्रे'तील श्रीनगरातील शेवटची सकाळ". राहुल गांधी यांच्या या व्हिडीओनंतर 'शीन मुबारक' म्हणजे काय असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
Sheen Mubarak!😊
— Rahul Gandhi (@RahulGandhi) January 30, 2023
A beautiful last morning at the #BharatJodoYatra campsite, in Srinagar.❤️ ❄️ pic.twitter.com/rRKe0iWZJ9
'शीन मुबारक' म्हणजे काय? (What Is Sheen Mubarak)
काश्मिरमधील हंगामातील पहिल्या बर्फवृष्टीच्या शुभेच्छांना (First Snowfall In Kashmir) 'शीन मुबारक' (Sheen Mubarak) असे म्हटले जाते. काश्मीरमधील मंडळी 'शीन मुबारक' (Navsheen) म्हणत एकमेकांना हंगामातील पहिल्या बर्फवृष्टीच्या शुभेच्छा देत असतात. सोप्या भाषेत 'शीन मुबारक' म्हणजे पहिल्या हिमवर्षावासाठी शुभेच्छा. पहिल्या बर्फवृष्टीदरम्यान काश्मीरमधील स्थानिक मंडळी पर्यटकांनादेखील 'शीन मुबारक' म्हणत पहिल्या बर्फवृष्टीच्या शुभेच्छा देत असतात. आता सोशल मीडियाच्या माध्यमातूनदेखील काश्मीरमधील मंडळी एकमेकांना 'शीन मुबारक' म्हणत शुभेच्छा देतात.
View this post on Instagram
पहिल्या बर्फवृष्टीची काश्मिरमधील मंडळींसह पर्यटकदेखील प्रतीक्षा करत असतात. त्यामुळे पहिल्या बर्फवृष्टीनंतर त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. त्यामुळेच एकमेकांना 'शीन मुबारक' म्हणत ते आपला आनंद व्यक्त करतात. एकमेकांवर बर्फाचे गोळे फेकत बर्फवृष्टीचा आनंद घेतात.
आज भारत जोडो यात्रेच्या शेवटच्या दिवशी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनीदेखील बर्फासोबत खेळणं पसंत केलं. एकमेकांवर बर्फाचे गोळे उधळत त्यांनी आपला आनंद साजरा केला. राहुल आणि प्रियांका यांच्यासह क्रॉंग्रेसच्या इतर नेत्यांनीदेखील आनंद लुटला आहे. सभेच्या ठिकाणी बर्फवृष्टी होत असतानादेखील राहुल गांधी यांनी समारोपाचे भाषण करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
संबंधित बातम्या