एक्स्प्लोर
शरद पवारांच्या घरी जाऊन राहुल गांधींची खलबतं!
सोनिया गांधींनी दोन दिवसांपूर्वी मेजवानीच्या निमित्ताने भाजपविरोधातील समविचारी पक्षांशी अनौपचारिक बोलणी केली होती.
नवी दिल्ली : उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये सपा-बसपा एकत्र आली आणि भाजपला धूळ चारण्यात यश मिळालं. त्यानंतर लगेचच दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी संध्याकाळी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचं दिल्लीतील निवासस्थान गाठलं. तिथे शरद पवार आणि राहुल गांधी यांच्यात तासभर चर्चा झाली. सलग दोन दिवसातील ही दुसरी भेट आहे.
सोनियांची डिनर डिप्लोमसी, दिल्लीत मोदी विरोधक एकवटले
सोनिया गांधींनी दोन दिवसांपूर्वी मेजवानीच्या निमित्ताने भाजपविरोधातील समविचारी पक्षांशी अनौपचारिक बोलणी केली होती. आपल्या निवासस्थानी आयोजित केलेल्या डिनरला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, सीपीआयएम, सीपीआय, तृणमूल काँग्रेस यांसह 20 विरोधी पक्षांच्या नेत्यांनी हजेरी लावली.
या डिनर डिप्लोमसीनंतर राहुल गांधींनी संपर्क अभियानाला सुरुवात केल्याचं दिसत आहे. त्यामुळे येत्या काळात मोदी विरोधकांची मोट बांधण्यासाठी राहुल गांधी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनाही भेटण्याची शक्यता आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement