Rahul Gandhi In Cambridge : देशात रॉकेल शिंपडण्याचे काम भाजपचं, तर काँग्रेसकडे आग विझविण्याची जबाबदारी, राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
Rahul Gandhi In Cambridge : राहुल गांधींनी भाजपवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, काँग्रेसला पूर्वीसारखा भारत मिळवायचा आहे, त्यासाठी ते लढत आहेत. पण भाजप त्यांचा आवाज दाबत आहे
Rahul Gandhi In Cambridge : देशात सध्या रॉकेल शिंपडण्याचे काम भाजप करत आहे. त्याची एक ठिणगी मोठी आग लावू शकते. ही आग विझविण्याची जबाबदारी काँग्रेसची आहे. असं काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) ब्रिटनमध्ये बोलताना म्हणाले. शुक्रवारी 20 मे रोजी, त्यांनी लंडनमधील केंब्रिज विद्यापीठात "आयडियाज फॉर इंडिया" परिषदेत भाग घेतला. त्यावेळी त्यांनी विविध आरोप करत भाजपवर हल्लाबोल केला आहे. राहुल गांधींसह सीताराम येचुरी, सलमान खुर्शीद, तेजस्वी याद यांच्यासह अनेक विरोधी नेते या परिषदेत सहभागी झाले होते.
राहुल गांधींचा भाजपवर जोरदार हल्लाबोल
राहुल गांधींनी यावेळी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, काँग्रेसला पूर्वीसारखा भारत मिळवायचा आहे, त्यासाठी ते लढत आहेत. त्याचवेळी भाजप त्यांचा आवाज दाबत आहे. ते म्हणाले की, ज्या संस्थांनी देशाची उभारणी केली, त्यांच्यावर देशाचे हल्ले होत आहेत.
देशात रॉकेल शिंपडण्याचे काम भाजप करतेय, राहुल यांचा भाजपवर आरोप
राहुल म्हणाले, भाजप सरकार आणि आरएसएस देशाला भूगोल म्हणून पाहतात. पण आमच्यासाठी, आमच्या पक्षासाठी भारत हा माणसांचा बनलेला आहे. मात्र, पक्षात सध्या अंतर्गत कलह, बंडखोरी, निवडणुकीत पराभव होत असल्याचे राहुल यांनी नाकारले नाही. भारतातील परिस्थिती सध्या चांगली नाही यावर राहुल यांनी भर दिला. भाजपवर आरोप करताना ते म्हणाले की, देशात रॉकेल शिंपडण्याचे काम भाजप करत आहे. एक ठिणगी आग लावू शकते. ही उष्णता शमविण्याची जबाबदारी काँग्रेसची आहे.
आरएसएसवर टीका
यादरम्यान राहुल यांनी केंद्र सरकारवर सीबीआयसारख्या संस्थांचा गैरवापर केल्याचा आरोप करत भारताची तुलना पाकिस्तानशी केली आहे. आरएसएसवर टीका करताना राहुल म्हणाले की, RSS साठी भारत सोन्याचा पक्षी आहे आणि कर्माच्या आधारे आपला वाटा वाटून घ्यायचा आहे, ज्यामध्ये दलितांना स्थान नाही. याशिवाय राहुल गांधींनी काँग्रेसच्या पराभवाचे श्रेय ध्रुवीकरण आणि मीडिया कंट्रोलला दिले. ते म्हणाले की आरएसएसने लोकांमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. काँग्रेस आणि विरोधी पक्षांनीही असेच केले पाहिजे आणि त्या 60-70% लोकांना एकत्र केले पाहिजे, जे त्यांना मत देत नाहीत.
Democracy in India is a global public good. We're the only people who have managed democracy at our unparalleled scale.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 20, 2022
Had an enriching exchange on a wide range of topics at the #IdeasForIndia conference in London. pic.twitter.com/QyiIcdFfjN
कार्यक्रमाचे फोटो ट्विटरवर शेअर
काँग्रेस नेते राहुल गांधी यावेळी म्हणाले की, भारतातील लोकशाही ही जागतिक जनहिताची आहे. आपणच लोक आहोत, ज्यांनी लोकशाहीला अतुलनीय प्रमाणात सांभाळले आहे. या कार्यक्रमाचे फोटोही राहुल यांनी ट्विटरवर शेअर केले आहेत. यामध्ये राजदचे तेजस्वी यादव, मनोज झा, टीएमसीचे महुआ मोईत्रा आणि सीपीआय(एम)चे सीताराम येचुरी. राहुल यांनी ट्विट केले की, लंडनमधील #IdeasForIndia परिषदेत विविध विषयांवर समृद्ध देवाणघेवाण झाली.