एक्स्प्लोर

Rahul Gandhi Defamation Case: राहुल गांधींना खासदारकी पुन्हा मिळणार? गुजरात उच्च न्यायालयामध्ये शुक्रवारी पार पडणार सुनावणी

Rahul Gandhi Defamation Case: मोदी आडनावाच्या लोकांवर टीका केल्याने राहुल गांधी यांच्यावर मानहानीच्या प्रकरणात सूरत न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती.

Rahul Gandhi Defamation Case: राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मानहानीच्या प्रकरणात गुजरात उच्च न्यायालयामध्ये दाखल केलेल्या याचिकेवर शुक्रवारी (7 जुलै) रोजी सुनावणी पार पडणार आहे. त्यांनी सुरत कोर्टाने दोषी ठरवत 23 मार्च रोजी दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती.

दोषी ठरवल्यानंतर राहुल गांधी यांची खासदारकी देखील रद्द करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी गुजरात उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती.  लोकसभेची खासदारकी रद्द केल्यानंतर राहुल गांधी यांनी केरळमधील वायनाड येथील एका सभेमध्ये म्हटलं होतं की, 'केंद्र सरकार माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत, पण मी त्यांना घाबरणार नाही.'

काँग्रेस आणि भाजपची काय प्रतिक्रिया?

राहुल गांधी यांच्याकडून अभिषेक मनु सिंघवी यांनी  सुनावणीदरम्यान गुजरात उच्च न्यायालयामध्ये म्हटलं होतं की, 'अनेक लोकं गुजरातमध्ये मोदी हे आडनाव लावतात. त्यामुळे राहुल गांधी यांच्या विधानाला सर्वांसोबत जोडता नाही येणार. याचिकाकर्त्यांनी म्हटलं आहे की देशातील 13 कोटी लोकांची बदनामी झाली आहे.' 

तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यासह पक्षातील इतर नेत्यांनी दावा केला होती की, 'राहुल गांधी यांनी इतर मागासवर्गीयांचा देखील अपमान केला आहे. त्यामुळे त्यांनी ओबीसी समाजाची माफी मागितली पाहिजे.' 

राहुल गांधींनी काय म्हटले?

राहुल गांधी यांनी 2019 मधील लोकसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान कर्नाटकात आपल्या भाषणात म्हटलं होतं की, 'सगळ्या चोरांचं आडनाव मोदी का आहे?' यावरुन भाजपचे नेते पूर्नेश मोदी यांनी सूरत कोर्टात त्यांच्या विरोधात मानहानीची तक्रार दाखल केली होती. त्यांनी म्हटलं होतं की, 'राहुल गांधींनी असं म्हणत मोदी आडनाव असलेल्या लोकांची बदनामी केली आहे.'  

भारतीय दंड संहिता कलम 499 आणि 500 अंतर्गत राहुल गांधींना दोषी ठरवणाऱ्या मुख्य न्यायदंडाधिकारी एचएच वर्मा यांच्या न्यायालयानेही त्यांना जामीन मंजूर केला आणि उच्च न्यायालयात अपील करण्याची मुभा देण्यासाठी 30 दिवसांची शिक्षा स्थगित केली होती. 

भाजपचे आमदार आणि गुजरातचे माजी मंत्री पूर्नेश मोदी यांनी राहुल गांधींविरोधात तक्रार दाखल केली होती. पूर्नेश मोदी हे भूपेंद्र पटेल सरकारच्या पहिल्या कार्यकाळात मंत्री होते आणि सुरत पश्चिम विधानसभेचे आमदार आहेत. राहुल गांधी यांना शिक्षा मिळणार की दिलासा मिळणार यासाठी या सुनावणीमध्ये निर्णय देण्यात येणार आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्यावरील या सुनावणीमध्ये नक्की काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

हे ही वाचा : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचा विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचा विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Abdul Sattar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या टीकेवर अब्दुल सत्तार यांचं प्रत्युत्तर काय?BKC Metro Station Fire : बीकेसी अंडरग्राऊंड मेट्रो स्थानकाला आगSharad Pawar Ichalkaranji : शरद पवारांची इचलकरंजीत भर पावसात सभाAaditya Thackeray : फडणवीस कधीच मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत, मनसेवरही हल्ला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचा विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचा विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
Embed widget