एक्स्प्लोर
राहुल गांधी अमेठीसह केरळच्या वायनाडमधूनही लढवणार निवडणूक
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी लोकसभा निवडणुकीमध्ये दोन जागांवर निवडणूक लढवणार असल्याची माहिती मिळाली आहे. राहुल गांधी उत्तर प्रदेशच्या अमेठीसह केरळ राज्यातील वायनाड या लोकसभा मतदारसंघातूनही निवडणूक लढवणार आहेत.
नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी लोकसभा निवडणुकीमध्ये दोन जागांवर निवडणूक लढवणार असल्याची माहिती मिळाली आहे. राहुल गांधी उत्तर प्रदेशच्या अमेठीसह केरळ राज्यातील वायनाड या लोकसभा मतदारसंघातूनही निवडणूक लढवणार आहेत.
राहुल गांधी दोन जागांवर निवडणूक लढवणार असल्याची माहिती काँग्रेस पक्षाचे नेते दिपक सिंह यांनी दिली. 2014 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही दोन मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मोदींनी गुजरातच्या वडोदरासह उत्तर प्रदेशच्या वाराणसीमधूनही निवडणूक लढवली होती.
दिपक सिंह याबाबत सांगताना म्हणाले की, राहुल गांधी हे देशाचे नेते आहेत. म्हणून ते अमेठीसह वायनाडमधूनही लाखांच्या फरकांने निवडणूक जिंकतील. यापूर्वी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी सुद्धा दोन मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यामुळे ही पारंपारीक बाब आहे, असं दिपक सिंह म्हणाले.
केरळच्या स्थानिक नेत्यांनी राहुल गांधीनी केरळमधून निवडणूक लढवावी अशी मागणी केली होती. शिवाय वायनाड लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनी हा निर्णय घेतला असल्याची माहिती आहे. काँग्रेसने केरळमधील 20 लोकसभा मतदारसंघातील 16 जागांवर निवडणूक लढणार आहे. आतापर्यंत काँग्रेसने 14 जागांवर आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement