Rabindranath Tagore Jayanti 2021 : देशात आज साजरा होतोय रविंद्रनाथ टागोर यांचा 160 वा जन्मदिवस
देशात आज रविंद्रनाथ टागोरांचा 160 वा जन्मदिवस साजरा केला जात आहे. महात्मा गांधींनी त्यांना गुरूदेव ही उपाधी दिली होती.
![Rabindranath Tagore Jayanti 2021 : देशात आज साजरा होतोय रविंद्रनाथ टागोर यांचा 160 वा जन्मदिवस Rabindranath Tagore Jayanti 2021 India celebrating 160th Birth anniversary Rabindranath Tagore Jayanti 2021 : देशात आज साजरा होतोय रविंद्रनाथ टागोर यांचा 160 वा जन्मदिवस](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/05/07/db1e4047a3d140a554c46df7b8178e7f_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली : देशाच्या संस्कृती, कला आणि साहित्यावर आपली छाप उमटवणाऱ्या आणि नोबेल पुरस्कार विजेत्या रविंद्रनाथ टागोरांचा आज 160 वा जन्मदिवस साजरा केला जात आहे. रविंद्रनाथ टागोरांना त्यांच्या गितांजली या महाकाव्यासाठी 1913 सालचा नोबेल पुरस्कार मिळाला होता. ते आशियातील पहिलेच नोबेल पुरस्कार विजेते होते.
रविंद्रनाथ टागोरांचा जन्म 7 मे 1861 साली कोलकात्यात एका संपन्न कुटुंबात झाला. रविंद्रनाथांनी बॅरिस्टर व्हावं अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. त्यासाठी त्यांना 1878 साली ब्रिटनला पाठवण्यात आलं. त्या ठिकाणी त्यांना पाश्चिमात्य संगीत आणि नृत्य तसेच अन्य कलांचा अविष्कार पहायला मिळाला. त्यानंतर ते भारतात परतले.
रविंद्रनाथ टागोरांनी अनेक साहित्यांची निर्मिती केली. त्यांनी 'सांध्यगीत' हा कविता संग्रह लिहिला. तसेच पोस्टमास्टर, चित्रा, नदी, चैताली, विदाई अभिशाप, चिरकुमार सभा, काबुलीवाला अशा अनेक साहित्यांची निर्मिती केली. जेव्हा आपण विनम्र असतो त्यावेळी आपण महानतेकडे प्रवास करत असतो असं ते म्हणायचे.
भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील प्रमुख घटना असलेल्या 1905 सालच्या बंगालच्या फाळणीला त्यांनी विरोध केला. 1919 सालच्या जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ त्यांनी 'नाईटहूड' ही उपाधी परत केली.
रविंद्रनाथ टागोरांना त्यांच्या 'गितांजली' या काव्यसंग्रहासाठी 1913 साली साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळाला. हा भारतातीलच नव्हे तर आशियातील पहिला नोबेल पुरस्कार होता. रविंद्रनाथ टागोरांना 'जन-गण-मन' या भारताच्या राष्ट्रगीताची रचना केली. तसेच त्यांनी 'आमार सोनार बांग्ला' या गीताची रचना केली. हे गीत आता बांग्लादेशचे राष्ट्रगीत आहे. महात्मा गांधी यांना रविंद्रनाथ टागोरांच्याबद्दल प्रचंड आदर होता. त्यांनीच टागोर यांना गुरूदेव अशी उपाधी दिली. रविंद्रनाथ टागोरांनी 7 ऑगस्ट 1941 साली अखेरचा श्वास घेतला.
महत्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)