(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Punjab : निवडणुकीच्या आधी सिद्धू यांच्या अडचणीत वाढ, रोडरेज प्रकरणात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Punjab News : आगामी निवडणुकीमध्ये पंजाबमध्ये काँग्रेसचे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार मानले जाणारे नवज्योत सिंह सिद्धू यांच्या अडचणी वाढल्या आहेत. रोडरेजच्या जुन्या प्रकरणात सिद्धूविरोधातील शिक्षेत वाढ करण्याच्या मागणीवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
Punjab News : आगामी निवडणुकीच्या आधी नवज्योत सिंह सिद्धू (Navjyot Singh Sidhu) यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. पंजाब काँग्रेसचे नवज्योत सिंह सिद्धू मुख्यमंत्रीपदाचे दावेदार मानले जात आहेत. रोडरेजच्या जुन्या प्रकरणात, नवज्योतसिंह सिद्धू यांच्या शिक्षेत वाढ करण्याच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय आज दुपारी सुनावणी पार पडणार आहे. 34 वर्षे जुन्या या प्रकरणात केवळ दंडाची शिक्षा देण्यात होती. 1988 च्या घटनेत गुरनाम सिंह यांची हत्या झाली होती. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने 2007 मध्ये सिद्धू आणि संधू यांच्या शिक्षेला स्थगिती दिली होती.
न्यायालय शिक्षेमध्ये वाढ करण्याच्या मागणीवर विचार करेल
उच्च न्यायालयाने सिद्धू यांना या प्रकरणात तीन वर्षांची शिक्षा सुनावली होती. 2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने सिद्धू यांची निर्दोष मुक्तता केली असली तरी पीडित कुटुंबाने 2018 मध्ये पुनर्विचार याचिका दाखल केली होती. आता निवडणुकीच्या रणधुमाळीत सर्वोच्च न्यायालय आज दुपारी या याचिकेवर सुनावणी करणार आहे. शिक्षेत वाढ करण्याच्या मागणीवरच विचार केला जाईल, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. सिद्धूला आयपीसीच्या कलम 323 अंतर्गत केवळ प्राणघातक हल्ल्यासाठी दोषी ठरवण्यात आले आहे, ज्यामध्ये जास्तीत जास्त एक वर्षाच्या शिक्षेची तरतूद आहे.
काय आहे प्रकरण?
फिर्यादीनुसार, नवज्योत सिंह सिद्धू आणि त्यांचा सहकारी रुपिंदर सिंह संधू 27 डिसेंबर 1988 रोजी पटियाला येथील शेरनवाला गेट चौकाजवळ रस्त्याच्या मधोमध उभ्या असलेल्या जिप्सीमध्ये बसले होते. यावेळी एक वृद्ध व्यक्ती आणि इतर दोघे पैसे काढण्यासाठी बँकेत जात होते. चौकाचौकात पोहोचल्यावर मारुती कार चालवत असलेल्या गुरनाम सिंह नावाच्या व्यक्तीने सिद्धू आणि संधू यांना रस्त्याच्या मधोमध जिप्सी काढण्यास सांगितले. यावरुन दोन्ही गटात बाचाबाची आणि मारहाण झाली. यानंतर गुरनाम सिंह यांचा मृत्यू झाला ट्रायल कोर्टाने सप्टेंबर 1999 मध्ये सिद्धू यांची हत्येच्या आरोपातून निर्दोष मुक्तता केली होती. सिद्धू आणि संधू यांच्या अपीलांवर सर्वोच्च न्यायालयाने गुरनाम सिंह यांच्या मृत्यूच्या कारणासंबंधीचे वैद्यकीय पुरावे पूर्णपणे अस्पष्ट असल्याचे सांगितले होते.
एक वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते
भादंवि कलम 323 (जाणूनबुजून दुखापत करण्यासाठी शिक्षा) अंतर्गत कमाल एक वर्ष कारावास किंवा 1000 रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे. एक वर्षाची शिक्षा ही दिलासा देणारी बाब असली तरी ऐन निवडणुकीच्या तोंडावर सिद्धूवर तुरुंगात जाण्याचा धोका कायम आहे. डिसेंबर 1988 च्या गुन्ह्याच्या वेळी सिद्धू यांच्या उपस्थितीचा कोणताही विश्वासार्ह साक्षीदार नव्हता असे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने सिद्धू यांचा सहकारी रुपिंदर सिंह संधू याला सर्व आरोपातून दोषमुक्त केले होते.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
- UP Election : भाजप विरोधात संयुक्त किसान मोर्चाचं 'मिशन उत्तर प्रदेश', दिल्लीत होणार पत्रकार परिषद
- शाळेत मुलांची हजेरी आवश्यक आहे की नाही हा निर्णय राज्यांचा : केंद्र सरकार
- INS Vagir : भारतीय नौदलाची ताकद वाढणार, आयएनएस वागीर पानबुडीची समुद्री चाचणी सुरु
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha