UP Election : भाजप विरोधात संयुक्त किसान मोर्चाचं 'मिशन उत्तर प्रदेश', दिल्लीत होणार पत्रकार परिषद
UP Assembly Elections 2022 : संयुक्त किसान मोर्चाचे नेते राकेश टिकैत यांनी म्हटले आहे की, केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांना निलंबित करण्याची आमची मागणी त्यांच्या निलंबनापर्यंत कायम राहील.
UP Assembly Elections 2022 : आगामी निवडणुकीसाठी प्रथम संयुक्त किसान मोर्चादेखील सक्रिय असून सरकारच्या विरोधात मोर्चा काढण्यासाठी तयार आहे. उत्तर प्रदेश निवडणुकीआधी संयुक्त किसान मोर्चा भाजपा विरोधात 'मिशन उत्तर प्रदेश'ची (Mission Uttar Pradesh) सुरुवात करणार आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये पत्रकार परिषद पार पडणार आहे.
शेतकरी संघटनाही घेणार 'नुक्कड सभा'
या पत्रकार परिषदेला शेतकरी नेते डॉ. दर्शन पाली, हन्नान मोल्ला, जगजित सिंग डल्लेवाल, जोगिंदर सिंग उग्राहान, राकेश टिकैत, शिवकुमार शर्मा, युद्धवीर सिंग आणि योगेंद्र यादव उपस्थित राहणार आहेत. मिशन उत्तर प्रदेशच्या पहिल्या टप्प्यात संयुक्त किसान मोर्चा आज पत्रकार परिषद घेणार आहे. त्यानंतर, संयुक्त किसान मोर्चा अंतर्गत शेतकरी संघटना 'नुक्कड सभा' आयोजित करतील आणि सोशल मीडियावर सरकारविरोधात मोहीम सुरू करतील.
शेतकरी संघटनांनी सोमवारी साजरा केला विश्वासघात दिन
केंद्राने दिलेली आश्वासने पूर्ण न केल्याबद्दल सोमवारी संयुक्त किसान मोर्चाने विश्वासघात दिवस साजरा केला. गेल्या आठवड्यात शुक्रवारी झालेल्या समन्वय समितीच्या बैठकीत या संदर्भात हा निर्णय घेण्यात आला. मिशन उत्तर प्रदेश अंतर्गत, संयुक्त किसान मोर्चा केंद्रीय मंत्री अजय मिश्रा टेनी यांना अटक आणि निलंबन करण्याची मागणी करणार आहे. टिकैत यांनी म्हटले आहे की, "केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांच्या निलंबनाची मागणी त्यांच्या निलंबनानंतरच थांबेल."
संयुक्त किसान मोर्चाने एका निवेदनात आरोप केला आहे की, सरकारने किमान आधारभूत किमतीबाबत समिती स्थापन करणे आणि आंदोलकांवरील खटले मागे घेणे यासह शेतकऱ्यांना दिलेली कोणतीही आश्वासने पूर्ण केली नाहीत. सरकारने आश्वासने न पाळल्यास शेतकऱ्यांना पुन्हा आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही.
केंद्राने तिन्ही कृषी कायदे मागे घेतले
केंद्र सरकारचे तीन वादग्रस्त कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमधील हजारो शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर एक वर्षापेक्षा जास्त काळ तळ ठोकत आंदोलन केले. सरकारने शेतकऱ्यांची मागणी मान्य करून इतर सहा मागण्यांवर विचार करण्याचे मान्य केल्यानंतर गेल्या वर्षी हे आंदोलन 9 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
- शाळेत मुलांची हजेरी आवश्यक आहे की नाही हा निर्णय राज्यांचा : केंद्र सरकार
- INS Vagir : भारतीय नौदलाची ताकद वाढणार, आयएनएस वागीर पानबुडीची समुद्री चाचणी सुरु
- Jumbo Mega Block : या वीकेंडचे नियोजन आधीच करुन घ्या... मध्य रेल्वेवर 72 तासांचा जम्बो मेगा ब्लॉक
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha