एक्स्प्लोर

 Punjab Election 2022 : पंजाबमधील सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? संपत्तीत पाच वर्षात झाली शंभर कोटींची वाढ 

Punjab Assembly Election 2022 : विधानसभा निवडणुकीसाठी पंजाबमध्ये 20 फेब्रुवारी रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीत शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंह बादल (Sukhbir Singh Badal) हे सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत.

Punjab Assembly Election 2022 : पंजाब (Punjab) मध्ये येत्या 20 फेब्रुवारी रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. पंजाबमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी सर्वच पक्ष जोरदार तयारी करत आहेत. 10 मार्च रोजी मतमोजणी झाल्यानंतरच पंजाबमध्ये कोणाचे सरकार येणार? हे स्पष्ट होणार आहे. परंतु, त्याआधी जाणून घ्या पंजाबमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण आहे? आणि तो कोणत्या पक्षाचा आहे? 

असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) आणि पंजाब इलेक्शन वॉचने दिलेल्या माहितीनुसार, शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंह बादल (Sukhbir Singh Badal) हे पंजाबमधील सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत. बादल यांची संपत्ती 202 कोटी रूपये असून ते पंजाबमधील जलालाबाद मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.  

सुखबीर सिंह बादल यांनी पाच वर्षात त्यांची संपत्ती तब्बल शंभर कोटींनी वाढल्याचे घोषीत केले आहे. 2017 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी त्यांची संपत्ती 102 कोटी रूपये असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. त्यानंतर 2017 पासून 102 वरून आता 2022 मध्ये 202 कोटी रूपये झाल्याचे बादल यांनी जाहीर केले आहे. 

सुखबीर सिंह बादल यांचे चुलत भाऊ काँग्रेस नेते मनप्रीत सिंह बादल यांची संपत्ती 2017 पेक्षा 40 कोटींनी वाढली आहे. 2022 मध्ये मनप्रीत यांची संपत्ती  72 कोटी असल्याचे त्यांनी घोषीत केले आहे. मनप्रीत हे बठिंडा शहर मतदार संघातून निवडणूक लढवत आहेत.  त्याखालोखाल सुनाम मतदार संघातून निवडणूक लढवत असलेले आम आदमी पक्षाचे नेते अमन अरोरा यांची संपत्ती 29 कोटी रुपयांनी वाढली आहे. 2017 मध्ये अरोरा यांची संपत्ती  65 कोटी रुपये होती. ती 2022 मध्ये  95 कोटी रूपये झाली आहे. 

कॅप्टन अमरिंदर सिंग यांची संपत्ती 48 कोटींवरून 68 कोटींवर  
दोन वेळा पंजाबचे मुख्यमंत्री राहिलेले कॅप्टन अमरिंदर सिंग यांची संपत्ती 48 कोटींवरून 68 कोटी झाली आहे. 2017 पेक्षा त्यांच्या संपत्तीत 20 कोटींनी वाढ झाली आहे. कॅप्टन अमरिंदर हे पूर्वीच्या पटियालाच्या राजघराण्यातील आहेत. विशेष बाब म्हणजे  त्यांच्याकडे वैयक्तिक कोणतेही वाहन नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. 

महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sudhir Mungantiwar on Oath Ceremony : उद्या फक्त 3 जण शपथ घेतील, सुधीर मुनगंटीवारांची मोठी माहितीZero Hour : शपथविधीआधी देवेंद्र फडणवीसांसमोर सर्वात मोठी आव्हानं, एकनाथ शिंदेच्या नाराजीचा अर्थ काय?Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?Vinod Kambli Sachin Tendulkar : सचिनच्या डोक्यावर फिरवला मायेचा हात, विनोदचा भावनिक क्षण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
Maharashtra CM : शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
Eknath Shinde : देवेंद्र फडणवीस यांची विनंती अन् उपमुख्यमंत्रिपदाबाबतचा प्रश्न, एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत काय म्हणाले?
देवेंद्रजींनी मुख्यमंत्री व्हावं असं पाठिंब्याचं पत्र सेनेनं दिलं, एकनाथ शिंदेंनी सांगितला अडीच वर्षांपूर्वीचा प्रसंग
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Rahul Narwekar : राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
Embed widget