(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Saint Ravidas Jayanti : संत रविदास जयंती; राजकीय नेते करणार शक्तीप्रदर्शन, पाहा कोणाची कुठे होणार सभा?
आज संत रविदास यांची जयंती आहे. त्यामुळे आजच्या दिवशी दलित मतदारांना खुश करण्यासाठी राजकीय नेते विविध ठिकाणी प्रचारसभा घेणार आहेत.
Saint Ravidas Jayanti 2022 : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा रणसंग्राम सध्या देशात सुरू आहे. यामध्ये उत्तराखंड आणि गोव्यातील मतदान प्रक्रिया पार पडली आहे. तर उत्तर प्रदेशमध्ये 2 टप्प्यातील प्रक्रिया पार पडली आहे. आणखी उत्तर प्रदेशातील पाच टप्पे आणि पंजाब, मणिपूरमधील मतदान प्रक्रिया बाकी आहे. त्यासाठी सध्या सर्वच पक्षांचा जोरदार प्रचार सुरू आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) , काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi), दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal), समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ विविध ठिकाणी प्रचारसभा घेणार आहेत.
आज संत रविदास यांची जयंती आहे. या पार्श्वभूमीवर आज दलित मतदारांना खुश करण्याचा राजकीय नेत्यांचा प्रयत्न असणार आहे. पंतप्रधान मोदी हे आज दिल्लीतील संत गुरुदास मंदीरामध्ये दर्शन घेणार आहेत. त्यानंतर मोदी यांची आज पंजाबमधील पठाणकोठ इथे जाहीर सभा होणार आहे. तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे जालंधर येथील रविदास मंदीरात दर्शनासाठी जाणार आहेत. त्यानंतर केजरीवाल रोड शो करणार आहेत. तर काँग्रेस आज वाराणसी येथे शक्तीप्रदर्शन करणर आहे.
पंतप्रधान मोदींचा यूपी आणि पंजाब दौरा
दुपरी 12 वाजता पठाणकोठ इथे सभा
दुपारी 3 वाजून 50 मिनीटांनी उत्तर प्रदेशमधील सीतापूरमध्ये सभा
आम आदमी पक्षाची दलित मतदारांवर बारीक नजर आहे. अशा स्थितीत अरविंद केजरीवाल आज दुपारी जालंधरच्या रविदास मंदिराला भेट देणार आहेत. यानंतर केजरीवाल रोड शो आणि पथ सभांच्या माध्यमातून मतदारांमध्ये जाणार आहेत. दुसरीकडे काँग्रेस आज वाराणसीत शक्तीप्रदर्शन करणार आहे. आज रविदास जयंतीला काँग्रेसचे खासदार राहुल गांधी, सरचिटणीस प्रियंका गांधी आणि मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी वाराणसीला पोहोचणार आहेत. तेथे हे सर्व नेते संत रविदासांचे जन्मस्थान असलेल्या सीर गोवर्धनपूरला भेट देणार आहेत. पंजाबमधील दलित बांधवांची मते मिळविण्यासाठी काँग्रेसने सीएम चन्नी यांचे नाव पुढे केले आहे.
योगी आणि चंद्रशेखरही वाराणसीला जाणार
केवळ पंजाबमध्येच नाही तर यूपीच्या निवडणुकीतही दलित व्होट बँक हा मोठा घटक आहे. त्यामुळे यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि आझाद समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रशेखर आझादही आज वाराणसीला पोहोचणार आहेत. येथे ते संत रविदासांचे जन्मस्थान असलेल्या सीर गोवर्धनपूरला भेट देतील. बनारसनंतर चंद्रशेखर आझाद गोरखपूर आणि इतर विधानसभा मतदारसंघात प्रचारासाठी जाणार आहेत. गोरखपूरमधून माझी उमेदवारी स्वीकारण्यात आली आहे. भाजप सरकारने गेल्या 5 वर्षात केलेल्या अन्यायाचा हिशेब गोरखपूरमध्ये घेतला जाईल. 16 फेब्रुवारी रोजी संत शिरोमणी रविदास जयंतीनिमित्त त्यांच्या जन्मभूमी बनारसमध्ये त्यांचे आशीर्वाद घेऊन मी गोरखपूर आणि इतर विधानसभा मतदारसंघात प्रचारासाठी जाणार असल्याचे योगी आदित्यनाथ यांनी सांगितले आहे.
अखिलेश यादव आज अवधला भेट देऊन आपल्या मतदारांना संबोधीत करणार आहेत. अखिलेश औरैया, कानपूर देहात, कन्नौज आणि फारुखाबादमध्ये पक्ष कार्यकर्त्यांना विजयाचा मंत्र देणार आहेत. दुसरीकडे काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी आज कानपूरमध्ये असतील. प्रियांका सिसामळ आणि आर्यनगरमध्ये घरोघरी प्रचार आणि गोविंद नगरमध्ये महिला शक्ती संवादात सहभागी होणार आहेत. बसपा अध्यक्षा मायावतीही आज मोठी रॅली काढणार आहेत. त्यांची जाहीर सभा लखनौमध्ये ठेवण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या: