एक्स्प्लोर
Advertisement
Pulwama terror attack : मोदी सरकारकडून मोठी कारवाई होण्याची शक्यता, राजनाथ सिंहांनी दिले संकेत
जम्मू काश्मीरमधल्या पुलवामा येथील अवंतीपुरा भागात सीआरपीएफ जवानांवर मोठा दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात 39 जवान शहीद झाले. या हल्ल्याबाबत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह प्रतिक्रिया देताना याप्रकरणी मोठ्या कारवाईची शक्यता वर्तवली आहे.
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधल्या पुलवामा येथील अवंतीपुरा भागात सीआरपीएफ जवानांवर मोठा दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात 39 जवान शहीद झाले. या हल्ल्याबाबत बोलताना केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, "या हल्ल्याप्रकरणी आवश्यक ती संपूर्ण कारवाई केली जाईल, या कारवाईत कोणतीही कसूर केली जाणार नाही."
राजनाथ सिंह म्हणाले म्हणाले की, "हा हल्ला पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मद या अतिरेकी संघटनेने केला आहे. मी आणि संपूर्ण देश याचा निषेध करतो. या दहशदवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी संपूर्ण देश एक झाला आहे. मी जनतेला आश्वस्त करु इच्छितो की, याप्रकरणी जी काही कारवाई केली जाईल, त्यामध्ये थोडीदेखील कसूर केली जाणार नाही."
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शब्दात या हल्ल्याचा निषेध केला आहे. जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नसल्याचे ट्वीट पंतप्रधानांनी केले आहे. या हल्ल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. तर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह उद्या श्रीनगर दौऱ्यावर जाणार आहेत.
संबधित बातम्या
Pulwama terror attack : आदिल अहमद दार, आजच्या हल्ल्याचा क्रूरकर्मा!
Pulwama terror attack : हल्ला झालेल्या बसमधील जवानांची नावं
Pulwama terror attack : बॉलिवूडकरांनीही व्यक्त केला संताप
भ्याड हल्ल्याला चोख उत्तर देण्याची हीच वेळ, राज ठाकरेंचे मोदींना आवाहन
जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही : नरेंद्र मोदी
शहीद जवानांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेणार : माजी लष्करप्रमुखांचा इशारा
पुलवामात सीआरपीएफच्या ताफ्यात मोठा दहशतवादी हल्ला, 39 जवान शहीद
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
नाशिक
निवडणूक
Advertisement