एक्स्प्लोर
पुलवामा हल्ला : 4 जवान शहीद, दोन दहशतवाद्यांना कंठस्नान
अवंतिपुरा सेक्टरमधील लेथपोरा भागातील सीआरपीएफ कॅम्पवर हा हल्ला झाला.
श्रीनगर : जम्मू काश्मिरच्या पुलवामा भागात कमांडो ट्रेनिंग सेंटरवर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यामध्ये सीआरपीएफचे चार जवान शहीद झाले असून काही जवान जखमी झाले आहेत. दोघा दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय लष्कराला यश आलं.
सीआरपीएफचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये शनिवारी रात्री दोन वाजल्यापासून चकमक सुरु होती. अवंतिपुरा सेक्टरमधील लेथपोरा भागातील सीआरपीएफ कॅम्पवर फिदायीन हल्ला करण्यात आला होता.
या हल्ल्यात सीआरपीएफचे तीन जवान जखमी झाले असून जखमी जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. काही दहशतवादी ट्रेनिंग सेंटरमध्ये लपून बसल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता.
दहशतवादी हल्ल्याची माहिती मिळताच जम्मू काश्मिर पोलिस आणि सीआरपीएफचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
"Fidayeen managed to enter Lethpora camp at 0210hrs. As per report two of our men got injured during initial intrusion from J&K Police Commando training area side. There is quite possibility of similar type of attack on other camp also" says CRPF
— ANI (@ANI) December 30, 2017
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement