एक्स्प्लोर
शहीद जवानांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेणार : माजी लष्करप्रमुखांचा इशारा
जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी भारतीय जवानांवर केलेल्या भ्याड हल्ल्यात 40 भारतीय जवान शहीद झाले. या घटनेनंतर माजी लष्करप्रमुख आणि केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंह यांनी ट्वीट करुन तीव्र संताप व्यक्त केला आहे
नवी दिल्ली : जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या अतिरेक्यांनी जम्मू काश्मीरच्या पुलवामातील अवंतीपुरा येथे सीआरपीएफच्या गाडीला विस्फोटकांनी भरलेल्या गाडीने धडक दिली. झालेल्या स्फोटात 40 भारतीय जवान शहीद झाले. या घटनेनंतर माजी लष्करप्रमुख आणि केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंह यांनी ट्वीट करुन तीव्र संताप व्यक्त केला आहे. ट्वीटमध्ये सिंह यांनी पुलवामामध्ये शहीद झालेल्या भारतीय जवानांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेणार असल्याचा इशारा दिला आहे.
व्ही. के. सिंह यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, "भारतीय जवान आणि देशाचा नागरिक असल्याने आज पुलवामा येथे भारतीय सैनिकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याची माहिती मिळाल्यापासून माझं रक्त सळसळत आहे. मला खूप संताप आला आहे. या भ्याड हल्ल्यात आपले 40 जवान शहीद झाले आहेत. मी त्या शहीद जवानांच्या शौर्याला सलाम करतो. भारतीय जवानांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा आम्ही बदला घेतला जाईल"
दरम्यान, गुरुवारी दुपारी दहशतवाद्यांनी पुलवामा जिल्ह्यातील गोरिपोरा येथे सीआरपीएफच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या वाहनांना टार्गेट केले. सीआरपीएफच्या जवानांचा ताफा अवंतीपुरा येथून प्रवास करत होती. दोन हजार 500 जवानांचा ताफा 70 बसेसमधून प्रवास करत होता. अवंतीपुरा येथे दहशतवाद्यांनी स्फोट घडवला. यानंतर दहशतवाद्यांनी ताफ्यावर अंदाधूंद गोळीबारही केला. यात 40 जवान शहीद झाले आहेत, तर 20 पेक्षा अधिक जवान जखमी झाले आहेत.
वाचा : पुलवामात सीआरपीएफच्या ताफ्यात मोठा दहशतवादी हल्ला, 18 जवान शहीद संबधित बातम्या Pulwama terror attack : आदिल अहमद दार, आजच्या हल्ल्याचा क्रूरकर्मा! Pulwama terror attack : हल्ला झालेल्या बसमधील जवानांची नावं Pulwama terror attack : बॉलिवूडकरांनीही व्यक्त केला संताप भ्याड हल्ल्याला चोख उत्तर देण्याची हीच वेळ, राज ठाकरेंचे मोदींना आवाहन जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही : नरेंद्र मोदी शहीद जवानांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेणार : माजी लष्करप्रमुखांचा इशारा पुलवामात सीआरपीएफच्या ताफ्यात मोठा दहशतवादी हल्ला, 39 जवान शहीदAs a soldier and a citizen of India, my blood boils at the spineless and cowardly attacks. 18 brave hearts from the @crpfindia laid down their lives in #Pulwama. I salute their selfless sacrifice & promise that every drop of our soldier’s blood will be avenged. #JaiHind
— Vijay Kumar Singh (@Gen_VKSingh) February 14, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement