एक्स्प्लोर

काँग्रेस अध्यक्षपदासाठी प्रियांका गांधींना पक्षातील नेत्यांचा पाठिंबा

काँग्रेस अध्यक्ष पदासाठी प्रियांका गांधी यांच्या नावाची मागणी पक्षांतगर्त होत आहे. पक्षातील अनेक आजी माजी नेत्यांनी ही मागणी केली आहे. पक्षातील नेत्यांनी टिवट् करून प्रियंका गांधींच्या नावाला पाठींबा दिला आहे.

नवी दिल्ली- काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधींनंतर काँग्रेसचा नवा अध्यक्ष कोण, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु असतानाच प्रियांका गांधी यांच्या नावाची मागणी पक्षात जोर धरत आहे. काँग्रेसच्या अनेक आजी-माजी नेत्यांचा प्रियांका यांच्या नावाला पाठिंबा आहे. प्रियांका गांधी यांनी अध्यक्षपद स्वीकारावं, अशी मागणी पक्षातील काही नेत्यांकडून होत आहे. केंद्रीय मंत्री आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते श्रीप्रकाश जैसवाल यांनीही प्रियांका गांधी यांनी पक्षाचं नेतृत्व करावं, यासाठी पाठिंबा दिला आहे. सध्या पक्षाची परिस्थिती पाहता पक्षाचं नेतृत्व एका खंबीर नेत्याकडे असणे आवश्यक आहे. पक्षाला प्रियंका गांधी यांच्यापेक्षा उत्कृष्ट पर्याय नसून या परिस्थितीतून बाहेर काढण्यास त्या  मदत करतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री अनिल शास्त्री यांनीही ट्विटरवरुन प्रियंका गांधी यांना पाठिंबा दिला आहे. राहुल गांधी अध्यक्षपदाच्या राजीनामा दिल्याच्या निर्णयावर ठाम असल्याने पक्षाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. सध्या पक्ष महत्त्वाचा असून हा निर्णय लवकर घेतला पाहिजे. काँग्रेसकडे सध्या प्रियंका गांधींपेक्षा अधिक चांगला पर्याय नाही, असे त्यांनी आपल्या टिवट्मध्ये म्हटले आहे. राहुल गांधी यांच्या राजीनाम्यानंतर नवीन पक्षाध्यक्ष कोण होणार यावर अजून निर्णय झालेला नाही. राहुल यांच्या राजीनाम्यानंतर अनेक आजी-माजी नेत्यांनी देखील राजीनामा दिला. आगामी काळात गांधी परिवारातील व्यक्तीची निवड अध्यक्षपदी करु नये, असं राहुल गांधी यांनी यापूर्वीच सुचवलं होतं. तरी आजही पक्षात प्रियांका गांधी यांच्या नावाची मागणी जोर धरत आहे.राहुल गांधी यांचा राजीनामा अजून काँग्रेस पक्षातर्फे स्वीकारण्यात आलेला नाही. ओदिशा येथील काँग्रेसचे नेते भक्त चरण दास म्हणाले, राहुल गांधी यांच्या राजीनाम्यानंतर अनेक व्यक्तींचा अध्यक्षपदासाठी प्रियंका गांधी यांना पसंती आहे. आता आगामी काळात काँग्रेस अध्यक्षपदासाठी कोणाची निवड होणार आहे, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

तुमच्या सरदाराने सत्तेच्या जाळ्यात उड्या मारल्या होत्या ना?; झिरवळांच्या उडीवर भडकले राज ठाकरे
तुमच्या सरदाराने सत्तेच्या जाळ्यात उड्या मारल्या होत्या ना?; झिरवळांच्या उडीवर भडकले राज ठाकरे
Harshvardhan Patil : हर्षवर्धन पाटलांचा 'तो' जुना व्हिडिओ अमोल मिटकरीनी बाहेर काढला; 'सहजच' विचारला खोचक सवाल!
हर्षवर्धन पाटलांचा 'तो' जुना व्हिडिओ अमोल मिटकरीनी बाहेर काढला; 'सहजच' विचारला खोचक सवाल!
वीर सावकर ट्रस्टला मुंबईतील मोक्याची पावणे तीन एकर जमीन बक्षीस, कॅबिनेट बैठकीत निर्णय; काँग्रेस संतप्त
वीर सावकर ट्रस्टला मुंबईतील मोक्याची पावणे तीन एकर जमीन बक्षीस, कॅबिनेट बैठकीत निर्णय; काँग्रेस संतप्त
Salil Ankola : धक्कादायक! माजी क्रिकेटपटू सलील अंकोलाच्या आईचा पुण्यातील घरात आढळला मृतदेह; पोलीस घटनास्थळी
धक्कादायक! माजी क्रिकेटपटू सलील अंकोलाच्या आईचा पुण्यातील घरात आढळला मृतदेह; पोलीस घटनास्थळी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 25 : टॉप 25 न्यूज : 7 PM :  4 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaMumbai Superfast : मुंबई सुपरफास्ट : 4 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  7 PM : 3 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सAadivasi Protest Mantralay : मंत्रालयात सत्तेतल्याच आमदारांनी मारल्या उड्य़ा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तुमच्या सरदाराने सत्तेच्या जाळ्यात उड्या मारल्या होत्या ना?; झिरवळांच्या उडीवर भडकले राज ठाकरे
तुमच्या सरदाराने सत्तेच्या जाळ्यात उड्या मारल्या होत्या ना?; झिरवळांच्या उडीवर भडकले राज ठाकरे
Harshvardhan Patil : हर्षवर्धन पाटलांचा 'तो' जुना व्हिडिओ अमोल मिटकरीनी बाहेर काढला; 'सहजच' विचारला खोचक सवाल!
हर्षवर्धन पाटलांचा 'तो' जुना व्हिडिओ अमोल मिटकरीनी बाहेर काढला; 'सहजच' विचारला खोचक सवाल!
वीर सावकर ट्रस्टला मुंबईतील मोक्याची पावणे तीन एकर जमीन बक्षीस, कॅबिनेट बैठकीत निर्णय; काँग्रेस संतप्त
वीर सावकर ट्रस्टला मुंबईतील मोक्याची पावणे तीन एकर जमीन बक्षीस, कॅबिनेट बैठकीत निर्णय; काँग्रेस संतप्त
Salil Ankola : धक्कादायक! माजी क्रिकेटपटू सलील अंकोलाच्या आईचा पुण्यातील घरात आढळला मृतदेह; पोलीस घटनास्थळी
धक्कादायक! माजी क्रिकेटपटू सलील अंकोलाच्या आईचा पुण्यातील घरात आढळला मृतदेह; पोलीस घटनास्थळी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 ऑक्टोबर 2024 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 ऑक्टोबर 2024 | शुक्रवार 
Rahul Gandhi In Kolhapur : राहुल गांधींचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द; बावड्यातील शिवरायांच्या पुतळ्याचे उद्या होणार लोकार्पण
राहुल गांधींचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द; बावड्यातील शिवरायांच्या पुतळ्याचे उद्या होणार लोकार्पण
Maharashta Vidhan Sabha Election : सांगली जिल्ह्यातील भाजपमधील नाराज नेते काँग्रेसच्या वाटेवर; प्रवेशासाठी बैठक सुद्धा झाल्याची चर्चा!
सांगली जिल्ह्यातील भाजपमधील नाराज नेते काँग्रेसच्या वाटेवर; प्रवेशासाठी बैठक सुद्धा झाल्याची चर्चा!
खेळाडू मालामाल.. राज्य सरकारकडून पारितोषिकांच्या रक्कमेत वाढ; ऑलिंपिकविजेत्यास 5 कोटी
खेळाडू मालामाल.. राज्य सरकारकडून पारितोषिकांच्या रक्कमेत वाढ; ऑलिंपिकविजेत्यास 5 कोटी
Embed widget