PM Modi Address Today : पंतप्रधान नरेंद्र मोदी संध्याकाळी 5 वाजता देशवासियांना संबोधित करणार
PM Modi : पंतप्रधान मोदी संध्याकाळी 5 वाजता देशवासियांना संबोधित करणार असून मोदी काय बोलणार याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Modi) आज संध्याकाळी पाच वाजता देशातील जनतेला संबोधित करणार आहेत. सध्या देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. दैनंदिन रुग्णसंख्येचा आलेख उतरणीला लागला असला तरी दररोजचा मृतांचा आकडा मात्र धडकी भरवणारा आहे. त्यामुळे देशातील सध्याच्या परिस्थितीवर पंतप्रधान मोदी काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
पंतप्रधान मोदी देशाला संबोधणार म्हटलं की, अनेकांची उत्सुकता शिगेला पोहोचते. यापूर्वीही पंतप्रधान मोदींनी देशाला अनेकदा संबोधित केलं आहे. तसेच त्या-त्यावेळी अनेक निर्णय जाहीर केले आहेत. अशातच आज संध्याकाळी मोदी देशवासियांना संबोधित करताना काय बोलणार? या संदर्भात अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. अशातच देशातील कोरोनाची दुसरी लाट ओसरण्यास सुरुवात झाली आहे. तसेच कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन केलेली अनेक राज्य अनलॉकच्या दिशेनं वाटचाल करत आहेत. तसेच अनेक राज्यांनी निर्बंध शिथील करण्याचा निर्णयही घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर मोदी पुढे काय काळजी घेतली जावी, यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
देशात कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव अधिक दिसून आला आहे. अशातच पहिल्या लाटेत देशवासियांसाठी मोदी सरकारनं काही आर्थिक पॅकेजची घोषणा केली होती. अशाच पद्धतीनं दुसऱ्या लाटेसाठी काही विशिष्ठ क्षेत्रांसाठी मोदी मोठी घोषणा करु शकतात. तसेच काही विशिष्ट क्षेत्रांसाठी सवलही जाहीर करण्याची शक्यता आहे.
तब्बल 61 दिवसांनंतर देशात सर्वात कमी कोरोनाबाधितांची नोंद
जीवघेण्या कोरोना विषाणूनं बराच काळ संपूर्ण जगाची पाठ सोडलेली नाही. विकसित देशांपासून ते अगदी विकसनशील देशांपर्यंत सर्वत्रच कोरोनाचा कहर पाहायला मिळाला. भारतातही चित्र वेगळं नाही. मागील बऱ्याच दिवसांपासून देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घातल्याचं पाहायला मिळत होतं. पण, आता मात्र देशात कोरोनाची दुसरी लाट ही धीम्या गतीनं का असेना पण ओसरत असल्याचं दिसत आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार मागील 24 तासांमध्ये देशात 1 लाख 636 नवे कोरोनाबाधित आढळले. तर, 2427 नागरिकांचा कोरोनामुळं मृत्यू झाला. इतकंच नव्हे तर, 1 लाख 74 हजार 399 कोरोनाबाधितांनी या विषाणूच्या संसर्गावर मात केली.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Coronavirus India: तब्बल 61 दिवसांनंतर देशात सर्वात कमी कोरोनाबाधितांची नोंद; जाणून घ्या नेमका आकडा
- Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स एका क्लिकवर